Posts

Showing posts from September, 2022
Image
  खंड पंचम - संघ अनुयायी - भिक्खु, गृहस्थ - उपासक हे दोन वर्ग संघामध्ये असतात. सत्यज्ञानाचा शोध - परिव्राज्यक फार जुनी संस्था आहे. प्राचीन परिव्राज्यक कौटुंबिकत्व सोडून इतस्थ परिभ्रमणात करणारा समूह म्हणजे संघ असे म्हणायचे. त्यात स्त्रिया पण असत. नियमरहित ही संस्था असे. प्रथम तथागतांनीच या परिव्राज्यक प्राचीन संस्थेचे रूपांतर संघामध्ये केले. त्यांना उपदेश, उद्देश, नियम दिले. बौद्ध संघात केवळ एक भेद होता तो भेद म्हणजेच लिंगभेद. स्त्री भिक्खुनी व पुरुष भिक्खु असा तो भेद असे. संघातील घटकाचे दोन वर्गात रूपांतर व्हायचे. १) श्रमनेर २)  भिक्खु श्रामनेर हा वीस वर्षाखालील तर भिक्खु संघ हा वीस वर्षाच्या पुढील. त्रिशरण - बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाणे म्हणजे त्रिशरण. बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम शरणम् गच्छामि, संघम शरणम् गच्छामि' अशाप्रकारे या त्रिशरण मध्ये द्वितीयंती आणि तृतीयंती अशा प्रकारचे चरण लावून त्रिशरणाचे नऊ पद निर्माण होतात. ते मिळून त्रिशरण होते. दशशीला - अहिंसा, अचोरी, ब्रह्मचर्य, सत्य अमद्यपान, अवेळी अन्नसेवन, असभ्य अनैतिक वर्तन, अलंकारविहिन शरीर,ऐश्वर्यारामापासू...
Image
  खंड  चतुर्थ - धर्म - Religion आणि धम्म धर्म - Religion म्हणजे काय ? - धर्माचा मूळ गाभा केंद्र बिंदू - धर्माच्या अवस्था - १) आदिमानव काळात धर्म व जादू एकच समजूत होती. वीज, वारा, वादळ, पाऊस, पूर, भूकंप, ज्वालामुखी, नैसर्गिक संकटे ही निसर्गातील जादू ही एकच समज समजत होते. चमत्कारिक प्रयोग तो समजत. कार्यकारण भाव समजत नसे. व निसर्गाचे ज्ञान त्यास नव्हते. २) विधी, कर्मकांडे, धर्मसूत्र, प्रार्थना, यज्ञ, पाठ, इ. स्वरूप त्यास आले. ३) देवाने हे जग निर्माण केले ही रूढ झाली. मानवी मनावर ही संकल्पना स्थापल्या गेली. ४) दैवी आणि सैतानी - हितकारक आणि नाशकारक अशी संकल्पना रूढ होऊ लागली. धर्माचे स्थित्यंतरे- १) प्रारंभी ही शक्ती अज्ञात, अज्ञेय आदिमानव ज्ञानसामर्थ्याच्या पलीकडे होती. २) ती सैतानी - दैवी असे ही समज होती.  ३) मानवाला सुखर जगण्यासाठी तिला पर्याय  म्हणजे प्रसन्न करून घेत. ४) दैवी - सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी गौण कर्मकांडे आवश्यकता भासली. धर्माचा गाभा व निसर्गनिय - १) माणसाला आत्मा आहे. २) तो अमर आहे. ३) कर्माचा जाब देवासमोर देणे लागेल ही समजूत रूढ ...
Image
  तृतीय खंड - बुद्धांनी काय शिकवले - धम्मामध्ये बुद्धाचे स्थान - ख्रिस्ताने धर्मीयांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले - ख्रिस्ती धर्म इस्लाम धर्मात मुमुक्षुने प्रथम महंमद प्रेषित आणि महंमद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानल्याखेरीज मोक्ष (निजात) नाही - इस्लाम धर्म बुद्ध धम्मात असे स्थान बुद्धांनी स्वतःसाठी ठेवले नाही. धम्म म्हणजे शोध. पृथ्वीतलावरील मानवांच्या जीवनाचा सखोल. या अभ्यासातून जो उदयाला तो धम्म. बुद्ध निर्माणानंतर पहिली संगिनी (संगिती) झाली त्यात उपाली, आनंद, कपिलवस्तूवाशी व काश्यप हा अध्यक्षतेत होता. संघाची ही बैठक होती.तथागत गेल्यावर काश्यपाने बुद्ध जीवनातील घटनांवर चर्चा करायला हवी होती. परंतु तसे झाले नाही. बुद्ध आणि त्याचा धम्म या दोन गोष्टी अगदी अलग होत. धम्म हा स्वतःच उत्तराधिकारी. अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे. त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. मी मार्गदाता आहे. मोक्षदाता नाही. बहुतेक ध...
Image
  द्वितीय खंड - धम्मदीक्षेची मोहीम - बुद्ध आणि त्यांचा विषादयोग - असे घडते आहे तसे घडू न देणे - विवेकाधीन. स्वस्थ बसणे हे योग्य नाही - कर्तव्यविवेक. बुद्ध ज्ञानप्राप्तीनंतर निष्क्रिय अवस्थेकडे गेले असता त्यांना ब्रह्म सहंपती नामक व्यक्तीने सांगितले, "जगाला तुझ्या ज्ञानाची गरज आहे. म्हणून उद्युक्त केले व बुद्ध आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याशी निश्चयी झाले." धम्म म्हणजे काय? बुद्धिवादी मार्ग, धार्मिक भोळसटपणातून मुक्तता, मध्यम मार्गाचा उपदेश, अधर्म, मैत्री, कारुण्य व भातृभावाची शिकवण, बांधवाची, बंधमुक्ताची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत, सत्य - संपूर्ण सत्य व सत्याशिवाय काहीही नाही, समतेचा वारसा, आशा, विश्वास, धीर, दुःखाचे ओझे नष्ट करण्याचे तत्व म्हणजे धम्म होय. परिव्राज्यकांची धम्मदीक्षा   - तथागतांचे सारनाथ येथे आगमन पाच परिव्राज्यकांना धम्मदीक्षा. मज्जिम पतिपद म्हणजे मधला मार्ग. मज्जिम. उपभोगायचा ही नाही आणि आत्मक्लेषही नाही. नैसर्गिक गरजांच्या परिपूर्तीचा विचार म्हणजेच मलीन विचारापासून मुक्तता. ज्या गोष्टींचे आकर्षण कामवासनेच्या दृष्टीने होते त्यात विषयासक्त ड...
Image
  बुद्ध आणि त्यांचा धम्म - भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर प्रथम खंड - बुद्धांनी परिव्रज्या का ग्रहण केली? मृतदेह, रुग्ण, जर्राजर ह्या तीन गोष्टी तथागतांनी पाहिल्या ही गोष्ट पारंपरिक मताला अनुसरणारी आहे. स्वप्न - हिमालयातील मानस सरोवर येथे सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामायेच्या स्वप्नात आला. आणि असितमुनीला राजा शुध्दोधनाच्या घरी येण्याची ईर्षा होते आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने आलो आहे. महापुरुषांची बत्तीस लक्षणे व ऐंशी शुभचिन्हांनी युक्त मूलाला उचलून असितमुनी उचलून रडू लागले. माझे आयु संपले आहे आणि आता तथागत मला दिसणार नाहीत. हे मूल बुद्ध होऊन धम्मचक्रपरिवर्तन करतील तेव्हा मी नसेन. मी म्हातारा झालो असेन. सेवा करता येणार नाही. सात दिवसांचा सिद्धार्थ असतांना आई - महामायेला बाळंतपणात आजार जडतो व ती निधन पावते. सिद्धार्थाचा धाकटा भाऊ नंद, महानाम व आंनद या लहान मोठ्या भावसह सिद्धार्थ मोठे होत होते. अशावेळी सिध्दार्थचा परतपाळ त्यांची मावशी महाप्रजापती यांनी केला. शेतावरील मजुराचे चित्रण पाहून तथागत पहिल्यांदा जगातील श्रमसंस्कृती अनुभवत होते. भांडवलवाद समजत होते. नगरात ...