बुद्धाची प्रेयसी... यशोधरा...!


बुद्ध म्हणजे शांतता.... बुद्ध म्हणजे प्रेम... बुद्धाने सांगितली तीच जगण्याची युक्ती बुद्धाचा मार्ग... हीच खरी मु्क्ती... पण बुद्ध बुद्ध होण्याआधी एक शाक्त कुलातला एक राजकुमार होता. जगासाठी कणव वाटणारा, दु:ख पाहून तळमळणारा, हिंसेमुळे आहत होणारा एक दयाळू राजकुमार होता... सिद्धार्थ होता...


सिद्धार्थाला जगाच्या सगळ्यांच्या दु:खावर औषध शोधायचं होतं. मुक्तीचा मार्ग शोधायचा होता. सिद्धार्थाचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून जीने स्वत:च्या संसारसुखावर पाणी सोडलं... ती यशोधरा... त्याची सहचारिणी... 


हा त्याग म्हणजे खरं प्रेम... 


सोबत जगता आलं नाही म्हणून रोमिओ जुलिएट, हिर-रांझा, लैला मजनू सगळ्यांनीच आत्महत्या केली. 


पण सिद्धार्थाची आकांक्षा पाहून यशोधरेने या सहवासावरच पाणी सोडलं... तेही कायमच... यशोधरेचं इतकं उदात्त प्रेम हे इतिहासात कायमच दुर्लक्षित राहिलं. 


सिद्धार्थ राज्य सोडून गेला. पुढे शाक्य कोलियांमधला वाद मिटला. सिद्धार्थाला परत बोलवायला काही हरकत नाही असं शाक्यांमधले ज्येष्ठ बोलू लागले. 


फक्त यशोधराच त्याला बोलवू शकत होती. पण तिने कधीच परत बोलवायचा प्रयत्न केला नाही. कारण सिद्धार्थाच्या मार्गात तिला अडसर व्हायचं नव्हतं. 


तिने सिद्धार्थाच्या स्वप्नांसाठी त्याच्या ध्येयाखातर हा मार्ग स्विकारला होता. म्हणून ती त्याची पत्नी होण्यापेक्षाही प्रेयसी म्हणून श्रेष्ठ ठरते .


पुढे सिद्धार्थाचा बुद्ध झाला. जगाच्या मुक्तीचा मार्गही त्याने शोधला. शांततेचा मार्ग शिकवणारा बुद्ध अखेर आपल्या मायदेशी परत आला. तेव्हा अख्खं कपिलवस्तू त्याला भेटण्यासाठी मरत होतं. बुद्धाला भेटायला ही झुंबड उसळली.


पण यशोधरा मात्र आपल्या कक्षातच बसली... ती त्यांना जाऊन भेटली नाही. आपला प्रियकर आपल्याला येऊन भेटेल याची वाट ती पाहत राहिली. आणि सारं जग ज्याला भेटण्यासाठी तळमळत होतं... ते बुद्ध स्वत: यशोधरेला येऊन भेटले... ती ढसाढसा रडली.... वर्षानुवर्ष मनात साठवून ठेवलेलं प्रेम अश्रूंच्या वाटे तिने मोकळं केलं. 


तिची तळमळ तिचा त्याग तिचं झुरणं वाया गेलं नव्हतं. तिच्या या त्यागामुळेच जगाला बुद्ध मिळाला होता. त्याच्या आशांसाठी तिने स्वत:च्या हक्काचा आकांक्षांचा साऱ्याचाच त्याग केला होता....


यापलीकडे प्रेम काय असतं... समोरच्यासाठी सर्वस्व देणं हेच तर प्रेम असतं...


सर्वांना प्रेम दिनाच्या मंगल कामना...!

(Intren साभार)

Comments

Popular posts from this blog