Posts

Image
  ★★★म. फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील दुवा - लोकराजा राजर्षी शाहू !"★★★ जागतिक स्तरावरील सामाजिक उन्नतीचे स्तर तपासून पाहिले की, काही प्रवाह दिसतात त्यामध्ये प्रामुख्याने एडमन बर्क, थॉमस पेन, - राजकीय परिवर्तनाचा स्वीकार करणारा प्रवाह आहे.  परंपरेत राहून बदल करणे -एडमनच्या प्रवाहाने स्वीकारले. परंतु या प्रवाहाच्या परिप्रेक्ष्याची जर चिकित्सा करायची ठरली तर परंपरा छेद करून बदल घडविणे - थॉमस या प्रवाहाच्या अनुयायांनी म्हणजेच भारतीय उपखंडात म. फुले, आगरकर, महर्षी सिंडे, ताराबाई , सावित्रीबाई, मुक्ता साळवे इ. नी परंपरेतील अनिष्ठ रुढ पद्धती आणि विचार काढून टाकणारे तत्व अंगीकारले . परिणामी म. फुले तर घरातून बाहेर पडले आणि बदल करविला.  याउलट अनुयायी रानडे, लोकमान्य हे परंपरेत राहून बदल करण्याचा अट्टहास करतात हे एडमन चे पुरस्कर्ते.  वास्तविक मानवी स्वातंत्र्य आणि मूल्यविचारांचा गाभा - फ्रेंच क्रांतीचा क्रिटिक - एडमन यांच्याकडे पाहता येते. भारतीय जाणिवेत महाराष्ट्रात फुले ते आंबडेकर यांच्यातील दुवा राजर्षी शाहु असा ठरतो. कारण ते आग्रहाने आणि अनिष्ठांचे विचार नष्ट व्हावे म्ह...
Image
 "तथागत समजून घेतांना..." जीवणी- "आपल्यात हे असं सतत युद्ध का होतं? कोणतं तत्व जगतो आपण दोघेही? कळव नं तुझ्या शब्दांत!"  जीव- "जगाचा इतिहास जाणला तर युद्ध ही संज्ञा सजीवांच्या एकत्रीकरणाला भेद पाडणारी आहे. वैश्विक मानव समूहाचे सहजीवनच नष्ट करणारे युद्ध इथे झाली आहेत. आणि होतीलही. आपण सज्ञान सजीव आहोत. जीवतत्वाने एक आहोत. जरी टोकाचेबिनटोकाचे वाद असतील नसतील तरीही आपल्या दोघांतील हे युद्ध एकत्र येण्याकरिता आहे, परिवर्तनीय सहजीवन जगण्याकरिता आहे, भेदासहित दुरावा नष्ट करण्याकरिता आहे! व्यवस्थेने निर्माण केलेल्या अत्याचाराच्या विरोधातील महात्म्यांच्या सारतत्वाचे हे जगणे आहे. यात शोषण नसेल, अन्याय्य नसेल, भेद नसतील, दंडकशाही नसेल, दुराभाव नसेल, दुष्टता नसतील आणि असे युद्ध मोलाचे आहे. असे युद्ध इतिहासातही नाही. कारण आपल्या युद्धाच्या मुळातील तत्व हे तथागतांचे तत्व आहे. जगाप्रति या अफाट सजीव विश्वाप्रति तथागतांनी तत्व योजिले होते ते आहे. म्हणून हे युद्ध तत्वनिष्ठ असं सप्रमाण आहे. -विश्वा
Image
  "मह्या भिमानं, मह्या बाबानं, सोन्यानं भरली ओटी" "भविष्यात ह्या करू नको चुका" या अजरामर गाण्यांने जगाला भुरळ घातलेले गीतकार उत्तमदादा फूलकर, वय ७५ वर्षे यांचे आज सकाळी ८:00 वा. बुलडाणा जिल्ह्यात दुःखद निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनाचा आवाज हरपला. त्यांच्या विचारस्मृतीस भावपूर्ण आदरांजली !!                           कडूबाई खरात, शुद्धोधन, आशा चवरे, आदी नामवंत गायकी क्षेत्रीय कलावंतांनी उत्तम दादा फुलकर यांचे हे गीत गाऊन त्यांना देशभर पोहोचविले. गरीब जनतेला भीम अशाप्रकारे कळत होता. त्याची चळवळ समजत होती.  उत्तम दादा हे मूळचे पडोळी येथे रहायचे. नंतर ते शेवटी शेवटी बुलढण्यातील खामगाव याजवळील जलंब या गावी आले. त्या काळात त्यांनी, "कुठवर आता उत्तम राहील मुका" असे परखडपणे सांगून ते फुले शाहू आंबेडकर चळवळीचे पुढील पाऊल कसे असावे हेच उघड केले आहे.  बाबासाहेब आंबेडकरांची दलित चळवळ गायक, कवी, गितकारांनी जनसमुदायासमोर साहित्याच्या माध्यमातून नेत भारतीय सामाजिक न्याय आणि संघर्षाची बीजे, पाळेमुळे रुजविली आहेत....
Image
 बुद्धाची प्रेयसी... यशोधरा...! बुद्ध म्हणजे शांतता.... बुद्ध म्हणजे प्रेम... बुद्धाने सांगितली तीच जगण्याची युक्ती बुद्धाचा मार्ग... हीच खरी मु्क्ती... पण बुद्ध बुद्ध होण्याआधी एक शाक्त कुलातला एक राजकुमार होता. जगासाठी कणव वाटणारा, दु:ख पाहून तळमळणारा, हिंसेमुळे आहत होणारा एक दयाळू राजकुमार होता... सिद्धार्थ होता... सिद्धार्थाला जगाच्या सगळ्यांच्या दु:खावर औषध शोधायचं होतं. मुक्तीचा मार्ग शोधायचा होता. सिद्धार्थाचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून जीने स्वत:च्या संसारसुखावर पाणी सोडलं... ती यशोधरा... त्याची सहचारिणी...  हा त्याग म्हणजे खरं प्रेम...  सोबत जगता आलं नाही म्हणून रोमिओ जुलिएट, हिर-रांझा, लैला मजनू सगळ्यांनीच आत्महत्या केली.  पण सिद्धार्थाची आकांक्षा पाहून यशोधरेने या सहवासावरच पाणी सोडलं... तेही कायमच... यशोधरेचं इतकं उदात्त प्रेम हे इतिहासात कायमच दुर्लक्षित राहिलं.  सिद्धार्थ राज्य सोडून गेला. पुढे शाक्य कोलियांमधला वाद मिटला. सिद्धार्थाला परत बोलवायला काही हरकत नाही असं शाक्यांमधले ज्येष्ठ बोलू लागले.  फक्त यशोधराच त्याला बोलवू शकत होती. पण तिने ...
Image
 "महाराष्ट्राच्या काळजाचं रक्त ओरबडणारी धमनी - समृद्धी महामार्ग!" - विश्वनाथ साठे सहज एक प्रश्न काळजाला चाटतो आहे. ही समृद्धी नेमकी कुणाची? रस्ते की शोषणाचे राजरोस महामार्ग जाळे? विदर्भ हा नैसर्गिक खनिजांचा साठा असलेला प्रदेश म्हणजे चलनवलनाची खाणच. सर्व कच्च्यापक्क्या भौतिक - मानवी - प्राणी - पशु (नैसर्गिक) मालमत्तेचा लूटप्रवाह यापूर्वीही आणि आता तर सहापदरी महामार्गाने राजरोस होतो आहे.                   महाराष्ट्रात अशी आडवी रेष का ओढली भांडवलशाही वर्गव्यवस्थेने? वास्तविक पाहता ९७ टक्के इतकी  खनिजसंपत्ती विदर्भात असून उर्वरित ३ टक्के कोकणकडे आहे. या संपत्तीत कोळसा, डोलोमाईट क्रोमाइट, बेराईट, कायनाईट व सिलीमनाईट बॉक्साईट, चुनखडी, मॅगनीज, लोहखनिज आदींचा समावेश आहे. भारतीय खनिज संपत्ती सर्वेक्षणानुसार ६ हजार ९५६ दशलक्ष टन खनिजांचे साठे विदर्भात आहेत. पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात हे मोठे साठे आहेत. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३% क्षेत्रफळात खनिजसंपत्ती सापडते. तस...
Image
 "रित्या ओंजळीत माझ्या" - प्रा. पैलवान  "नव्या उत्तर आधुनिक स्त्रीवादाचा नवा आवाज!"  प्रा. पैलवान यांना विविध पुरस्कार आणि सत्कार झालेले आहेत. विविध संस्थांच्या संयोजक - नेतृत्व आणि दि लीडरशिप ऑफ सोशलिजमकरिता खंबीर नेतृत्व राहिलेल्या आहेत. त्यांचा "तुझी माझी मैत्रवेल" हा दीर्घ काव्यसंग्र प्रकाशित झालेला आहे. तासगाव तालुका महिला दक्षता समिती सदस्य म्हणून त्यांची निवड आहे. हा सगळं सामाजिक - साहित्यिक व्यवहार सुरू असताना त्यांनी जो संवेदनशीलतेचा दर्शनी भाग आपल्या साहित्यामध्ये समाजाचे बदलते शास्त्र म्हणून ठेवताना पारदर्शक पद्धतीने ठेवलेला आहे. ही त्यांची वेगळी भूमिका साहित्यात - साहित्य व्यवहारात आणि सामाजिक नीती मूल्यांच्या संकल्पना रुजवण्यामध्ये अत्यंत मोलाची ठरणार आहे. म्हणून त्यांची अभिव्यक्ती ही केवळ एका व्यक्तीपूरती न राहता ती सामाजिक होते. तिचे संदर्भ हे वैश्विक जीवन जाणिवेला ग्रासत आधार देतात.                     अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज असण्याच्या काळामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये एका स्त्रीने पुरु...
Image
  "तुझी माझी मैत्रवेल" - प्रा. पैलवान  # “सामाजिक मूल्यभान जगविणारी संहिता!”                     प्रा. पैलवान यांनी "तुझी माझी मैत्रवेल" हा जो काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर जी काव्यसंहिता वाचक - रसिक - समीक्षक आणि प्रकाशन क्षेत्रात आली यामुळे मैत्री या वैश्विक संज्ञाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या क्षेत्राला येणार आहे. ही दीर्घ काव्यसंहिता आहे आणि या दीर्घ काव्यसहितेतून केवळ मैत्रीवर बोलताना प्रा. पैलवान यांनी जो आशय दिला आहे आणि सामाजिक स्तराला वैश्विक स्तराचे अनुबंध जोडले आहे त्यामध्ये खूप मोठी ताकद आहे.  साहित्याच्या वळणावळणावर आलेली वेगळी मर्यादा ही कविता थोडक्यात सांगते. एक असं वाक्य आले आहे की-  "मित्र आयुष्याचा  एक वळणावर  अनेक वादळ येतील आणि निघूनही जातील  त्या वादळात अखेरपर्यंत टिकून राहायचं आहे तुला"  ही आत्मभानाची जाणीव वाचकांसमोर ठेवताना स्वतःचे आत्मभान आणि मित्राला आत्मभान दर्शवण्याचा सहसंबंध येथे सामाजिक दृष्टिकोनचा स्पर्श प्रस्तुत कवितेतून ...