भाग एक- त्या दिवशी इसुबा वसतिगृहाच्या मागील बाजूला असलेल्या टेकाडावर जाऊन बसला होता.सारी हिर्वळ सुकली होती.ना फुलं ना फळं असे झाडं निष्टुरपणे जमिनीवर उभे होते.निसर्गाचा वांझपण झेलत ते जगत होते.डेऱ्यातलं पानी अटल्यासारखं मातीतली वलाई उधडली होती.फांद्यांच्या काड्या कडकडीत लटकत होत्या.खडखड वाजनारा पालापाचूळा पायाखाली चेंगरत त्यो झपाझप पावलं टाकत टेकाड चढत होता.पालझड झालेल्या गर्द वनराईतून वाट काढत त्यो टेकाडाकडं गेला.वाळलेल्या खुंटाचे हिसडे त्याच्या चपलेतून पायाला लागत होते.त्या वेदनेपेक्षा त्याच मन मलूल झालं होतं.म्हणून त्यो पर्वा न करता पुढं चढण चढत होता.उंच टेकडाच्या माथ्यावर नजर टाकली त सारं शहर दिसत होतं.अश्या माथ्यावर त्यो नजर भिरकावत टेकाडावर गेला.भानूच्या धगेने खंगाळलेले कातळ पठारी दगडं निपचित पडलेले होते.सारी वनराजी त्या टेकडाच्या भवताल उभी होती.पिवळट ओकाऱ्या रंग त्या परिसराला भरला होता.जख्ख झालेल्या म्हताऱ्यासारखं त्यांचं जगणं निसर्गाला भग्नावशेष ...
Posts
Showing posts from July, 2022