Posts

Showing posts from April, 2020
Image
★★★ग्रामगीतेला अभ्यासतांना★★★ "अब तो आँखे खोल अब तो आँखे खोल | बन्दे!" "अब तो आँखे खोल अब तो आँखे खोल | बन्दे! ।।टेक।। नीति गयी दुनियासे सारी। प्रीत हुई मतलब की प्यारी।। जिधर उधर छलबल,कामी  जन। मिले न निर्मल बोल । बन्दे ! ।। १ ॥ पाप पुण्य का कहाँ गुजारा? धर्म घुपे गलि  मारा-मारा। ईमानकी तो बात कहाँ है? बजे झूठके  ढोल ।  बन्दे !   ।। २॥ बिगड़ गयी शासन की रीति। साम- दाम- दण्डन की नीति।। अपना -परका देख-देखकर, झुके न्याय का तोल। बन्दे ! ॥३।। कोई न तेरा यहाँ सहारा। जिसका वहि है तारनहारा ॥ कहाँ बन्धुता, सेवा, समता ? खुदी बढा निजमोल। बन्दे ! ।।४।। जगमें रहा  प्रलय होनेका । या तो  प्रभु के अवतरनेका।। तुकड्यादास कहे, मै बोला, अनुभव लेकर बोल । बन्दे ! ॥५॥"                       -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज                             तुकडोजी महाराजांनी ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माण, ग्रामरक्षण, ग्रामआरोग्य, ग्र...
Image
★★★इथल्या धर्माला धम्माची गरज....★★★ भाग-एक "त्त त्या दिवशी प्रा.डॉ सिद्धार्थ आगळे सरांच्या तासाला सेमिनार चालू होता."सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीकोनातून कला -वाङमय क्षेत्रातील जीवनमूल्ये आणि कलामुल्ये "ह्या विषयावर सेमिनार म्या दिला होता.त्यानंतर मुक्तवेळ होता. केवळ इतरांची मतं ऐकून घेण्यासाठी व विषयाचे काही भागावर मतप्रवाह जाणून घ्यासाठी थांबलो.सरांनी एक कापडी पिशवी माझ्याकडे सरकवली.अन म्हणाले, "जरा यावर नजर टाकून घे....विश्वनाथ!" पिशवी उकलत आतला कागदांचा बंच बाहेर काढत.. "हं हो सर.....लगेच..!" म्हणालो. अन सर इतर विद्यार्थ्यांचे सेमिनार निरीक्षण करत बसले. पी.एच.डी. च्या प्रबंधाएव्हढा जाडजूड तो संशोधन संग्रह होता. एम.फिलचा-संशोधन संग्रह होता. "तथागत"या कादंबरीचा वाङमयीन अभ्यास- अभ्यासक-सचिन पवार. तर वाचत वाचत इतकं वाचनात आलं की,बुद्ध आयुष्य,बुद्ध तत्वज्ञान, बुद्ध सारविवेक,जीवनक्रमा व अनुयायी उपदेश सिद्धांतन,या बऱ्याच समकल्पना वाचनात आल्या.पी.एच.डी.ला पूर्ण होईल अशी सखोल व संदर्भासहित एम.फीलचे संशोधन ते होते. मधेच सेमिनार पण ऐक...
Image
"कल इरफान... आज ऋषी..." "ओ दिन अब ना रहें...खूबसुरत यादें...!" आज कल याद कुछ और रहेता नहीं...(आवडतं गाणं) भवरे ने खिलाया फुल फुल को...ले गया.. चांदणी, ओ मेरी चांदणी... यहाँ आना ना दोबारा... डफली वाले डफली बजा... चाँदनी, कर्ज, नगीना, दीवाना, शेषनाग, प्रेमरोग, साहिबा, दामिनी, हिना, बंजारन, गुलाम, हथियार, खोज, विजय, मेरा नाम जोकर,  बॉबी, अमर अकबर अंथॉनी, इत्यादि ऋषी कपूरच्या अभिनयपूर्ण चित्रपटांनी आणि गाण्यांची बहार संगीताच्या लहरीवर बहरत राहील... -विश्वनाथ साठे[9921056462]
Image
★★★ इरफानचं सत्य म्हणजे भूमिकेची गांभीर्यता आणि गांभीर्यतेची भूमिका ★★★                           भूमिकेची गांभीर्यता किंवा गांभीर्यतेची भूमिका काय असते? अशी चिकित्सा जर कधी चित्रपट क्षेत्रातील समिकक्षेने संशोधनाला घेतली तरआजपासून एक नाव इतिहासातपूरक ठरेल ते म्हणजे इरफान. होय इरफान खान.                            चित्रपटाची समीक्षा करणे किंवा चित्रपटातल्या एखाद्या नायकाच्या विश्लेषणात्मक बाबी चिकित्सक दृष्टीने चितारत जाणे आवश्यक तितके सोप्पे नाही. यात असंख्य गोष्टींचा आणि सिद्धांतांचा सखोल अभ्यास असणे गरजेचे ठरते. अशी समीक्षा किंवा विश्लेषणे आपण केवळ चित्रपटापूरते करत आहोत का? की ही सामाजिक भूमिका आहे असा दुहेरी सवालही इथे उभा राहतो. त्या त्या नायकांचे चित्रपटातील असणे हे त्याचे असणे आहे की त्याच्यावर लेखकाचा म्हणजेच संहितेचा पगडा, दिग्दर्शकाचे हातूळे, की यांत्रतांत्रिक वैगैरेंचा प्रभाव आहे? याची चिकित्सा होय. ही चिकित्सा करतांना त्या त्या प...
Image
"भूक आणि काट्याच्या वेदनेचे अस्तर मांडणारे "उत्तम बंडू तुपे" आता नाहीत!"                         साहित्याने मानवी जीवन जगायला तत्व दिले. त्या साहित्य लिखाणात- आंदण (१९८४), कोबारा (१९९१), माती आणि माणसे (१९९३), पिंड (१९९५) हे त्यांचे कथासंग्रह लागोपाठ प्रसिद्ध झाले. या कथांत त्यांनी बारा बलुतेदारांच्या खडतर, कष्टाळू जीवनाचे चित्र रेखाटले आहे. अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बंधुमाधव, बाबुराव बागुल, केशव मेश्राम हे त्यांच्या अगोदरचे प्रस्थापित दलित कथाकार होते. अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखे, असे ग्रामीण वातावरण तुपे यांनी चितारले आहे. या स्थितीला जबाबदार असणाऱ्याना त्यांनी दूषणे दिली आहेत. त्यांच्या या कथा गोरगरिबांच्या वेदनांना वाचा फोडणाऱ्या झाल्या आहेत. त्यांत अठराविश्व दारिद्‌ऱ्याचे दर्शन आहे. शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या वास्तवाला धरून असलेल्या या कथा आहेत म्हणून त्या हृदयस्पर्शी व वाचनीय झाल्या आहेत. त्यांचे व्यक्तिचित्रण खरोखरच मार्मिक आहे.                    ...
Image
कैक दिवसांनंतर संवाद झाला ती म्हणे, "कोणीही मध्ये तू मला घेतलं आज खरंच ? आजवर नाही झालं हे असं आपल्यात.एका क्षणात परक केलंस, का रे ? आपण काल सुद्धा बोललो होतो याविषयावर. पण तू नाहीच म्हणालास. मी मुर्खासारखं तुझ्याशी समजावून बोलत राहिले.का वागलास असा?" "आता मी रुसले तुझ्यावर!" "कशी समजूत काढू रे तुझी? रागावू नकोस रे बाळ ! तो इतकंच म्हणाला, "कशी आहेस तू?" "मी बरी आहे रे!" "तू सांग ?" "सगळं शब्दांत नाही ग सांगू शकत" "नकोच सांगू" "तू जी शांतता वाचतेस...सगळं समजतं तुला." "तुझी शांतता जास्त जवळची आहे रे.मला कळतं सगळं.नको सांगू तू काहीच." "बऱ्याच मानसिकतेच्या गुंत्यातुन जातोय तुझा स्नेही." "कळतंय न तुला, नवीन पर्वात पाऊल टाकतोय ना तू, मग काही सवयी बदल.गरजेचं असतं." "तडजोड करून नातं उभ करू नकोस. " "पण गरजेनुसार नात्यात तडजोड करायला हरकत नाहीच काही!" असं मला वाटतं.आणि ऐक, "काहीही हवं असल्यास मी आहे हे विसरू नकोस.थोडी रागावेन, रुसेन पण त...
Image
***मूलभूत तत्वांचा लढा*** ★ज्ञानप्रवाह हा सीमांततेच्या आडमार्गाला आडत नसतो.तो प्रवाहित असतो. ★ज्ञान,विवेक,सत्याने लोकशाही व्यवस्थेची स्वतः मानवतावादातून उभारणी कराण्याची नित्तांत आवश्यकता असते. ★भुकेल्या व गुलामांचा लढा हा सत्तेच्या व संपत्तीच्या एकधिकारशाही मिळविलेल्या प्रस्थापितांच्या विरोधात असतो. ★हुकुमी व्यवस्थेच्या विरोधातील लढ्याला मुस्कटदाबी म्हणून मोर्चे,आंदोलने,उपोषणे,मिरवणूक,सभा,यावरतव्यवस्था अडमार्ग आणत असते. ★अश्यावेळी स्वतंत्र विवेकाच्या अंगाने व सत्याने विचार करून लढ्यासाठी झटून सामोरे  गेले पाहिजे. ★वर्णवर्चस्ववादांच्यामुळे राजकीय,सांस्कृतिक,आर्थिक,मानसिक, भाषिक,संघर्ष उभे राहतात.ते अस्तित्वाचे द्वोतक असतात.तळागाळातील शोषितांना यावेळी या व्यवस्था अंजून घेणे गरजेचे व परिवर्तनाची नांदी यास्तव दुसरा मुक्तता मार्ग  नसताे. ★याचबरोबर जुन्या-नव्या परंपरागत रितिरुढी,चाली,रिवाजांचा अभ्यास तठस्थेने आणि चिकित्सक वृत्तीने केला पाहिजे. ★इतिहासाचे मूळ शोधले पाहिजे.का?कश्यासाठी ?कसे व केव्हा?असा सखोल अभ्यास केला पाहिजे. ★ज्ञानार्जनाची सततता ही परिवर्तनाला  दिशा...
Image
★★★जागतिक समता आणि ज्ञानदिन★★★ @साहेबांची संवेदनशील विचारशलाका समजतांना                           "सामाजिक न्याय समतेने स्वाभिमान जिंकण्यासाठी लढायचं असेल आणि इतिहास राखून नव्या पिढ्यांचं प्रबोधन घडवायचं असेल तर आधी एक झाले पाहिजे. विभागलेल्या तुकड्यात्मक विचारशैली आणि चळवळींची कार्यशैली यांच्या असंबंध धोरणांमुळेे आज अशी अवस्था झाली आहे. वर्चस्ववाद आणि अधिसत्तेची हुकूमशाही जर मुळातून संपवायची असेल तर असे तुकड्या करून जमणार नाही. खरे तर सामाजिक एकता आणि मूल्याधिष्टीत समता प्रस्थापित झाली पाहिजे.                            आजच्या वास्तवाची अन्यायग्रस्त वाताहत समजून घेण्यासाठी मुळात इतिहासाची पाने चाळली पाहिजे.याची मीमांसा करतांना महत्वाचं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा आदेश शिरसावंद्य मानून दलित-शोषित-पिडीत-वंचित समाजातील लोक शिकू लागलेत.स्वातंत्र्य,समता,बंधुता शिक्षणामुळे नवी चेतना नि जागृती त्यांच्यात नि...
Image
★★★SVEEP PROGRAMME MOVEMENTS   ★★★                                "हिरवळीवर चालून झाल्यावर थोडा निवांत वेळ...स्थळ -व्ही.व्ही.आय.पी. गेस्ट हाउस... यालंच सर्किट हाऊस म्हंतात... म जरासं पोर्चमध्ये पाय लांबून... तापकीरांना सहज विचारलं काय लिव्हता हो ब्वॉ...? लॉगबुक लिहितोय... काय काय अस्तं याच्यात...? ठिकाणं, किलोमीटर, अंतरं, इंधन, खर्च, वेळा,व्यक्तींच्या नावानिशी हे सारं नोंद करावं लागतं... अच्छा...बरं ह्ये ब्वॉ तुंम्चं...सारं हिसोबात... तापकीर हसतात...मुखरी मुखरीच...तीन चार हा ह्या है..आवाज बाहेर पडतात... हे स्वभावाने अगदी मनमिळाऊ, साहेब कुठं जायचं म्हणलं की,सर आपण ठरवाल तिकडं जाऊ..विनाकामाचं थोडंच फिरायचं आपल्याला...असं म्हणणार...अन हातावर एक टाळी देणार... पण काही असो तुम्ही व्यवस्थेला तुमच्याशिवाय पर्याय बाकी ठेवत नाहीत...हे पटलं...साठेजी काहीही म्हणू नक्का ब्वॉ तापकीर साहेब...अन हे आसं "जी" म्हणून तुम्ही लाजवू नक्का... काल त्यांनी पुरणपोळी बनवून आणली...म्हणले लै बेस हाय...घ्या.....
Image
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तहसीलमधील गोरमाळे गावचे संशोधक डॉ. नवनाथ मल्हारी कासपटे यांना २२ नोव्हेंबर २०१ on रोजी त्याच्या एनएमके -१ गोल्डन प्रकारातील कस्टर्ड सफरचंदचे पीक जाती संरक्षण आणि शेतकरी हक्क कायद्यांतर्गत पेटंट प्रमाणपत्र मिळाले होते. 2001. पेटंट हा विशिष्ट कालावधीसाठी नवीन उत्पादन तयार करण्याची किंवा विक्री करण्याची परवानगी देणारी एकमेव व्यक्ती असल्याचे अधिकृत अधिकार आहे. आता त्याच्या संमती आणि परवानगीशिवाय कोणतीही व्यक्ती किंवा शेतकरी कस्टर्ड अ‍ॅपलच्या प्रकारची रोपवाटिका ठेवू शकत नाही किंवा रोपांची विक्री करू शकत नाही किंवा कस्टर्ड सफरचंदांची विक्री किंवा निर्यात करू शकत नाही.  डॉ. नवनाथ मल्हारी कासपटे यांनी काल विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत याचा खुलासा केला. तो गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्षे आणि कस्टर्ड सफरचंद उत्पादक आहे. त्याने पुढे खुलासा केला की त्यांच्या अनुभवातून असे दिसून आले आहे की वाढणारी कस्टर्ड सफरचंद द्राक्ष पिकविण्यापेक्षा स्वस्त आहे. म्हणूनच त्याने कस्टर्ड सफरचंदांवर संशोधन करण्याचे ठरविले. आपल्या संशोधनातून त्याने आता आपल्या शेतात कस्टर्ड सफ...