Posts

Showing posts from May, 2022
Image
 ***साहित्यिक संभाजी***                      "गेल्या सहा सात वर्षाखालील गोस्ट.त्या दिवशी म्या कंपनीची पहिली शिप करून मित्रांसोबत तुळापूर ला गेलो होतो..तिथे संभाजी राजेंच्या हयातीतील शेवटच्या अस्तित्वाची आजच्या काळात असणारी स्थिती अनुभवली.आणि अध्यापकीय शिक्षण घेतांना वाचलेले पुस्तकं,संदर्भ,सारं सारं पुढं पुण्यात आल्यावर इतर वाचनात आलेलं आजही आठवतं....वाचतांना काही संदर्भ हाती लागतात..."                   "कर्मठ ब्रम्हण्यवाद हा स्वराज्याला लागलेला कीडसंसर्गजन्य आजार आहे.आणि तो विवेकाने नष्ट केला पाहिजे.तर आजीच्या आणि आजोबाच्या संकल्पनेतील मानवतावादी स्वराज्याचे पालन होईल!"                   ही छत्रपती शिवरयांकडून शिकवण मिळालेले लढाऊ-साहित्यिक संभाजी काव्य,साहित्य, पुराण,संगीत,धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेल्या अनुभवी जीवनाने वयाच्या १४व्या वर्षी  "बुद्धभूषणम" हा संस्कृत ग्रंथ रचतात आणि तत्कालीन राज्यप्रशासन कसे चालवावे,काय नियम असावेत या...