"वेदना - कैक अंतरंगाच्या रेघुट्या" इथल्या मातीनं रेघुट्या हैत. सजीवं कैक रेघुट्या पाह्यतात. त्या रेघुट्या सत्येच्या अस्तात. जुलूमजबरीच्या अस्तात. हुकूमशाहीच्या अस्तात. गुलामगिरीत खितपत पडलेल्या संघर्षाच्या अस्तात. त्या रेघुट्या अशांत शांततेच्या असतात. सरळ, वाकड्यातिकड्या, नागमोडया, गोल अश्या कैक आकारांच्या रेघुट्या अस्तात. कधी त्या अज्ञानात धगधगत अस्तात तर कधी घामेजल्या डोळ्यांच्या खोबणीत निस्तेज. कालपरवा गावाकडं जानं झालं. सगळं हिरवं रान डोळ्यांत मावत नव्हतं. तर हिरवं रान डोळ्यांच्या खोबणीतून जाणिवेच्या ठस्यापर्यंत नेत होतो. सगळेच नेतात. कधी ही प्रक्रिया थातूरमातूर असते. कधी सखोल नेणिवेसह ठासिव असते. हेच हिरवं रान उन्हाळ्यात कोर्डंफट्टक होतं. रानाची रयाते जाते. निस्तेज होतं जातं सारं. त्या डोळ्यांच्या खोबणीतल्या रेघुट्या सारखं. "पण कोणत्या ह्या रेघुट्या?" "का निर्माण होतात त्या?" "कोण जन्म घालतं या रेघुट्यांना?" "त्या डोळ्यांच्या खोबणीतच का?" "कैक प्रश्न आहेत तसेच आहेत?" विचारांचं एक जाळंच तयार होत जातं तेही रेघुट...
Posts
Showing posts from October, 2019
- Get link
- X
- Other Apps
अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्र – संपादकीय मुलाखत मा. राहुल थोरात – विश्वनाथ साठे " नमस्कार!" " मी विश्वनाथ अर्जुन साठे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे येथून आलेलो आहे. आणि हे ठिकाण म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या निर्मितीचं ठिकाण. सांगली येथे आपण आहोत. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बरीच पुस्तके विचारधारा आणि तत्वांचा साठा आपल्यासमोर आहे. त्या अनुषंगाने विविध मासिके , साप्ताहिके , पाक्षिके , आपल्या वाचनात येतात आणि आपल्याला वैचारिक विचार करावा लागतो. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे पुरोगामी विचार घेऊन जाणारं महाराष्ट्रात गेली 29 वर्ष काम करणारं हे मासिक सांगली येथून प्रकाशित होत असतांना आपल्या समोर मा. व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात हे आहेत." "नमस्कार!" वार्तापत्राचे सामाजिक आणि वाड्मयीन मूल्यमापन या अनुषंगाने आपण अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सामाजिक आणि वाड्मयीन मूल्यमापन म्हणजेच जेव्हापासून वार्तापत्र सुरू झालं. ते आजतागायत या वार्तापत्राची स्थिती काय आहे ? सद्यस्थिती काय आहे ? या वार्तापत्...