★★★जंत्रीतलं ग्यान★★★
[भाग-पाच]
आधी लहान आकाराच्या दाबऱ्या करून मंग सूर धरून त्या दाबऱ्या ठेवनूसार मोठ्या करतात. एकदम मोठं सिद्र्र केलं त्त ते नंतर लहान करता येत नाही. नाही त्त ती बासरी हम्खास वायाच गेली म्हून समजा. त्यानं बासरीचा मेन बाजसूर भेसूर उपज्तो. बसरीच्या गोलाईत अन दाबऱ्याचा ढब निंघून जातो. काठ बेधड व्हतात.
जित्की लांबी हैं तिथंपर्यंत होटानं फुकलेली हवेची झुकूळ पोच ठेवाव लाग्ती. पोच ढिली पडली की, सूर आचक्ती घ्येतो. यालं गुच्की बसनं म्हंतात. पोच अन पिच इथं कामा येती. पिच बसली की, पोच आखऱ्या तोंडावर जाते. 'आखऱ्या' म्हंजे जिथून सगळा नांद शेवटात येतो. अन निसर्गाच्या सानिध्यात सूर मिस्ळू लाग्तो.
लैच हिस्सोब केला त्त गणिती ग्यान सांगाव लागल. मुखरीचं आंग्चं क्षेत्रफळ येक एम-एम ठेवून दाबऱ्याचंपन प्रत्येक आंग्चं क्षेत्रफळ येक एम-एम्चं ठेवाव. मुखरी त्ये पहिली दाबरी ह्ये आंतर दहा एम-एम्चं अन "रे ग म प ध नी सा" ह्या सहा दाबऱ्यातलं एकमेकांचं आंतर तीन सेमी करत आनाय्चं. अन शेवटात एक सिद्र्र येक एम एम्चं राह्यलं पाह्यजे याची खबरदारी घेनं जिकरीचं कारन ह्ये सिद्र्र म्हंजे सांडवा.
सांडवा भर्लेल्या धरनालं जसा नियंत्रनात ठेव्ता व्येग, आव्येग, प्रवाह, भर्ना, आंतर, थर, गळ्व्हाट ठेव्तो. तस्सा बासरीचा सांडवा हा सुरालं नियंत्रनात ठेव्तो. बसरीचा सांडवा सूराचा प्रवाह, व्येग, आव्येग, भर्ना, आंतर, थर, गळ्व्हाट ठेव्तो. सुचळ सूर वाहू लाग्तो.
होट अन बासरी म्हंजे प्रियकर प्रेयसी.
स्वास अन सूर म्हंजे प्रियकर प्रेयसी.
शब्द अन संगीत म्हंजे प्रियकर प्रेयसी.
क्रमशः-
विश्वनाथ साठे[9921056462]

Comments
Post a Comment