★★★म. फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील दुवा - लोकराजा राजर्षी शाहू !"★★★

जागतिक स्तरावरील सामाजिक उन्नतीचे स्तर तपासून पाहिले की, काही प्रवाह दिसतात त्यामध्ये प्रामुख्याने एडमन बर्क, थॉमस पेन, - राजकीय परिवर्तनाचा स्वीकार करणारा प्रवाह आहे.  परंपरेत राहून बदल करणे -एडमनच्या प्रवाहाने स्वीकारले. परंतु या प्रवाहाच्या परिप्रेक्ष्याची जर चिकित्सा करायची ठरली तर परंपरा छेद करून बदल घडविणे - थॉमस या प्रवाहाच्या अनुयायांनी म्हणजेच भारतीय उपखंडात म. फुले, आगरकर, महर्षी सिंडे, ताराबाई , सावित्रीबाई, मुक्ता साळवे इ. नी परंपरेतील अनिष्ठ रुढ पद्धती आणि विचार काढून टाकणारे तत्व अंगीकारले . परिणामी म. फुले तर घरातून बाहेर पडले आणि बदल करविला.  याउलट अनुयायी रानडे, लोकमान्य हे परंपरेत राहून बदल करण्याचा अट्टहास करतात हे एडमन चे पुरस्कर्ते. 

वास्तविक मानवी स्वातंत्र्य आणि मूल्यविचारांचा गाभा - फ्रेंच क्रांतीचा क्रिटिक - एडमन यांच्याकडे पाहता येते. भारतीय जाणिवेत महाराष्ट्रात फुले ते आंबडेकर यांच्यातील दुवा राजर्षी शाहु असा ठरतो. कारण ते आग्रहाने आणि अनिष्ठांचे विचार नष्ट व्हावे म्हणून म्हणत, "सर्वांना वेदोक्तचे अधिकार मिळत असतील तर मी घेईन" (करवीर संस्थान अध्यादेश - आदेश) या कारणास्तव त्यांनी आपल्या संस्थानी प्रवाहात समानतेचा अधिकार, स्वतंत्र राज्यव्यवस्था, एकीचे तत्व आणि पारदर्शी व्यवहार साकार करत जनतेचे राज्य आणले. 

स्वातंत्र्य मूलगामी भूमिका - ब्रिटिश गुलामीतून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्य माणसाची स्वतंत्रता, नैतिक आणि सर्वोतोपरी समानता असते. भांडवलशाही व्यवस्था तुम्हांला गुलामीकडे( कर्म) करायला लावते.आणि कर्मातून उत्पादित उत्पन्नाचे शोषण करत सामाजिक स्थिती अस्थिर ठेवते. उतरता क्रम सामाजिक जीवनात क्रमित केल्या जातो तो भांडवलदारी व्यवस्थेमध्ये. 'ब्राम्हणवादातून मुक्त होणे हे आजचे स्वातंत्र्य' आहे. आज देशाला जी शोषणाची कीड लागली आहे ती केवळ ब्राम्हण्य तत्वाने. यासाठी राजर्षी यांचा आरक्षण -१९०२ सालचा सामाजिक न्याय विचार, शिक्षण उद्योग, स्वातंत्र्य समता बंधुता मूलगामी सामाजिक न्याय यांचे संतुलन आणून व्यवहार लोकाभिमुख शासन आखण्याचा वास्तव विचार फार मोलाचा आहे. 

राजकीय स्वातंत्र्यास आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचा पाया मिळाला पाहिजे. कारण आज बहुजन वर्गाला राजकीय स्थितीत आपले अस्तित्व टिकविता येत नाही. कारण आर्थिक स्थैर्य नाही. मानसिक पाठपुराव्याचा आधार नाही. त्यामुळे सांस्कृतिक अधिकार नाहीत. यार्थी दुबळ्या घटकाला विशेष मदत व साहाय्य मिळावे म्हणून राजर्षींनी ज्या योजना अंमलात  आणल्या त्या बहुजन हिताय बहुजन सुखाय तत्वांच्या नितीत येतात. 

आजचे भांडवलशाही व्यवस्थेत हे कराराचे स्वातंत्र्य जाहले त्यांनतर गुलामीचे स्वातंत्र्य आले. अशा शोषणयुक्त व्यवस्थेत यात दुबळे अधिक दुबळे, बलिष्ठ अधिक बलिष्ठ होत जातात. आज देशात अब्जाधीश अब्जाधीशच होत आहेत आणि गरीब गरीबच. जीवनमान स्थिर तेच तेच आहे. तफावत जाणवते. अजूनही बेघर जीवन कंठणारे आणि काचेच्या घरात ऐश्वर्याराम करणारे दोनही वर्ग देशात तुमच्या नजरेत येत नसतील तर तुम्ही शोषनी व्यवस्थेच्या घट्ट डोळ्यावर बांधलेल्या पट्ट्यात जगता आहात. यावर उपाय म्हणजे सर्वांना समानता, नवं भांडवलशाहीत स्पर्धा आली असल्याने दुबळा वर्ग मागे पडतो अशा विशेष समूहाकडे विशेष शक्ती प्रदान केली पाहिजे.  कारण भारतात विषमतेचे वृक्ष फार मोठे आणि पुरातन आहेत. मुख्यत्वे वंश, वारसा, कर्तृत्व विषमता - डॉ बाबासाहेब आंबेडकर मानतात. कारण त्याला तोडफोडीची समाजव्यवस्था आधार आहे. 

राजर्षींनी दलितांना वकिलाच्या संधी आणि सनदा दिल्या  - ब्राम्हणांना राग आला आणि वेदोक्त प्रकरण पुढे आले. तोपर्यंत लोकमान्य टिळक ही प्रक्रिया केवळ पुण्यातून पाहत होते. वकिलांचे पुढारी होते. विकास, सामाजिक न्याय, मदत, बरोबरीची दृष्टी ही दलितांना कधीही शोषण व्यवस्थेने दाखविली नाही म्हणून ते विकास साधण्यास काठिण्य मानतात. ही परिस्थिती आता सुधारू लागली परंतु त्यांचावरील हल्ले वाढत आहेत. त्यांचेवर हिंसा होते आहे. नोकऱ्या, पैसे, साधनसामुग्री वाटप म्हणजे समानता आणि तिचे समाजिक न्याय नाही. त्या त्या त्या तळातील समाजाच्या शेवटच्या माणसाचे प्रतिनिधित्व झाले पाहिजे. आज कामगार मराठा आणि रोजीरोटी मिळविणारा कष्टकरी मराठा.  दुसरे म्हणजे नोकरदार मराठा आणि उत्पन्न मिळकती असणारा मराठा अशा प्रकारे महाराष्ट्रातील मराठा सामाजिक बहुजन समूहात असे दोन गट पडले आहेत. पुढील पाच दशकांत हे भेद जितके जास्त तितकी विकासाची आणि राष्ट्रऐक्याची भावना कमी होऊन आपापल्या हितासाठी हिंसा अंगिकरण्याचे प्रमाण जास्त होईल. 

दाबल्या गेलला आवाज, शोषित आवाज, समूह हितसंबंध, स्वतःचे स्तर प्रवर्धित झाले पाहिजे. यासाठी कांबळेची हॉटेल शाहू काळात कोल्हापुरात उभी राहते. २० शतकाच्या प्रारंभी राजर्षी शाहू यांनी सामाजिक न्यायचा कृतीआराखडा देत शासन - जनता मुखर - लोकशाही संवाद जाहीर केला. कायदा व्यवहारात आणण्यासाठी त्यांनी मूलगामी विचार केला आणि त्यानुसार बदल केले. शिक्षण व बोर्डिंग, शेती व उद्योग, शेती व पुरक व्यवसाय, शाळा प्रवेश आणि नोकरीच्या संधी, नोकरी आणि सामाजिक न्याय, इ भूमिका ठेवल्या. 

अस्पृश्य भेद शाळेतून नष्ट केला. सर्व शाळेत सर्वांना एकत्र बसवून एकत्र शिक्षण देण्याचा व्यवहारता कायदा केला. जनतेबद्दल असलेला संवाद आणि शासन यांच्यातील लोकशाही राबविली. स्रीदास्य नष्ट करण्याचा कायदा केला ते साल १९२० होते. स्त्रियांवर होणारे मानसिक हिंसाचार नष्ट करत, शारीरिक हिंसाचार नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यातील अपमान, भय, हिंसा, उपाशी ठेवणे, न झोपू देता उभे करने इ. सूक्ष्म नोंदी या कायद्यात आहेत. गुन्ह्याच्या नोंदीष्ट नीट व सुक्ष्मीकपण केल्या आहेत. 

भारतीय समाजातील स्त्री स्थान पुरुषापेक्षा दुय्यम आहे यामुळे त्यांना नागरिकत्वाचे अधिकार मिळत नाहीत. उदाहरण -फिरण्याचे स्वातंत्र्य, कपड्याचे स्वातंत्र्य, मैत्रीचे स्वातंत्र्य, स्वसंरणक्षण अधिकार, शरीर स्वातंत्र्य यामुळे स्त्रियांनीही स्वतःबद्दल आदर नाकारला. त्यांचा अपमान, दास्यत्व, दस्यत्वाच्या खुणा म्हणजे स्त्री चं स्त्री असंण, अलंकार इ गुलामीचे द्योतक आहेत. 

करवीर संस्थानात लग्नाचं वय १४ स्त्री १८ पुरुष वय - आंतरजातीय विवाह, आपला पती, निर्णय घेण्याचा अधिकार कायदा शाहू महाराजांनी केला आहे. याचसोबत देवदासी, मुरुळ्या, स्त्री विक्री, इ बाबतीत त्यांनी व्यक्तिपण त्यांनी स्त्रियांना बहाल केले, यामुळे हिंदू कोड बिलाचा पाया यातून पुढे उभा राहिला. डॉ.आंबेडकरांचे आणि राजर्षी शाहू यांचे संवाद याविषयी फार मार्मिक आणि बोलके आहेत.(डॉ. आंबेडकरांचे शाहूंना पत्र -पन्हाळा) 

महाराष्ट्र्रात सहकाराचा विचार, संस्थात्मक कार्य, ऊस लावगड, गूळ काढणे, जलसिंचन, मॉडेल कोल्हापूर, शेतीची सामूहिक मशागत आणि उपक्रम राजर्षी शाहू महाराजांनी केले आहे. 
भटके विमुक्त  ,स्त्री, दलितांना सामील करणे, याचा आकृतिबंध करवीर संस्थानी होता. राष्ट्रवाद यासाठी नीती म्हत्वाची आहे. शॉर्य आणि वीर्य यावर राष्ट्र बलदंड होऊ शकत नाहीत. नीतिमत्ता कोसळळी तर राष्ट्र विघटन पावते. (उदा -रोम)

सामाजिक नीतिमत्ता योग्य विवक्षिल करणे म्हणजे राष्ट्रवाद. आज याची गरज आहे. आज वीर्य आणि शॉर्य याची भाषा वापरली जात आहे. आणि हिंसेचे वातावरण निर्माण केले जात आहे. समाजातील स्रीदास्य नष्ट करणे, अंधश्रद्धा नष्ट करणे, भ्रष्टाचार नष्ट करणे यामुळे विवेक, लोकशाही स्वातंत्र्य, नीती तिथे राष्ट्र बळकट होते. जातिनिर्मूलनाचे व्यवहारिक आणि तात्विक दर्शन राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यात दिसते. जागतिक स्तरावर इतिहासात एक समीकरण नजरेत येते ते म्हणजे (उदा - जपान सामुराई क्षत्रियांनी जाती नष्ट करण्यासाठी स्मूहिक पद्धतीने कार्य केले. शेती, उद्योग, सामुराई त्याग, विशेषाधिकार त्यागून समाज आरपार बदलला. आज जगात जपानची सर्व क्षेत्रात चलती आहे.) 

आज समाज हिंसक वृत्तीला जात आहे. त्याला अपराध बोधाची शरम वाटणे राष्ट्रासाठी गरजेचे आहे. आज महाराष्ट्र्राची बोधाची शरम कमी झाली आहे. स्वतःच्या अपराधाची शरम वाटणे जाती निर्मूलनासाठी भारतात महत्वाचा काळ आहे. झुंडशाहीच्या काळात बौद्धिक पातळीवरील गुलामगिरी नष्ट करणे गरजेचे आहे. यामुळे शोषक गटाची हानी न होता राष्ट्राची हानी होते. कारण अशा परिस्थितीत भारत बलशाली राष्ट्र होऊ शकणार नाही. कारण बौद्धिक गुलामगिरीतून माणूस अजूनही सुटला नाही.

- विश्वनाथ अर्जुन साठे, पुणे (9921056462)

Comments

Popular posts from this blog