Posts

Showing posts from July, 2021
Image
 "माणसाने माणसाला समजून घेतलं पाहिजे. मानवी जीवन जगण्याचं मूल्यत्व समजलं पाहिजे." इतकं चिंतनशील आणि विवेकी विधान ऐकत होतो. त्यादिवशी दाभोळकर सरांना कामगार सभागृह आकुर्डी येथे प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं, अनुभवलं. परिवर्तनाचा विचार जगण्याऱ्या व्यक्तीचं चळवळीशी असलेलं नातं कित्ती घट्ट आणि निस्सीम असतं हे मी त्यांच्या बेंबीच्या देठापासून येणाऱ्या वाणीवरून समजू शकलो. ते म्हणाले, "या पृथ्वीतलावर प्राणीपशुही जगतात. परंतु मानवाला विवेक आहे. जगतांना तो समूहाने जगतो. हा विवेक हरवून मानव प्राणीपशु होऊ नये. आणि अत्याचारी बनू नये. अविवेकी होऊ नये. संतांचं हेच सांगणं आहे!" इतक्या सोप्या आणि सरळ शब्दांत ते जगण्याचं तत्वज्ञान स्वभाषेत मांडत होते. सभागृह स्तब्ध होतं. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्मरणिकेचे प्रकाशन आणि मराठी साहित्यातील अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. हे महाराष्ट्रातील पहिले अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन. मुंबई-पुणे रस्त्यावरील आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे ६ - ७ जुलै २०१३ रोजी झालेल्या संमेलनाची आठवण अजून ताज...