Posts

Showing posts from December, 2020
Image
       "वास्ततवातला इतिहास बदलत आहे वास्तव!"  केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व कार्पोरेट धार्जिन्या तीन काळ्या कृषि कायद्या विरोधी पंजाबहरियाना, उत्तरप्रदेश सह संपूर्ण भारतातील सर्व राज्यातून! सुमारे ५०० हून अधीक शेतकरी संघटना 'अभी नही तो कभी नही' अशा स्वरूपाचा निकराचा लढा देण्यासाठी दिल्ली येथे धडकल्या आहेत. या कायद्य्या द्वारे मोठे भांडवलदार करार शेतीच्या माध्यमातून शेतकर्यांना वेठबिगार बनवून त्यांचे अपरिमित शोषण करून त्यांना देशोधडीला लावतील. C2 अधीक दिडपट हमीभावाचे कवचही याने संपुष्टात येईल. MRP ज्या प्रमाने ग्राहकांचा हक्क होय तद्वतच MSP हा अन्नदात्या शेतकर्यांचा मूलभूत हक्क होय. हा मुद्दा हे आंदोलन केवळ शेती व शेतकरी वाचविण्या साठीच नव्हे तर, दूरगामी विचार करता शेती वाचली तरच उद्याआपन सुग्ध्दा वाचू शकू, शेती क्षेत्र जर का धनदांडग्याच्याहाती गेले तर आपन सुध्दा उद्ध्वस्त होऊ  गाव नुसताच गाव नसतो कधी, गावात असतात माणसं,गुर ढोर, असतो शिवार गावाला,शिवारात असते माती, मातीवर तरारून येतात कणसं, कणसांचा संबध असतो आतड्याशी, गावमाणसांच्या कातड्याशी, कणस...