Posts

Showing posts from August, 2020
***अण्णा भाऊ साठे समजून घेतांना-भाग-एकतीस*** गेल्या शंभर वर्षांपूर्वीपासून ते आजतागायतच्या सर्वोतोपरी परिस्थितीच्या वास्तव जाणिवांपर्यंत सर्वंकष - सखोल आणि सत्यत्येपर्यंत जाणे म्हणजे विविध दृष्टिकोन - कैक पैलूंनी पडताळून - जोखून मांडत राहणे ही जिवंतपणाची मती. हे वर्ष तुकाराम भाऊ साठे या व्यक्तिमत्वाच्या जन्माचं शंभरी उलटलेलं वर्ष. या शंभर वर्षाच्या काळानं कैक बाबी पोटात लपेटत आपलं अजस्त्र - ठाशीव - चमकुरं असं अस्तित्व कालपटलावर उमटवलेलं आहे. जितकं ते अजस्त्र - ठाशीव - चमकुरं असं आहे तितकंच ते न्यून - तकलादू - रंगहीन असं अस्तित्व आहे हे ही या अर्थाने लपित कळायला हवं. पुढील काळावर या शंभर वर्षाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा रेखीवपणे असणार आहेत. ह्या रेखीव - कोरीव काळाचं भान विसरून कोणताही अभ्यास करणे काळ समजण्याकरिता हितावह नसेल. व्यक्तिव्यक्तितील विकारांच्या लहरी शारीरिक - मानसिक - भावनिक - नैतिक - आर्थिक - सामाजिक - राजकिय - भौतिक बदलांनी उफाळण्याचा काळ आजही आहे तसाच आहे. इव्हन विकारांच्या लहरींचा वेग आता दुणावल्या गेलेल्या अवस्थेत आहे. रोज कित्त्येक अन्यायकारक बाबी खांद्यावर घेत समाजजीवन...