★★★SVEEP PROGRAMME MOVEMENTS ★★★
"हिरवळीवर चालून झाल्यावर थोडा निवांत वेळ...स्थळ -व्ही.व्ही.आय.पी. गेस्ट हाउस... यालंच सर्किट हाऊस म्हंतात...
म जरासं पोर्चमध्ये पाय लांबून...
तापकीरांना सहज विचारलं काय लिव्हता हो ब्वॉ...?
लॉगबुक लिहितोय...
काय काय अस्तं याच्यात...?
ठिकाणं, किलोमीटर, अंतरं, इंधन, खर्च, वेळा,व्यक्तींच्या नावानिशी हे सारं नोंद करावं लागतं...
अच्छा...बरं ह्ये ब्वॉ तुंम्चं...सारं हिसोबात...
तापकीर हसतात...मुखरी मुखरीच...तीन चार हा ह्या है..आवाज बाहेर पडतात...
हे स्वभावाने अगदी मनमिळाऊ, साहेब कुठं जायचं म्हणलं की,सर आपण ठरवाल तिकडं जाऊ..विनाकामाचं थोडंच फिरायचं आपल्याला...असं म्हणणार...अन हातावर एक टाळी देणार...
पण काही असो तुम्ही व्यवस्थेला तुमच्याशिवाय पर्याय बाकी ठेवत नाहीत...हे पटलं...साठेजी
काहीही म्हणू नक्का ब्वॉ तापकीर साहेब...अन हे आसं "जी" म्हणून तुम्ही लाजवू नक्का...
काल त्यांनी पुरणपोळी बनवून आणली...म्हणले लै बेस हाय...घ्या...
त्यांना मोडू शकलो नाही..तीन घास खाल्ली...गोड जास्त खात नाही म्हणून त्यांच्याकडं सरकवली...
सो...असे भन्नाट मन असणारे तापकीर किशोरदा कुमार,रफी,लता,अजीज,आनंद शिंदे गायक कलाकार आवडीचे...स्पेशल गाणे ऐकवितात दिवसभरात...
म्या म्हणलो झाली का झोप...तर म्हणे कुठं झोपलो..तीन चार क्लिक काढले नं... तुम्ही मुलाखतीत गुंग होतात....
मग दोघेही हसतो...पुन्हा पुढच्या ठिकाणावर...
दिवसभरात दीडशे ते दोनशे रनिंग होतंय.... तुझ्या फायलीचे पान पान लावतांना जी मोकळीक होती,उसंत होती,निश्चल निवांतु होता तो या धावपळीत इरलाय.. असो सरकारी दरबारी सूर पिळल्या जातात...आप्लं अस्तित्व आपुन है त्ये ठेव्लं पाह्यजे...बोललं पाह्यजे...लिहिलं पाह्यजे...
निर्णय ह्ये स्वतः व स्वतंत्रपणे घेतल्या गेले पाह्यजे...नियंत्रण हे स्वयंप्रेरणेला घातक... म्हून स्वयंप्रेरक व्हतं निर्णयन केलं पाह्यजे...काही निर्णय ह्ये काळाच्या परिप्रेक्षात काळाचं तत्व घेऊन असतात...काळात काळाची मीमांसा करत निर्णयन करणं गर्जेचं हाय
मधे मधे मानखेडकर साहेब,मदन सर,चव्हाण सर,अनुम्यांमचा संपर्क सुरूच..कोठे आहात... काही अपडेट्स...? दिल्लीवरून पटनाईक येताहेत...प्रोटोकॉल हाती घ्या...
हं सांगायचं राहीलं कैक दिवसानंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ओशो संस्थान,कोरेगावलं जानं झालं....मागे जी चर्चा झाली होती अन ते पुस्तक सांगितलं व्हतं ते घेतलंय... पुन्हा नव्याने त्यावर बोलेन म्हंतो...
बुद्धांचं - 'रती' संज्ञा आणि काळाच्या परिघावर फिरवलेलं संभोगातून समाधी ह्ये जंव्जाळ समीक्षेच्या जंत्रीतून ठेवाव म्हंतो...
निवडणूक काळात तापकीर सोबत असतात...दिवसभर पुणे पायाखालून जात व्हतं ते दिवस तोडून आता थंड झुळकीत आलेत...
पण ती पाणी फवरणारी बाई अन इथं मुक्त वाऱ्यात झुलणाऱ्या त्या स्त्रियां यांच्यातली तफावतही काळजाला जाळून जाते...व्यवस्थेच्यापुढे किती फवारे मारणार आयुष्यभर स्त्रीये...बये..??
अन नजरेसमोर असतात...संवाद साधणारे
दोन वेगवेगळ्या देशातील... स्त्री - पुरुष...
दुपारी उन टळलं की,FTI ला कम्युनिटी रेडिओवर "भारतीय लोकशाही व मतदान","नैतिक मतदान आणि युवांचा सहभाग","कुणाचाही,कशाचाही,बळी न पडता आपला हक्क म्हणून मतदान केलं पाह्यजे" अश्या विचायवरची मुलखात पार पडते की नाही तोच नेयुके आणि युवा धोरण व क्रीडा संकल्पना अशी एक थोडी बाईट होते...धावपळीतच पुढं...गरवारे कॉलेज...युवकांच्या पुढ्यात...
उन उतरलं की प्रोटोकॉलला हाती घ्यावं लागतं...
एस्कॉट,ताफा,घरघर,पण मानसिकता हाये ती सांभाळत...
सायंकाळी व्ही.व्ही.आय.पी गेस्ट हाउसलं येणं व्हतं...सुग्रास भोजन...म पोर्चमध्ये त्यांच्या नोंदी....ते लिहितात...
सर्किट हाऊस,कल्याणीनगर,घोले रोड,महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, मथुरा स्वीट येथे दुपारभोजन..पुढं मंडईमार्गे कॅम्प...कयानी बेकरी...याविषयी स्वतंत्र लिहिणार आहे...सो पुढे लगेच FTI ला, डेक्कन गरवारे कॉलेज कॅम्पस...अन नेयुके ऑफिसमध्ये व्हिजिट करून...
हयात हॉटेलला... मानखेडकर सरांची भेट होते... सायंकाळचा नास्ता होतो...
म अंधार पडू लागतो...कुणीतरी हसू लागतं... अन तापकीर साहेबांना हाक मारून...साहेबगाडी ...चला...हवेलीपे...जाना हैं...
पुन्हा सर्किट हाऊस...
च्या आयुष्यात घश्यात उतरला नाही...म दूध केशरचं....
रंगीन लाईट झगमगाट...नाना ठिकाणं... नाना भेटीगाठी..नाना विषय...संविधानिक तत्वाला धरून...अन बरंच काही...हाये..आजच्या धावपळीच्यात ह्ये एव्हढं...होणं
अरे हो... इल्यु !
तुझ्या शब्दांचा आठव होतो...."
-विश्वनाथ साठे[9921056462]

Comments
Post a Comment