***अविस्मर्णीय शब्दक्षण*** "आता डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सर आपल्यात नाही!" विनम्र आदरांजली...💐 ".....त्या दिवशी म्या पाह्यटंच आंघुळ करून तयार झालो होतो.कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे-मराठी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय गझलचर्चासत्राचा दुसरा दिवस होता.पहिल्या दिवशी धावपळीतच तिसऱ्या सत्राचं मोठ्या गरबडीत सूत्रसंचालन झालं.पाहिजे तसं मन भरलं नव्हतं.गझलगंधर्व व महाराष्ट्रातील आद्य मराठी गझलगायक सुधाकरजी कदम सरांचे ते अध्यक्षित सत्र होतं.पण भारतीय नियमानुसारच का म्हणा नियोजित वक्त्यांनी पोटभरून मनोगते व व्याख्यांनं दिल्यानं तिसऱ्या सत्राचा डहारा फुटला.स्टेजवर बराच वेळ"आता वेळ मिळत नसेल तर हे सत्र उद्या घ्यावं....!"अशी रसिकातून उभळ सुटू लागली.मग विभागाच्या प्रमुख संगोलेकर सरांनी माईक हाती घेऊन विनंती केली की,प्रत्येकी पाच मिनिटे दिली जातील.आणि लगेच गझलगायनाला सुरुवात करू.श्रोते चुळबुळत होते तसे कलाकारही.हे मी एका कोपऱ्यातून न्याहाळत ...