Posts

Showing posts from November, 2020
Image
  ★★★श्रद्धा - अंधश्रद्धेतील 'स्पेस' समजून घेतांना★★★ मनुष्य स्वभाव हा मुळातच जिज्ञासू आहे. प्रश्न विचारणे, निर्माण करणे हा गुण प्रत्येक मनुष्याचा अंगात उपजतच असतो, उदाहणार्थ लहान मुले अनेक प्रश्न विचारुन मोठ्यांना भंडावुन सोडतात. सभोवतालच्या घटकां बद्दल असलेले अज्ञान दुर करावे अशी उत्सुकता प्रत्येकाकडे असते. त्या औत्सुकते मधुन काही प्रश्न तयार होतात, हे असेच का आणि ते तसे का नाही यांचा मागोवा घेत आपण शंकांचे निरसन करतो किंवा तसे करण्याचा आपल्या परिने प्रयत्न करतो. शंकांचे निरसन होत असतांनाच, मनुष्याला नवी माहिती मिळते, नव्या तंत्रांचा विकास होतो. या नव्या मिळालेल्या माहितीच्या आधाराने आणखीन नवे प्रश्न तयार होतात, नव्या शंका निर्माण होतात आणि विज्ञान विकासाचे चक्र सातत्याने सुरु रहाते. होणारा विकास हा न थांबणारा आहे म्हणुन सातत्याने. एकेकाळी पृथ्वी स्थिर आहे व सूर्य फिरतो ही श्रद्धा होती. ही श्रद्धा हा भ्रम होता हे कोपर्निकस - गॅलिलिओच्या संशोधनातून सिद्ध झाले. अशा विविध भ्रमांचे निराकरण विज्ञान करीत आले आहे. आजही करीत आहे. पहावे, तपासावे, प्रयोग करावेत, कल्पना लढवाव्यात...
Image
"जळतात उभी ओली झाडं आपली सावली सोडून जातांना तिरपी उन्हं काळवंडू लागतात तेव्हा नक्की समजा... पहाटपूर्वीचा अंधार अन तुफानाआधीचा निरव शांत बुडायला जातो की उजळायला फेकत असतो मात्र लालबुंदच्या लालबुंद अंगार.... हं...अंगार असतो झाडाच्या खोडातही काळजाच्या जोडातही अन सूर्याच्या बुडातही उन्हाळे पावसाळे अन हिवाळेही सोसत असतो निसर्गाचे नियम उदासवाने उसासे उरात उरतात तेव्हा..." -विश्वा
अन्सामाय हायब्रेड खुडायलं गेली. पोरगं पाजलं. त्याला अफू हुंगायला देली. ते गुंगलं. झोपी गेलं. डाल्याखाली झाकलं. वरून धुडकं झाकलं. डाल्यावर दगड ठेवून अन्सामाय डायब्रेड खुडायलं गेली. एक पाथ लागली. दुसरी लागली. पाणी पिलं तिसरी पाथ सुरू झाली. अर्ध्यावर आली. पोरगं अजून उठलं नाही. जाऊन तरी पाहते म्हून अन्सा आली. डाल्याजवळ आली. पाहते तर लालजरद कुखावानी आटाळापिटाळा डाल्यावर बसलाय. डोलतोय. फनी काढलीय.  अन्सा आता मुरझरितून उठली. तिची झ्याक उडाली. ती भानावर आली. लगबगीनं पोरगं तिनं काखेत घेतलं. अन जागा बदलली. पोरगं आता पॉटशी गुंढाळलं. ते पाठीवर पेंगुळत होतं. काळूश्या आता झोप मोड होत होता. कन्सं खुडता खुडता तिच्या अंतरंगात कैक प्रश्न धुमाकूळ घालत होते. एक कनीस ती ईबाळ्यानं चरकन कापत होती अन दुसऱ्याच क्षणी एक प्रश्न तिचं काळीज कापीत होता. अन्सा माय प्रश्न करत होती. दगड नागानं पडला कसा असलं. त्यानं काळूश्यालं काही कसं केलं नाही? हे नागाचं कुळ उरावर कसं आलं पोराच्या? पोरालं काही झालं तर नाही? क्रमशः- विश्वनाथ साठे(9921056462) 
वाचण्यासारखी पुस्तकं 1.कॉम्रेड अण्णा भाऊ साठे - उत्तम कांबळे  2. माणगांव परिषदेची शंभरी आणि 3. आजचं समाज वास्तव - सिद्धार्थ कांबळे 4. संवेदनशील साहित्यिक अण्णा भाऊ - अनिल म्हमाने 5. मी नास्तिक का आहे! - शहीद भगतसिंग 6. सिध्दार्थ गौतम बुद्ध : जीवन आणि कार्य - डॉ. प्रविण चंदनशिवे 7. ढालतलवार, घोडा आणि किल्ले या पलिकडचे शिवराय- अ‍ॅड. कृष्णा पाटील 8. राजर्षी शाहू महाराज : जीवन आणि कार्य - कल्याण श्रावस्ती 9. महात्मा जोतिराव फुले : जीवन आणि कार्य - अनिल कलकुटकी 10. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन आणि कार्य - बाळासाहेब लोखंडे 11. फुले, शाहू, आंबेडकर समाजक्रांतीची नवी दिशा - डॉ. बाबुराव गुरव 12. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : जीवन आणि कार्य- मंदाकिनी सपकाळ 13. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : जीवन आणि कार्य- लक्ष्मी मुसाई 14. विद्रोही संत तुकाराम : जीवन आणि कार्य - विश्‍वास सुतार 15. क्रांतिसूर्य भगतसिंग : जीवन आणि कार्य - डॉ. विठ्ठल मोरे 16. संत गाडगेबाबा : जीवन आणि कार्य- डॉ. शिवाजीराव पाटील 17. मुक्‍ता साळवे : जीवन आणि कार्य - डॉ. सोेमनाथ कदम सिध्दार्थ गौतम बुध्...
★★★गावखुर★★★ गाव आणि विकास- गावाचा विकास आखायचा असेल तर संबंधित योजना राज्य सरकार 100 टक्के निधी राज्य सरकार देतं आणि केंद्राच्या बहुतांश योजनांसाठी 60 टक्के केंद्र सरकार,तर 40 टक्के राज्य सरकार देतं. 1 एप्रिल 2020 पासून 15वा वित्त आयोग सुरू झाला आहे. त्यानुसार सरकार गावातल्या प्रति माणसी प्रति वर्षी सरकार 957 रुपये देत आहे. 14 व्या वित्त आयोगासाठी ही रक्कम 488 रुपये होती.  14 व्या वित्त आयोगानं जो पैसा गावासाठी दिला होता, त्यातला 25 टक्के मानवविकास, 25 टक्के कौशल्य विकास, 25 टक्के केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा समन्वय आणि 25 टक्के पायाभूत विकासासाठी खर्च करण्यास सरकारनं सांगितलं होतं.  आता 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत गावाला मिळालेल्या एकूण निधीपैकी 50 टक्के निधी पाणीपुरवठा, स्वछता आदी बाबींवर खर्च करण्यास सांगितलं आहे, तर उर्वरित 50 टक्के इतर बाबींवर खर्च करण्यास सांगितलं आहे.  पण तुमच्या गावासाठी सरकारकडून किती निधी आला आणि ग्रामपंचायतीनं तो कुठे खर्च केला, हे कळेल कसं? गावाचं रिपोर्ट कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या पंचायती राज दिवसाला म्हणजेच 24 एप्रिल ...
 ★★★मानवी विकार आणि धर्म★★★ मानवी विकार जसे त्या त्या आयुष्यकाळी निर्माण वा उत्पन्न होतात. त्या त्या आयुष्यकाळी प्रस्थापित झालेले आकृतिबंधही त्या त्या कालपरिप्रेक्ष्यात उत्पन्न होतात. जसे ते निर्माण होतात वा उत्पन्न होतात तसे त्या त्या आयुष्यकाळाचे प्रतिपादन करीत कालांतराने आयुष्यकाळाच्या परिवर्तनाने व विकारशमन प्रक्रियेने वा विकारशयाने ते नष्ट होत जातात. काम क्रोध मोह मद मत्सर लोभ आदी विकारातून तयार झालेले जाळे तेही नष्ट होत जाते विकारांच्या नष्टतेनंतर. विकारशमन ही एक मानसिक - जैविक - भावनिक - शारीरिक तितकीच वैचारिक प्रक्रिया आहे. आध्यात्मिक धारणांनी विकारशमनाचे अधिष्ठान घेत विकारांची नष्टता करण्याचे तंत्रही त्या त्या भूगोलात विविधांगी पध्दतीने निर्माण केले आहे. अध्यात्माला त्या विकारांची नष्टता करणे गरजेचे होते म्हणून विकारांना अध्यात्मात स्थान नाही. परंतु त्या त्या आयुष्यकाळी विकार उत्पन्न होतात हे विज्ञान आहे. मानवी विकार हे मूलतः नसर्गिक तत्व असलेलं प्रारूप आहे. निसर्गाच्या नियमनाने सगळी चलितं प्रवाहित असतात. ह्या चलितांना अध्यात्म कसे नाकारू शकेल? प्राचीन तत्वज्ञानाच्या श...
UGC REGARDING- Postdoctoral research is an important enabling step in grooming young researchers for launching an academic/research career. This is a transition phase from a largely supervisor directed student at doctoral level to an independent researcher for leadership position, particularly in academia. A postdoctoral stint also provides an opportunity to acquire new skills, broaden one's horizon and offers a platform for transiting into cross-disciplinary areas. Experience in other parts of the world has shown that university faculty is best inducted from among candidates who had a year or two of postdoctoral training and is generally considered an essential requirement. Mentoring for independent research is an indispensable element of postdoctoral training. Top rated institutions in our country which value research also follow this practice but it has not permeated widely. Leading research groups around the world usually have a good mix of postdoctoral fellows and doctoral stu...