"मह्या भिमानं, मह्या बाबानं, सोन्यानं भरली ओटी" "भविष्यात ह्या करू नको चुका" या अजरामर गाण्यांने जगाला भुरळ घातलेले गीतकार उत्तमदादा फूलकर, वय ७५ वर्षे यांचे आज सकाळी ८:00 वा. बुलडाणा जिल्ह्यात दुःखद निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनाचा आवाज हरपला. त्यांच्या विचारस्मृतीस भावपूर्ण आदरांजली !! कडूबाई खरात, शुद्धोधन, आशा चवरे, आदी नामवंत गायकी क्षेत्रीय कलावंतांनी उत्तम दादा फुलकर यांचे हे गीत गाऊन त्यांना देशभर पोहोचविले. गरीब जनतेला भीम अशाप्रकारे कळत होता. त्याची चळवळ समजत होती. उत्तम दादा हे मूळचे पडोळी येथे रहायचे. नंतर ते शेवटी शेवटी बुलढण्यातील खामगाव याजवळील जलंब या गावी आले. त्या काळात त्यांनी, "कुठवर आता उत्तम राहील मुका" असे परखडपणे सांगून ते फुले शाहू आंबेडकर चळवळीचे पुढील पाऊल कसे असावे हेच उघड केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांची दलित चळवळ गायक, कवी, गितकारांनी जनसमुदायासमोर साहित्याच्या माध्यमातून नेत भारतीय सामाजिक न्याय आणि संघर्षाची बीजे, पाळेमुळे रुजविली आहेत....