"जळतात उभी ओली झाडं

आपली सावली सोडून जातांना

तिरपी उन्हं काळवंडू लागतात

तेव्हा नक्की समजा...

पहाटपूर्वीचा अंधार अन तुफानाआधीचा निरव शांत

बुडायला जातो की उजळायला

फेकत असतो मात्र लालबुंदच्या लालबुंद

अंगार....

हं...अंगार असतो झाडाच्या खोडातही

काळजाच्या जोडातही

अन सूर्याच्या बुडातही

उन्हाळे पावसाळे अन हिवाळेही सोसत असतो निसर्गाचे नियम

उदासवाने उसासे उरात उरतात तेव्हा..."

-विश्वा

Comments

Popular posts from this blog