“अण्णाभाऊ साठेंची मूलगामी विचारधारा” प्रास्ताविक गुन्हेगार जात म्हणून ज्या व्यवस्थेने जीवन जगण्यास प्रयोजित केले त्या मांग नावाच्या समुहात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. हा जन्म घेणे जर अण्णाभाऊंच्या हातात असले असते त्तर ते उच्चभ्रू जातीत जन्मले नसते का? अण्णाभाउंना उपेक्षित जीवन जगावे लागले. तसे जीवन त्यांच्यावर भारतीय समाज व्यवस्थेमुळे लादल्या गेले. आणि ही समाजाची मानसिक, सामाजिक, नैतिक, आर्थिक होरपळ अनुभवा आली. जगावी लागली. वाटेगाव शाळेतील चटके त्यांनी सहन केले नाही. तर उलटपक्षी मास्तराच्या डोस्क्यात दगड भिरकावला. आणि यामुळे संघर्षाच्या मुळात शिक्षण झालेच नाही. आणि पोटा...
Posts
Showing posts from October, 2021
- Get link
- X
- Other Apps
“अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची सामाजिक भूमिका” प्रास्ताविक - समाजच्या विकासाच्या टप्प्यात कला, विचार, समीक्षा, प्रबोधने, मानसिकतेची उकल करणारी तत्वे व सर्व प्रकारच्या शोषणाचे अडसर दूर करणारी प्रभावी मूल्ये पोषक ठरत असतात. साहित्य मूल्ये ही मानवी जीवनव्यवहारावर प्रभावी अंमल करीत असतात. नव्या काळासोबत नवा कोरा चेहरा घेऊन येणारी मूल्ये आणि त्यांची उपजावू विचारांची जन्मभूमी, कलाकार, साहित्यिक, लेखक आणि निर्माणाची शैलीरचना यांच्यासाठी सर्वस्तरावरील वातावरण पोषक असणे मात्र तेव्हढेच महत्वाचे. शोषणाचा विचार हा या पोषक वातावरणाला मुक्त असू देत नसल्याने त्याची समीक्षा - संशोधने काळपरत्वे व्हायला हवी. त्या त्या परिस्थितीची आणि विचारांची विश्लेषित करण्याची भूमिका निर्लेपपणे व्यक्त व्हावी. साहित्याला असे अनुकूल वातावरण निर्माण करून देण्याचे तसेच समाज परिवर्तनाला राजरोस राजमार्ग बहाल करण्याचे कार्य तसेच शोषणाला नकार देत मासिके सहाय्यभूत ठरतात. त्याच धर्तीवर ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाचा ...