Posts

Showing posts from May, 2020
Image
"इक कॉम्रेड की स्नेही"                                            "पटलं नाही ते पटलं नाही" म्हणून बिनदिक्कतपणे बोलणारी, हमसून रडणारी, बोल म्हणलं की नाना विषय काढून त्यातील खोलवर आणि अभ्यासपूर्ण खाचाखळग्यांची माहिती सांगणारी, "आता सांगशील का" "हे लैयच एडपट हैं..." "सांगून टाक न कित्ती मिन्नती करावी लागते तुला!" असं रागात पण मिस्किलपणे म्हणणारी, "हिम्मत हरले रे" किंवा "आता मला खूप काही करण्याची उमेद आहे" असं राजरोस सांगणारी, "असू दे जाऊंदे मंग उद्या बोलू निवांतपणे" अशी म्हणणारी, हसू आलं की खळखळून हसणारी आणि हसवणारी, इतकं की, "डोळ्यातून पाणी येतं की रे म्हणणारी" "आता पुरे उद्या हसायला ठेव काही" कधी बोललो नाही तर महिनोंमहिने संवाद न करणारी, अन अचानक बोलणारी, "जणू काहीच घडलं नाही या मध्यंतरीच्या काळात" असं अगदी निर्मळपणे म्हणणं मांडण्यात पटाईत असलेली, "मग रे?" "आता कसं?" "तू सांग!" असं स्पष्टपणे व्यक्त होणारी, "तुझे ते लेबलं बाज...
Image
★★★Journey of light, struggle in conflict★★★                            The daughter of Jharkhand became the first tribal woman Vice Chancellor of the country. Professor Sona Jharia Minj has been appointed as the new Vice Chancellor of Sido Kanhu Murmu University.                             She was till now the dean of the Computer Science Department at JNU. She has also been the President of JNU Teachers Association. Among all the universities of the country, Sido Kanhu Murmu University Dumka is the first university where a tribal woman has been appointed Vice Chancellor twice.                            Professor Sona Jharia Minj is the daughter of Nirmal Minj, the famous leader of the Jharkhand movement. A woman named Sona (tribal woman) is representing the vice-chance...
Image
***न्यायालयाने मजुरांची घेतली दखल *** देशाच्या विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांच्या समस्या व त्यांच्या दु: खाची सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दखल घेतली. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम.आर. शाह यांच्या खंडपीठाने असे निदर्शनास आणले की वृत्तपत्रातील अहवाल आणि माध्यमांच्या अहवालात सतत प्रवासी मजुरांची दुर्दैवी आणि दयनीय अवस्था सतत पायी चालत जाणे आणि लांबून सायकल चालविणे हे दिसून येत आहे. प्रशासनाकडून त्यांना अडकलेल्या ठिकाणी किंवा ज्या मार्गावरुन त्यांनी पायवाटे, सायकल किंवा वाहतुकीच्या इतर पद्धती चालविल्या जाणाऱ्या सोबतच्या अडचणी व त्या मार्गावर अन्न आणि पाणी पुरवले जात नसल्याची तक्रार देखील त्यांनी केली आहे. खंडपीठाने असेही म्हटले आहे की संपूर्ण देशातील लॉकडाऊनच्या सध्याच्या परिस्थितीत, समाजातील या घटकास संबंधित सरकारकडून सहाय्यक आणि मदतीची आवश्यकता आहे, विशेषतः या कठीण परिस्थितीत भारत सरकार, राज्य सरकारे / केंद्रशासित प्रदेशांनी पावले उचलणे आवश्यक आहे. या स्थलांतरित कामगारांना मदतीचा हात देणे काळाची गरज आहे. परप्रांतीय मजुरांच्या स...
"गावाच्या खालून पांढरी असते तिकडे गेलेलो पांढरीत आता पांढरी माती नाही राहिली ग सगळं मिश्रित झालंय... लोकं आता त्यावर काळी माती टाकून आहेत नाही तर माझ्या लहानपणी माय आणि मी टोपल्याने इथून माती आणायचो घर मातीचं असल्याने उभ्या आडव्या भिंती सारवायचो पांढरी मातीचा वास घेऊन बघ पहिल्या पावसात ओहोच... मी तर कैकदिवस ही माती खायचो... त्यात जीवनसत्त्वे असतात विदर्भात पांढऱ्या सोन्याची शेत असं म्हणतात...!" -विश्वा(9921056462)
Image
★★★इथल्या धर्माला धम्माची गरज.....★★★ भाग-चार[अंतिम] "मद्यशामियान्याच्या तोंडावरच राजधर्मी वस्त्र नसलेले दोन व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत एकमेकांशी वार्तालाप करू लागले होतें.दोघांच्याही हातात राजेसरी मुद्रे होतें.ते मंद दिव्यांच्या लालसर लखोटीत लकाकत होतें.ही मुद्रे केवळ धर्मशाशन करणारांना बहाल केल्या जाते हे आम्हां दोघांनाही ज्ञात होतें.दोघे मोठमोठ्याने आवाज चढावून बोलले, "राजधर्म आम्हीं पाळीला आहें...मोहरा आम्हांस तीन हिस्से असाव्यात....!" "आम्हीं ते प्रेत गोरींत दाबून सारा भ्रम नष्ट केला आहें तेव्हा मला हिस्से तीन राखू ठरवा.." "किंतु...त्या स्त्रीचा खून आम्हीं घडवून आणला आहें..हे जिकरीचे काम तुम्हांकडून घडले नसते...तुमची दराज आम्हां ठावेंती...?" "परंतु भूमका का वर्ज्यदर्जा होतें?? तुम्हां ते जमले नसते...अंगावर आळ बसिला असता.त्या तथागतांना गोवलें हेंचि मोठे कर्म समजून तीन हिस्से आम्हीं राखू ठेविला..नाही तर....!" "आणि त्याने त्या दुसऱ्याची नरडी दाबण्याचा निष्फल यत्न केला." "अनुयायी अवाक् झाले.सर्व बुद्धांच्या स्मितम...
Image
★★★इथल्या धर्माला धम्माची गरज.....★★★ भाग-तीन बुद्ध डोळशांत मुद्रेने त्या पहारेकऱ्यांकडे पाहत होते.त्यांचे बोलणे आता खंडन झाले होते.पहारेकरी आल्यामुळे सर्वच अनुयायी आणि विहारवातावरण नव्या वळणाने अनुभव घेत होते.ते बोल अनुयायी ऐकू लागले.पहिला पहारेकरी म्हणाला, "आम्हां राज्यकर्त्यांकडून क्षमायाचना करितो.या नगरात तथागत बुद्ध तुम्हांसारख्या विद्वान नि अहिंसात्मक विचारशैलीच्या तत्वज्ञानींवर खुनाचा आळ अविचारानेच लाविला.याकरितो...राजा तथा सर्व गणप्रजा क्षमाशील संतोषयाचना मागितो आहोत.दयावृत्तीने ह्या अक्षम्यचुकीचे अपराध चरणी ठेवितो.तावदर माफी असो द्यावी...!" दोन्ही पहारेकरी हात पसरत होते.आणि करुण भावकारीने ते लोलुप झाले होते.दुःखाची व अपराधाची कुमक ते चेहऱ्यावर लपेटून होते. बुद्ध बोलले, "हे आनंद....." "दोघांनाही मनातला विखार गाळून विशुद्ध होऊ द्या...त्यांना जलपान करावयास लावा...." त्या दोघांनी जलपान केले नि पुढची हकीकत ते वदू लागले. "हे महामानवा....हे सत्य तुझे चरणी अर्पित करितो...." दुसरा पहारेकरी बोलला. "त्या दिवशी आम्हां दोघांची गस...
Image
★★★काळ घुत्कारतो आज उद्याही★★★                             "हा काळ कामगारांचा जळजळीत हुंकार घेऊन घुत्कारतो आहे. जगण्या - मरण्याचा संघर्ष या काळात उभा आहे. आता हा संघर्ष शोषव्युववर्तुळ रचनेची दृष्टी घेऊन चिकित्सिला तर तो श्रमबाहुल्य जीवांवर लादलेला संघर्ष ठरू लागतो. मृत्यूच्या दाढेत जीवांना दबा धरून बसल्यासारखा हा काळ अजगरासारखा विळखा घालून लोळतो आहे.                            जगण्यासाठी जगाचं विस्थापन होते. आज काळाने विस्थापणाचं बीज पोटात घेतलं आहे. येणारा काळ अनेक स्थित्यंतरे घडवून आणणारा असा आहे. ही स्थित्यंतरे जितकी भौतिक असतील तितकीच ती मानसिक, शारीरिक, आर्थिक, जैविक आणि धार्मिक असतील. जगण्यासाठी ज्या हालचालींच्या प्रक्रिया आहेत त्यात श्रमाच्या अधिष्ठानाला स्थान देता येईल. श्रमाशिवाय अनुरेणुतही अभिक्रिया होत नाही. ह्या बाबीला रासायनिक अभिसरण श्रमिक प्रक्रिया आपण म्हणू शकतो.                  ...
Image
★★★इथल्या धर्माला धम्माची गरज.....★★★ भाग-दोन सर तोंडावर उजवा हात ठेवून मुखरीने हसत म्हणाले की, "तुम्हें बहुत उत्कंठा लगी है....सुनो.." "बुद्ध त्या विहाराच्या मध्यस्थी बसून प्रज्ञा देत होते.अनुयायी निश्चल ऐकत होते. बुद्ध कोमल वाणीने शब्द उच्चारून गेले..." "जे ख-याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुध्दिमुळे कधीहि सत्यापर्यंत पोहचु शकत नाहीत". "जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणुन ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक द्दष्टी आहे.विवेक असतो.त्यांना सत्य लाभते.सतसार तिथे उन्मेशीत होतो." डोळ्यांची उघडझाप करत आगळे सर बोलत होते.सर अधूनधून हिंदी अनुवाद मराठीतून सांगत होते.त्रिपटक,बुद्धतत्वसार,आणि जातक कथेतील बोधवाक्य सांगू लागले.काहींच्या डोक्यांउपर जाऊ लागलं.अन मंगला बसते त्या बाकड्यामागील बाकड्यावर बसलेला नागू चुळबुळ करू लागला.एकवार नीलम त्याला म्हणाली की, "गब्बस न रे,कित्ती वानुगत वळवळ करा लाव्लाव..ऐक न जरा....!" सर तो गोंधळ समजून नागू अन रोशनकडे मान फिरवत एकदाच पाहून बोलले, "बरं का...नागू,,इकडे लक्ष दे...चित्...
***नसून तरली अवनी त्या शेषशिरावरती.... श्रमिक अन कष्टकऱ्यांच्या तरली तळहातावर्ती*** "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,द.ना.गव्हाणकर,आणि शाहीर अमर शेख या त्रिमूर्ती लाल बावटा कलापथकाची महाराष्ट्र एक करण्याची ललकारी आणि स.का.पाटील व मोररारजी देसाई यांच्या तत्वाला जोर देऊन हाणून पाडणारी श्रमजीवी वर्गाची लढाऊ वृत्ती 1945 ला एकत्रीकरण होत होती .आणि जगाच्या पाठीवर नवा श्रममूल्यात्मक मानवी जीवनजाणिवांचा संयुक्त इतिहास उभा राहत होता.पुढे 1 मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘जागतिक कामगार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याने ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात येतो. तर 1 मे रोजीच ‘जागतिक कामगार दिन’ सुद्धा पाळण्यात येतो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. प्रत्येक वर्षी 1 मे रोजी जगभरातील अनेक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. कामगार दिनाचा इतिहास… औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला. मात्र, या कामगारांची पिळवणूक...