Posts

Showing posts from July, 2020
Image
"गावानं मदत उभी करायची होती ब्वॉ, गाव कसं ईसरलं!"                           गावाकडून बातमी कळली, अन क्षणार्धात डोक्यात विचार तरळले की,  "गाव इतकं कसं बेईमान व्हईल?" "पंचक्रोशीतील जगणारांच्या जाणिवांचा अन माणुसकीचा खात्मा झाला क्काय?" "निदान गावानं मदत उभी करायची होती ब्वॉ, गाव कसं ईसरलं!" "गावातल्या बुजुर्ग लोकांना तरी कळवळा यायलं पाह्यजे होती." "का गावाला हे सगळं माहिती नव्हतं?" "गावातलाच माणूस होता नं त्यो का परका होता?"                             पंचक्रोशीतील जनतेच्या आडल्यानडल्या वक्ताला उपेगी पडणारा माणूस होता ब्वॉ त्यो. वरीसभर कामात जुपलेला. पेरणीपसून तर विकणीपर्यंत उपेगी पडणारा हरहुन्नरी कारागीर होता त्यो. तरबेजी कास्तकार. मापगुण्याला प्यारा असणारा अन - "सगळं काम नीट व्यवस्थित झालं पाह्यजे ब्वॉ!"  असं म्हणणारा त्यो सुतार होता. दोरीसुतात काम उभं करणारा मिस्त्री होता त्यो.                 ...
Image
★★★जंत्रीतलं ग्यान★★★             [भाग-पाच] आधी लहान आकाराच्या दाबऱ्या करून मंग सूर धरून त्या दाबऱ्या ठेवनूसार मोठ्या करतात. एकदम मोठं सिद्र्र केलं त्त ते नंतर लहान करता येत नाही. नाही त्त ती बासरी हम्खास वायाच गेली म्हून समजा. त्यानं बासरीचा मेन बाजसूर भेसूर उपज्तो. बसरीच्या गोलाईत अन दाबऱ्याचा ढब निंघून जातो. काठ बेधड व्हतात. जित्की लांबी हैं तिथंपर्यंत होटानं फुकलेली हवेची झुकूळ पोच ठेवाव लाग्ती. पोच ढिली पडली की, सूर आचक्ती घ्येतो. यालं गुच्की बसनं म्हंतात. पोच अन पिच इथं कामा येती. पिच बसली की, पोच आखऱ्या तोंडावर जाते. 'आखऱ्या' म्हंजे जिथून सगळा नांद शेवटात येतो. अन निसर्गाच्या सानिध्यात सूर मिस्ळू लाग्तो. लैच हिस्सोब केला त्त गणिती ग्यान सांगाव लागल. मुखरीचं आंग्चं क्षेत्रफळ येक एम-एम ठेवून दाबऱ्याचंपन प्रत्येक आंग्चं क्षेत्रफळ येक एम-एम्चं ठेवाव. मुखरी त्ये पहिली दाबरी ह्ये आंतर दहा एम-एम्चं अन "रे ग म प ध नी सा" ह्या सहा दाबऱ्यातलं एकमेकांचं आंतर तीन सेमी करत आनाय्चं. अन शेवटात एक सिद्र्र येक एम एम्चं राह्यलं पाह्यजे याची खबरदारी घेनं जि...