Posts

Showing posts from March, 2022
Image
 ★★★शोषणाचा तिढा अन नितीतत्वांचा लढा★★★ "किती खोलवर विचार करतात माणसं..." "आणि काय जगत असतील.निस्सीम.पूर्णांशाने...!"                        सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातून शिकत असतांना त्यावेळी साहित्याचा अभ्यास करताना काही महत्वाच्या साहित्यकृतीही वाचनात येऊन गेल्या. विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. मनोहर जाधव सरांच्या तासाला तर आंबेडकरवादी मतप्रवाहाचे विश्लेषण अगदी आग्रहाने ते सांगतात. अस्मितादर्शचा  इतिहास, नामांतर चळवळ, दलित साहित्याच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सामाजिक स्तिथी सांगताना खूप खूप गोष्टी खूप मार्मिक व समीक्षेची साधने हाताळत सांगतात. त्याबाबतीतही तुमच्या विषयी माहिती आणि वैचारिक साहीत्य विषयी सखोल अशी चर्चा घडून येई.                       "तिमिरातुनी तेजाकडे" हे सदर नियमित वाचत आलो आहे. पहिल्यांदा याचा मला खूप जड शब्दशः अर्थाने चिकित्सक अभ्यास अवघड वाटत होता. पण वाचत होतो ते काहीतरी मोलाचे आहे म्हणून अवघड कर...
Image
काल पर्वा खूप मानसिक त्रासात होतो. माहीत नाही का परंतु खूप मानसिक त्रास झाला. असे कधी तरी  होते. अशी एक मानसिकता असते. खरे तर मानव हा प्राणी जितका भावनिक तितकाच तो सामाजिक आणि जैविक आहे. त्याचे सजीवपण हा एक संवाद असतो विज्ञानवास्तवाचा. आणि त्याचे भावनिक होणे आणि तसे जगणे हा एक मानवी अस्तिवाचा प्रकार असतो. अस्तित्व आणि मानव असा एक भाग सजीवसृष्टीत अभ्यासायला मिळतो आणि हा भाग अभ्यासायचा म्हणजे मानवी अस्तित्वाचा गाभा तपासून पाहणे होय. जितकी निरीक्षणे आणि तपासणीपूर्वक पडताळणी करणे तितके परिप्रेक्ष यात उभे राहतात. आणि त्या परिप्रेक्ष्याचे अनेक असे प्रस्तर निर्माण होतात. हे परिप्रेक्ष्य समतोलदृष्टीने अभ्यासले की सजीवसृष्टी जवळून पडताळा करता येते. पृथ्वीतलावर आणि मानवी मनाच्या तलावर जी द्वंद्वे सुरू झालेली असतात त्याचा परिणाम सर्वांश  पृथ्वीतलावर आणि मानवी मनाच्या तलावर उमटू लागतो. केव्हा केव्हा तर हा परिणाम इतका भयंकर असतो की त्याची तीव्रता मापन करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागतो. हा बदल करणे त्या तीव्रतेच्या कंपनावर ठरलेले असते. ही कंपने दोलनमय असतात. तितकी मापनाची लांबी रुंदी ही ...