बुद्धाची प्रेयसी... यशोधरा...! बुद्ध म्हणजे शांतता.... बुद्ध म्हणजे प्रेम... बुद्धाने सांगितली तीच जगण्याची युक्ती बुद्धाचा मार्ग... हीच खरी मु्क्ती... पण बुद्ध बुद्ध होण्याआधी एक शाक्त कुलातला एक राजकुमार होता. जगासाठी कणव वाटणारा, दु:ख पाहून तळमळणारा, हिंसेमुळे आहत होणारा एक दयाळू राजकुमार होता... सिद्धार्थ होता... सिद्धार्थाला जगाच्या सगळ्यांच्या दु:खावर औषध शोधायचं होतं. मुक्तीचा मार्ग शोधायचा होता. सिद्धार्थाचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून जीने स्वत:च्या संसारसुखावर पाणी सोडलं... ती यशोधरा... त्याची सहचारिणी... हा त्याग म्हणजे खरं प्रेम... सोबत जगता आलं नाही म्हणून रोमिओ जुलिएट, हिर-रांझा, लैला मजनू सगळ्यांनीच आत्महत्या केली. पण सिद्धार्थाची आकांक्षा पाहून यशोधरेने या सहवासावरच पाणी सोडलं... तेही कायमच... यशोधरेचं इतकं उदात्त प्रेम हे इतिहासात कायमच दुर्लक्षित राहिलं. सिद्धार्थ राज्य सोडून गेला. पुढे शाक्य कोलियांमधला वाद मिटला. सिद्धार्थाला परत बोलवायला काही हरकत नाही असं शाक्यांमधले ज्येष्ठ बोलू लागले. फक्त यशोधराच त्याला बोलवू शकत होती. पण तिने ...