★★परिवर्तनाचा "सुगावा" लावणारे प्रा. विलास वाघ सर!★★★ सकाळी एका स्नेहीने मला फोन करून माहिती दिली. अरे विश्वा तुझ्या कादंबरीची रचना आणि सूचना सांगणारे वाघ सर आता नाहीत रे! मी म्हणालो असं बोलू नकोस काहीही. मला खरं काय ते सांग. आणि त्याने माहिती दिली. की गेली काही दिवस वाघ सर आजारी होते. कार्यालयीन कामकाज आणि विचारांचं मंथन यांनी ते जीर्ण पणासारखे जाहले होते. आणि या कोरोनाच्या काळात त्यांनी विविधांगी विश्लेषण केले होते. मी आजही तो सुगवाचा अंक वाचतो आहे. आणि माझ्या हाती पडलेला पहिला अंक मी बोराडी ता शिरपूर, धुळे येथे वाचतो आहे. संपादकीय वाचून तो अंक मी होस्टेलवर आणतो आणि भराभर वाचून घेतो. अंक आवडतो. त्या अंकाची रचना, संपादकीय, त्यातील घेतलेले लेख आणि त्यातील वैचारिक बांधणी ही प्रामुख्याने आजही भुरळ घालते. मी ठरवलं होतं की या अंकाच्या संपादकांना भेटायचं कुठेही असो. आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी पुणेला आलो. इथे बऱ्याच संपदकांशी मैत्रीही झाली पण वाघ सरांशी भेट नव्हती. शोधत होतो. शेवटी सदाशिव पेठेत पोचलो. आणि जानेवारी 2019ला भेट झाली सरांची. सर थकले होते. तरीही वैचारिक मांड अग...