"नोव्हाच्या कलेतून एका शलाकेतून!"


हळू हळू प्रक्रिया असते ही. दिवसामागून दिवस जाता ही प्रक्रिया पूर्ण होत राहते आणि आपण त्यातून नव्याने नव्या दिवसाला शिकत राहतो. यामध्ये तुमची आवड आणि रुची वाढतेच सोबत तुमचं यातील कौशल्यही वाढीला लागते. परंतु तुम्ही या जोखमीच्या बाबतीत प्रामाणिक असायला हवं. जी प्रक्रिया आपण करत आहोत त्या प्रक्रियेचे भाग म्हणून आपण त्यात गुंतलो पाहिजेत फक्त. छायाचित्रे घेणे ही एक प्रक्रिया आहे. छायाचित्रे काढतांना काही बाबी लक्ष्यस्थ घ्याव्या लगतात.

दृश्य नलकांडी, दृश्यपटलगती आणि अंतर्गत प्रणाली या तीन बाबी खूप महत्वाच्या असतात.
प्रकाश तीव्रता आणि आकृती व तिच्या पार्श्वभूमीवर असलेल्या बाबी समजून घेऊन मानवी हालचाली स्थिर ठेवत छायाचित्रे घेणे एक गणितीय प्रक्रिया जितकी आहे तितकीच ती शास्त्रीय, वैज्ञानिक आणि मानसिक शारीर, ज्ञानेंद्रिय प्रक्रिया आहे. काळानुसार आणि बदलत्या आधुनिक तंत्रज्ञान प्रगतीच्या माध्यमानुसार यात फार गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा समावेश होतो आहे. म्हणून छायाचित्रे घेणे ही एक कला आहे.

छायाचित्र म्हणजे प्रकाश आणि आकृतीचा ताळमेळ घालत दृष्य व मितीय संरचना यांची मिजाज राखत केलेली कला.

मी नोव्हा. मला छायाचित्रे घेण्याची आवड आहे. म्हणजे फोटोग्राफी हा माझा आवडता छंद. तसं मागे वळून पहायला गेलं तर मला ही आवड एका छायाचित्राने दिली. मागे काही वर्षांपूर्वी एक प्रदर्शन भरलेलं होतं. त्या प्रदर्शनात माझे काही छायांकित केलेले छायाचित्रे मी प्रदर्शन करायला ठेवले होते. त्या प्रदर्शनात माझे नाव यादीत समाविष्ट झाले आणि त्यामुळे मला एक नाविन्यपूर्ण प्रोत्साहन मिळाले. त्या प्रदर्शनात विविध ठिकाणची कलाकार आपली छायाचित्रे छायांकित करून घेऊन आलेले होते. ते ठिकाण गरवारे कॉलेजचं होतं.

थंड चित्र उच्च बिंदू दृश्य  प्रणालीने  छायाचित्रे करण्याची पध्दत सुरवात झाली. यात मला सखोल माहिती मिळवावी लागली. तेव्हा मला वाटायचं छायाचित्रे काढण्याचं यंत्र हे महाग व अत्याधुनिक पद्धतीचं असावं. पण मात्र अनुभवाने माझें मतप्रवाह बदलले.

छायाचित्रे करण्याच्या पद्धतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला.

पॉइंट आणि शूटवरून डीएसएलआर क्रॉप सेन्सर कॅमेरा ते पूर्ण फ्रेम कॅमेरा असा प्रवास प्रवास आहे माझा या छायाचित्रे करण्याच्या जगतातील.

छायाचित्रे करतांना तुम्हांला त्या प्रकारानुसार कामाचा बेज तयार करावा लागतो आणि नियोजन करावे लागते.

उदा. मला वाईल्ड लाईफ छायाचित्रे करण्याची आवड आहे.


तर मला विशिष्ट प्राण्याची पाक्ष्यांची, फुलपाखरांची किंवा झाडांची माहिती असायला हवी. तेथील चक्र माहिती असणे गरजेचे आहे.  तो प्राणी पक्षी झाडाकडे कधी येतो. त्याचे भक्ष्य कोणते आहे की तोच खुद्द भक्ष्य आहे इतरांचा? केव्हा कुठला प्राणीपक्षी येतो कोणाचे खाद्य काय आहे? किंवा फुलपाखाची आवडती वनस्पती कुठली? किंवा कुठल्या वेळेमधे सक्रिय असतो? आणि त्याचे अस्तित्व काय? कसे? आहे. तो काळवेळऋतू माहित असणे गरजेचं आहे.

फुलपाखरांच्या वसाहतीचा अधिवास कोणत्या ठिकाणी होतो तो काळ व वेळ माहिती असायला हवी. त्यांच्या हालचाली काय व कोणत्या प्रकारच्या असतात हे जाणुन घेणे गरजेचे असते.
समजा मला फुलपाखरे यांचे छायाचित्रे करायची आहेत तर मी जर रात्रीला गेले तर मला एकही छायाचित्र मिळणार नाही. कारण रात्रीला फुलपाखरे नसतात.  फुलपाखरे हे सूर्यप्रकाशात क्रियाशील असतात हे क्रियाप्रतिक्रिया आणि जीवनविज्ञानकक्ष मला समजले पाहिजेत.

सरीसृपांमध्ये मला रात्री फिरावं लागेल ते रात्री सक्रिय अस्तित्त्वात असतात.

असा प्रत्येक प्राण्यांच्या बाबतीत असतं की त्यांची खाद्य, क्रियाकलाप, सक्रियता व त्याचा काळ, वातावरण आणि तेथील सर्वांगीण स्थिरतेची स्थिती, त्यांची ठिकाणं ह्या बाबतीत एकवाक्यता नसते. या गोष्टींत वैविध्यपूर्ण माहिती मिळू शकते. ते स्थानबद्ध अनुभवांवर अवलंबून आहे. असा सर्व तालमेळाचा अभ्यास करून छायाचित्रे करण्यासाठी निघावं लागतं. यासाठी निसर्ग जीवन आणि सजीव सृष्टी अभ्यासावी लागते. त्यावरून लिहिलेली प्रतिसादातात्मक पुस्तके, परिस्थितीला हाताळण्याची क्षमता व अनुभव गाठीला असावा लागतो. काही गोष्टी तिथे गेल्यावर नाविण्याने शिकायला मिळतात.


प्राण्यापक्ष्यांफुलांचा एखादा क्रियाकलाप नवीन असेल आणि त्याचा माहिती नसेल तर तुम्हाला ते छायाचित्रे तयार करतात नव्याने संदर्भात आणायला.  तो क्रियाकलाप लक्ष्यात येणारी माहिती आणि आपले निरीक्षण हे अद्ययावत करावे लागतील, हे आपल्या सर्वांग आणि साकल्याच्या निरीक्षणावर अवलंबून असेल. आणि मुख्यत्वेकरून तुमची शारीर - मानसिक एकाग्रता.

खूप काळ एकाच जागी एकाग्र बसावं लागतं. खरं तर आपल्याला छायाचित्रे करण्यासाठी संयमी आणि दृढ निश्चयी असणे आवश्यक आहे विशेषतः वन्यजीव छायाचित्रणासाठी.

स्टुडिओ मधे छायाचित्रणासाठी तुम्ही सोईनुसार प्रकाश समायोजित करु शकता.स्थिती सांगू शकता.  पण वन्य जीवनामधे सर्व काम नैसर्गिक प्रकाशस्थित आणि वन्यवातावरणमधे अस्थिर न होता करावा लागते.प्राण्यांना तुम्ही नियंत्रणात राहा म्हणजन सांगू शकत नाही. परत हवा तसा जास्त वेळ असेल असेही नाही. तुमचा छोटे वस्तु जेसे फुलपाखरू, कीटक किंवा फुले हलतात, क्रियाशील असतात तेव्हा  तुमचा छायाचित्र करण्याची यंत्रं वेळेनुसार शक्य तितक्या आवाक्यात अवकाशात सुस्थित करणे , नियंत्रित करणे आणि त्या काळातील आव्हाने स्वीकारणे मोलाचे असते.


स्टुडिओ मधे छायाचित्रणासाठी तुम्ही सोईनुसार प्रकाशयोजना ठेवू शकता. वाईल्ड लाईफमध्ये तुमची वेळ, चिकाटी, तुमचा रियाज यावर निसर्गाच्या सानिध्यात असलेली सोनेरी किरणं, त्यांची शलाका, त्या शलाकांची तीव्रता व सौम्यतेच्या कळा समजता आल्या पाहिहेत इतका हा सखोल अभ्यास करावा लागतो. जी सोनेरी किरणं तुम्हांला सायंकाळी व सकाळी टिपता येतात ती भरुन उन्हाच्या पहाऱ्यात टिपून घेता येत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण तीव्र प्रकाशात सौम्यतेच्या कला नसतात. आणि सौम्यतेच्या कळा ह्या तीव्रतेच्या शलाकेत सापडत नाहीत.

प्रकाशाची उपलब्धता नव्हे तर प्राण्यांची हालचालीची वेळ,सवयी, खाद्य, अधिवास हे आणि कॅमेऱ्याचं गणित जुळवून ठेवावं लागतं तेव्हा कुठे सुस्थितीतील आणि सुंदर छायाचित्र टिपून घेता येते.

आणि हे करता करता तुमचं ज्ञान वाढत जातं शिवाय प्राण्याफुलापक्ष्यांना निरीक्षण करता करता तुमची फोटोग्राफी आणि तुमचं ज्ञान वाढत जातं.

तितक्या काही गोष्टी तुम्हांला एखादा प्राण्यांच्या वर्णनावरून समजणे शक्य नाही जितक्या पटकन एखाद्या फोटोवरून समजतील.

त्यांचा हालचाली आणि स्वभाव ह्या बाबींची टिपणं काढायला शूट ही बाब खूप महत्त्वाची होते आणि यातून तुमची माहिती विविध प्रकाराने वाढते. आणि त्याचे संदर्भपण साक्षीसह तुमच्याकडे असतात. एक प्राणी असेही कृत्य, हालचाली वा स्वभावयुक्त असू शकतो यावर कुणी सांगणे म्हणजे कुणी विस्वास ठेवणार नाही पण त्याची फोटोग्राफी केली तर संक्षिप्त आणि सत्य साक्षीदारयुक्त माहितीचा साठा तुमच्याकडे उपलब्ध असतो. म्हणजेच नाविण्ययुक्त माहिती आणि पुराव्याचं काम फोटोग्राफ करतो. आणि त्या छायाचित्रांचा वापर करत तुम्ही ओळख पटण्याचे सादरीकरणही करू शकता.ओळखीला आपण छायाचित्र हे माध्यम सर्वात महत्वाचे गणत असतो.

एखादा प्राणी साधा अस्तित्वात आहे नंतर तो लोप पावला तर त्याचा संदर्भ माहितीसाठा हा छायाचित्रांवरून अभ्यासास वापरतो. त्या प्राण्याफुलापक्ष्यांचा इतिहास तुमच्याकडे या माध्यमातून जतन असतो. म्हणजे ते लोप पावत गेलं तर त्याचा मूळ माहितीचा साठा तुमच्याकडे असतो. त्यांच्या अस्तित्वाचा पुरावाच असतो ही माहिती म्हणजे.

आणि शंभर शब्द एकीकडे अन एक फोटोग्राफ एकीकडे इतकं त्याचं महत्त्व आहे.

शब्दांत सांगता त्या गोष्टीचं  तुम्हांला विश्लेषण करावं लागतं परंतु एका छायाचित्रातून त्या गोष्टींचा भावस्वभाव, कृतीयुक्त हालचाली आणि संपूर्ण संवेदन मिळतं. आणि हे न सांगता तुमच्यापर्यंत पोचतं.

वाईल्ड लाईफ छायाचित्रण करण्यासाठी तुम्हांला कोंये कपडे परिधान करून जावं लागतं याचंही भान यामध्ये ठेवावं लागतं. तुम्ही भडक रंगाचे कपडे परिधान करून हे कार्य करू शकत नाहीत. भडक रंग निसर्गातील धोके आणि सूचना करणारे रंग असतात. माझ्या अस्तित्वापासून दूर रहा असा इशाराही या रंगातून उपस्थित होत असतो. उदा. जंगलात भडक रंगाचा बेडूक दिसला तर त्याचा अर्थ विषारी. येथील वास्तव्य हे विषारी आहे इथे थांबणे इतर जीवांना शक्य नाही. माझ्या अस्तित्वापासून सावध व्हा. असा तो इशारा असतो. भाकड रंगाचे कपडे परिधान न करता निसर्गारंगाशी मिळतेजुळते कपडे तुम्हांला घालून छायाचित्रण करावं लागतं. यामध्ये विटकरी, ब्राऊन, करडे, हिरगे, गडद हिरवे, गवताळ, गधड्या रंगाचे, मातकट रंग कापड वापरून निसर्गाशी एकरूप व्हावं लागतं. निसर्गाशी प्रमाणित होणारे रंग आणि त्यातील विरोधाभासी रंग डालवून छायाचित्रण करण्यास पूरक अवकाश मिळू शकतो. प्राण्यांची ज्ञानेंद्रिय हे फार तीक्ष्ण व तल्लख असतात. कोणत्याही तीव्र सुगंधी वा विषारी वासाने एक तर जंगली जीव आकर्षित होतील किंवा दूर जातील. मानवी शरीराचा वास तर ते मैलावरून समजू शकतात. त्यांचे ज्ञानार्जनाचे इंद्रिय हे मानवी ज्ञानेंद्रियांपेक्षा सक्षम आणि संवेद्य असतात. म्हणून उत्तेजक पदार्थ आणि वास येणारे अत्तरफाये, मद्य, सुगंधी द्रव्य शरीर, कपड्यांवर न फवरता तुम्ही जंगलसफरिला
गेलात तर निसर्गातील दुर्मिळ गोष्टी पहावयास, अनुभवयास आणि दृष्टीस पडतील.

असे एकजागी एकाग्रतेने आणि संयमाने बसावं लागतं.


भाग एक- क्रमशः- 

"नोव्हाच्या कलेतून एका शलाकेतून!"
-विश्वनाथ साठे(9921056462)

Comments

Popular posts from this blog