Posts

Showing posts from September, 2021
Image
***नव्या वाटा नवी वळणं *** *Electric Vehicles : 10 हजार चार्जिंग स्टेशन उभारणार ‘ही’ कंपनी, तुम्हीही चार्जिंग स्टेशन उघडून करू शकता चांगली कमाई*                        मुंबई : देशाभरात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) विक्री वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहेत. तसेच, सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्यासारख्या अनेक ऑफर देत आहे. ऑटो कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित केलं आहे आणि नवीन EV मॉडेल सादर करत आहेत. अशा परिस्थितीत आता चार्जिंग स्टेशन उघडून कमाई करण्याची मोठी संधी आहे.   इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर  EVRE ने स्मार्ट पार्किंग सोल्युशन्स ब्रँड पार्क प्लस (पार्क+) सोबत करार केला आहे जेणेकरून पुढील दोन वर्षात देशभरात 10,000 चार्जिंग स्टेशन उभारले जातील. या दीर्घकालीन भागीदारीमध्ये मालवाहतूक वाहने आणि इतर वाहनांसाठी स्मार्ट चार्जिंग आणि पार्किंग केंद्रं उभारण्यासाठी जागा स...