★★★ कसं सगळं व्यक्त होऊ?★★★ माहितीय मला की, "हम्म. खरंय. लिखाण बंद पडायला नको. लिखाण हेच जिवंतपण आहे माझं!" तुम्ही म्हणाल, "जे जमेल तसे कर!" "पण म्हणून म्हणलो, कसं सगळं व्यक्त होऊ?" हेही म्हणाल तुम्ही की, "काळ सगळे शिकवतो ना?" "हम्म. हो सगळं शिकवितो तो काळ. आणि अनुभव पदरी टाकतो तोही काळच. एकेकाळी एक व्यक्ती मला म्हणाली की, 'तुझे लिखाण हे तुला जास्त ओळखते तुझ्यापेक्षा!" "ह्यावरही कसं व्यक्त होऊ? हे विधानही कुणीतरी अनुभवानेच म्हणलं आहे न की, "ऐक दिवस असा येऊ दे जेव्हा मी तुझ्या नावाची स्वाक्षरी घेईल!" म्हणलो, "आटोग्राफ घ्यायचाय न." "लेखकाचा, असं म्हणायचं मला?" "अच्छा!" "त्याचाही घेईल. त्यात काय? मी काय असाच नाही घेणार तूला तेवढे मोठे बनावे लागेल." "बरं? इथं असंख्य प्रश्न होते. काळ बोलेल यावर. आम्ही काय बोलावे सद्या तरी?" "मुख्य म्हणजे 'मोठ्ठं' म्हणजे काय हो ब्वॉ? समजलं नाहीय अजून मला आता लहानाचा मोठ्ठलाट झालो हे क्काय?" "तूम्ही आहात ...