Posts

Showing posts from August, 2019
★★★"मिलाई रस्त्यावर आली...!"★★★ -भाग 6 ते 10 "क्काय सांगू नाथ्थब्वॉ....!" "पुढं क्काय होतंय त्ये सांग नं...जीव हुरूर झालाय..." "आय्क....!" "हातालं काम लाग्लं की त्वंडात घास पडाय्चा.कैक सांजेलं दुर्डी तुकड्यावाचून रिकामीच. पोटं भुकेनं कळकळ झालेले.मिळ्कतुकीचं मजुरीसिवा साधन नाही.घाम गळाव तव्हा घरची मीठमिर्ची भागाय्ची. बा खंटीचे काम करून माती उकरू उकरू थकत चाल्ला व्हता.त्यालं मातीचे टोप्ले उचलून बर्गाडीत सिनक उफ्नत व्हती.उन्हांनं त्यो काळाठिक्कर झाला व्हता.बर्सादित फुटक्या पतरामुळं घर सादाळाय्चं.फाटक्या गोधड्यातून हिव अन खालून वदाडपानी डोळ्याची झोप हाकलून देई. हिवाळ्यात टिक्कोर चांदनं डोळ्यात भरत खपाटीपोटानं राती ढक्लाय्च्या." "आम्ही सगळे आठ त्वंडं खानारे.माय बा राबायचे.त्याहीनं ढोरांसारखं कामं कराय्चं.पोऱ्हं काखत घालून माय सुगीत हाब्रेड खुडाय्लं,बांधाय्लं,पडाय्लं, निंदनाच्या घाती निंदाय्लं,काड बडवाय्लं,तुरी उपनाय्लं जावाव.धुऱ्य...
★★★"मिलाई रस्त्यावर आली...!"★★★ -भाग 1 ते 5 "त्यो चेहरा इद्रुप झालाय रे....आसी नव्हती मिलाई....!" त्यो भडकन बोलून गेला.पुढचं काही बोलनं गर्दीमुळं इरत होतं. "नाही..ती मिलाई नाहीच....!" "येव्हढ्या लांब कस्यालं येईल ती...." "अन रस्त्यावर.....नाहीच....!" "आस्यानं आणखीनच इद्रुप होईल तिचं जिणं..!" त्याची नजर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं गेली.अन पुन्हा त्यानं खिस्यात हात घातला.पन तसाच रिकामा हात बाहेर घेत त्यो त्या गर्दीकडं पाहू लागला.ती आकृती गर्दीत इरून गेली.दिसेनाशी झाली.मान्सात मान्सं मिसळतात तसी.त्याची शून्य नजर ठाव घेत होती.नाना प्रश्न थैमान घालू लागले.कैक ईच्यार येऊन मेंदूला कोरून गेले. रस्ते गावालं कोरून लांब जातात. ते शहरालं कोरतात.अन पायाच्या भेगालंही.त्याच वेदना पोटातल्या आतड्यालंही. गाव सोडून कैक काळ झालाय. गाव धुमसत चाल्लेत मान्सावाचून.घरं फुटू लाग्लेत.अन इथं शहरं भोपळ्यासा...
गीत लेखणीने अमर झाले नाव अण्णाभाऊंचे पनावरती इतिहासाच्या कोरिले सत्य मानवाचे.....//धृ// भीमा उकरतो मढी काढी स्मशानी सोनं लैय तळमळतो तुका केला घात बोटानं जगण्यासाठी संघर्षाच्या जोखिले रण मरणाचे.....//1// भाकरीसाठी मौताग भोमक्या उभ्या जगात रांडक्या व्यवस्थेशी आहे सवाल शब्दांत न्यायासाठी भुकेल्यांच्या मांडिले बंड बंदीस्तांचे.....//2// खांडुनि रितिरुढीला। आवडीनं घाव केला जुलमी पुरुषार्थाचा डाव तिनं मोडला उद्धारासाठी स्त्रीजातीच्या तोडिले बंध अन्यायाचे -विश्वा
"म्हणे विश्वा साठे अण्णाभाऊ लेखणीने नवमानवा घडवू सत्याची जाण नीती वाटंला सूर्य जगी एकीचा पाहू...!" -विश्वा

काव्य

"मम कवनांच्या कायेवरती शृंगार कल्पनेचे न  जडले.... पहिले दिले अनुभवले सारेच ते शब्दाकाव्या घडले...!"                                                          - विश्वनाथ साठे