भाग दोन- नोव्हा मला एक सांग रंगाच्या बाबतीत तुझं काय मत आहे? म्हणजे "फोटोग्राफी आणि रंग" हे संदर्भ कसे असतात? रंग म्हणजे प्रकाश. प्रकाशाच्या पुनरावृत्तीचा वेग आणि तरंगलांबी, एका लहरीच्या शिखेपासून दुसर्या लहरीच्या शिखेपर्यंतचे अंतर, विद्युत लोहचुंबकीय पंक्तीला उद्देशून ही संज्ञा वापरण्यात येते ही जशी कमी जास्त होते तेव्हा आपल्याला रंगाची शलाका दिसते. पुन्हा तेच येतं छायाचित्रे म्हणजे प्रकाशाची प्रत. रंग म्हणजेच प्रकाशाच्या विविधांगी आणि भिन्न लांबीरुंदीतील आणि प्रत्ययातील प्रत. आणि ह्या प्रत सतत बदलत्या स्वरूपात असतात. किंवा त्या स्थिरत्वाच्या पलीकडे अस्थिरही असतात. काळ, स्थान, दृष्टिकोन, पारदर्शकीय आणि दर्शनीय माध्यम, यावर त्यांची वितरणे निर्मित होत राहतात. तुझं कोणतं एज्युकेशन झालंय? बीएस्सी बायोटेक. ओह...लै स्पष्ट आणि विश्लेषित करून सांगितलं मग असाच एक प्रश्न येतो की रंग सुंदर असतात का सुंदरतेचा कोणता एक रंग असतो? रंग, फोटोग्राफी, आणि सुंदरता ह्या संज्ञा कशा आहेत? किंवा का वापरल्या जातात व्यावसायिक क्षेत्रामध्ये? ते जसे हिरवे, लाल, नारंगी रंगामुळे छायाचित्रे आकर्षक दिसत...