★★★जागतिक समता आणि ज्ञानदिन★★★
@साहेबांची संवेदनशील विचारशलाका समजतांना
"सामाजिक न्याय समतेने स्वाभिमान जिंकण्यासाठी लढायचं असेल आणि इतिहास राखून नव्या पिढ्यांचं प्रबोधन घडवायचं असेल तर आधी एक झाले पाहिजे. विभागलेल्या तुकड्यात्मक विचारशैली आणि चळवळींची कार्यशैली यांच्या असंबंध धोरणांमुळेे आज अशी अवस्था झाली आहे. वर्चस्ववाद आणि अधिसत्तेची हुकूमशाही जर मुळातून संपवायची असेल तर असे तुकड्या करून जमणार नाही. खरे तर सामाजिक एकता आणि मूल्याधिष्टीत समता प्रस्थापित झाली पाहिजे.
आजच्या वास्तवाची अन्यायग्रस्त वाताहत समजून घेण्यासाठी मुळात इतिहासाची पाने चाळली पाहिजे.याची मीमांसा करतांना महत्वाचं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा आदेश शिरसावंद्य मानून दलित-शोषित-पिडीत-वंचित समाजातील लोक शिकू लागलेत.स्वातंत्र्य,समता,बंधुता शिक्षणामुळे नवी चेतना नि जागृती त्यांच्यात निर्माण झाली.समाज वाचू-लिहू लागला आणि स्वतःला व्यक्त करू लागला.यामुळे आचार-विचार-अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य या शिक्षण व विचारांनी दिलं आणि या समाजातून नव्याने शिक्षण घेऊन जागृत झालेल्या पहिल्या पिढीतील लेखक-कवींनी आपली लेखणी या शोषक व्यवस्थेच्या विरोधात उगारली.साठोत्तरी कालखंडात ही माणसं सुरुवातीला कविता आणि आत्मकथनातून व्यक्त होऊ लागली. स्वतः भोगलेलं दुःख,दारिद्र्य,उपेक्षा,शोषण,उपासमार,आणि जाणिवा याविषयी लिहू लागली.अभिव्यक्तीला नवा फुलोरा हाती लागला.आणि आतापर्यंत जे साहित्यात आलं नसलेलं जग बिनदिक्कत,लाजतबुजत कधी प्रस्थापित व्यवस्थेच्या शिव्यालाखोळ्या खात ते साहित्यव्यवहारात येऊ लागलं होतं.एका नवीनच विश्वाची-जीवनाची ओळख या साहित्यातून पहिल्यांदाच वाचकांना झाली. आणि या साहित्याला ‘दलित साहित्य’ असे नामाभिधान प्राप्त झाले. दलित-शोषित-पीडित-वंचितांच्या व्यथा,वेदना मांडणारं, त्यांचं दुःख वेशीवर टांगणारं आणि या शोषक व्यवस्थेला नग्न करणारं हे साहित्य होतं. या साहित्याची प्रेरणा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवमुक्तीचा विचार आणि भारतीय संविधान ज्या चतुःसूत्रीवर भरभक्कमपणाने उभं आहे, त्या समता-स्वातंत्र्य-न्याय-बंधुतेचा विचार राहिला आहे. इव्हन त्या वैचारिक बैठकीची मुस या साहित्याने अंगिकारली.या साहित्यविश्वात नंतर कथा,कादंबरी, नाटक हे साहित्यप्रकारही अत्यंत ताकदीने आणि वैचारिक स्तरावर हाताळले गेलेत. ललित,वैचारिक, मीमांसा आणि शैलीने विचारलेखन होत राहिलं. आणि एकाहून एक सरस अशा साहित्यकृतींनी तथाकथित मराठी साहित्यविश्व गरगरू लागले.प्रस्थापित साहित्यविश्व हादरून जाऊ लागले.दलित साहित्याचं स्वतःचं अस्तित्व निर्माण झालं.या प्रवाहात लिहिल्या गेलेल्या कथा,कविता, कादंबरी,नाटक,आत्मकथन या साहित्यप्रकाराला ‘दलित’ हे विशेषण लावून त्याचे उदात्तीकरणही त्या काळात केले गेलेले आपणास दिसते. परिणामी हे कधी व्यवस्थेला रुचत नव्हतं तर कधी ते नवखं म्हणून ते आवडतही होतं.यामुळे साहित्यव्यवहाराबरोबरच सामाजिक,वैचारिक चळवळी उभ्या होत गेल्या.समाज एकसंघ घडू लागला.नव्या चेतना व जाणिवा-जागृतींनी डोळे उघडू लागला.ही परिवर्तनाची दिशा पूर्व होती.
सामाजिक स्थिरता टिकविण्यासाठी समता आणि जागृती निर्माण व्हायला पाहिजे.त्यासाठी जातीय राजकारण आणि धर्मांध नीतीला नेस्तनाबूत करून एक प्रवाह तयार करवा लागेल.ही प्रक्रिया थोर विचारवंतांनी दिलेल्या मार्गाने यशस्वी होईल.जेव्हा गटागटात विभागलेले बळ एकत्र येतील तेव्हाच या अमानुष व्यवस्थेचा डोलारा पाडल्या जाईल.येणाऱ्या पिढ्या सुरक्षीत राहतील.आज हे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे.समाज सजग राहिला पाहिजे.
इतिहास पहिला तर १४ ऑक्टोबर १९५६ च्या आधीची सर्व मानसिक अवस्था नि बौद्धिक गुलामगिरी नाकारणे हे काळाने चळवळींना शिकविले. वैयक्तिकरित्या समाज शिकला. त्यामध्ये प्रज्ञा-शील-करुणेचा अंगीकार करणे करणे आणि समता,स्वातंत्र्य,न्याय व बंधुतेचा पुरस्कार करणे हेच मुळात बेबंधशाहीला न पटणारे वास्तव होते.बुद्धीप्रामाण्यवाद-विवेक नि तर्काचा स्वीकार करून अज्ञान,दारिद्र्य नि दुर्बलतेला नकार देणे ही स्वाभिमानकपणे वैचारिक चळवळींनी घेतलेली मानसिकता पुढे अस्पृश्यता,जातीभेद,चातुर्वर्ण्याला नकार देत राहिली.यामुळे सामाजिक परिवर्तनाची मेख उभी राहिली.आणि भेदाभेदाच्या तत्वज्ञानाला हादरे बसू लागले.या विचारविरोध संघर्षाची बाजू उभी होत होती.या संघर्षाला धर्म,राजकारण,समाजकार,शैक्षणिक ध्येयधोरणे आणि मानसिकता आदी बाबी कारणीभूत होत्या हे कुणीही नाकारू शकत नाही.
आज समग्र स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरणारा विचार चळवळींनी अंगीकारला पाहिजे. ब्राह्मण्यशाही, सामंतशाही नि भांडवलशाहीला नाकारून वास्तव आणि सत्यविवेकाने चळवळींना नेणेे गरजेचे आहे.त्याचबरोबर देव ही संकल्पना व धर्माचे खोटे थोतांड-कर्मकांड यांना जी प्रस्थापित व्यवस्थेत मोकळीक आहे तीच नाकारून ही विवेकशील प्रगल्भतेची ग्वाही होती.लोकशाही समाजवादाचा स्वीकार करणे हे काळाचे सत्य आहे. समाजपरिवर्तनाचे तत्वज्ञान स्वीकार करणे आणि माणसाला केंद्रीभूत ठेवून त्याच्या सर्वंकष मुक्तीचे नि कल्याणाचे तत्वज्ञान नसानसांत भिनवले पाहिजे.अखिल जगतातील जो-जो कोणी असा विचार नि आचार आत्मसात करणारा असेल तो विचार एका मानवतावादी अशा महान तत्वज्ञानापाशी येऊन थांबला पाहिजे.आणि हे आंबेडकरी तत्वज्ञान जगभरातल्या सर्वच पिडीत, शोषित,वंचित घटकासाठी मुक्तीचे महाद्वार बनले आहे. वास्तविक आज एव्हढी ताकद नि सामर्थ्य चळवळींनी पेललं पहिजे.
जागतिक वसाहतवाद आणि सत्तांतराचे युद्ध बदलले आहे. युद्धाच्या नीती - शास्त्र - शस्त्र - वापर - आणि त्याचे प्रयोग बदलले आहेत. धातूंआधातूं पासून ते जिवाणू-विषाणूपर्यंत हे युद्ध चळत आलं आहे. चळवळींपुढे नवी आव्हानं आणि सामाजिक प्रश्न जसे उभे राहिले आहेत तसेच ते वैयक्तिकरित्याही प्रत्येकापुढे प्रणीपातपणे उभे आहेतच. राजसत्ता आणि आर्थिक चलनवलनाची स्थित्यंतरे घडायला ही स्थिती पूरक अशी आहे. यामुळे सामाजिक मानसिकता तर ढासळत जात आहे परंतु अंधश्रद्धा व त्यातून होणारे शोषण, अर्थकारण, समाजकारण आणि पिळवणुकीचं तंत्र निर्माण झालेले आहेत. नवी पिढी नव्या समस्यांनी ग्रासून गेलेली आहे. हया समस्यांना जसे चळवळीनिशी खंबीरपणे लढत राहिलं पाहिजे तसेच वैयक्तिकपणेही लढण्याची खंबीर भूमिका बहुजन जीवांना बहाल करणे गरजेचे झाले आहे. हा काळ जिवंत जाणिवांना जिवंत करणारा आहे!
#विश्वाला - #स्वातंत्र्य - #समता- #बंधुता - #सामाजिक #न्याय - #ऐक्य बहाल करणारे #डॉ. #भीमराव रामजी आंबेडकर यांच्या #विचारांना विनम्र अभिवादन 💐💐
-विश्वनाथ साठे[9921056462]

Comments
Post a Comment