श्रुती - स्मृतींचे राजमार्ग : मराठी दलित काव्य अनिकेत जावरे यांच्या लेखातील काही मुद्दे - जातीव्यवहार म्हणजे लोकांच्या शारीरिक व्यवहाराचे नियमन, कारण जातीव्यवहार स्पर्श प्रकारच्या व्यवस्थेतून व्यक्त होतो. ज्याप्रमाणे मानवी शरीरे 'जाती'च्या संकल्पनेद्वारे बांधली गेली, त्याचप्रमाणे दलित काव्याची ऊर्जा आणि ताकद 'अस्सल' दलितत्वात बांधली गेली. अस्सलपणाच्या संकल्पनेच्या आधारे अस्सल परिघावर राहून अस्सल आपल्यावर अस्सल अन्याय झाला आहे, याचे अस्सल नैतिक समाधान मिळते. 'बुर्ज्वा' शिक्षण दलित व्यक्तीत विषमतेचा प्रदेश सोडून आर्थिक सुस्थितीत स्वतः ला सापडण्याची कामना उत्पन्न करते. दलित साहित्याचा आत्मा इथे हरवला! कुणी काढला? दलित काव्याचा उपभोग बहुतकरून न-दलित वाचक करतात. त्यांच्याबरोबर एका ताटात जेवण्यापेक्षा, आपली कन्या त्यांना लग्नात देण्यापेक्षा दलित साहित्याचा उपभोग घेणे सोपे ठरते. शब्द कितीही जवळचे वाटले तरी, साहित्यातले शब्द एकत्र जेवण्याइतके किंवा शरीरसंबंध जोडण्याइतके जवळचे नसतात..... वर्षानुवर्षे शोषल्या गेलेल्या, या सर्व निम्नवर्णी, कुपोषित लोकांचे सुंदर ...