"मह्या भिमानं, मह्या बाबानं, सोन्यानं भरली ओटी"

"भविष्यात ह्या करू नको चुका" या अजरामर गाण्यांने जगाला भुरळ घातलेले गीतकार उत्तमदादा फूलकर, वय ७५ वर्षे यांचे आज सकाळी ८:00 वा. बुलडाणा जिल्ह्यात दुःखद निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनाचा आवाज हरपला. त्यांच्या विचारस्मृतीस भावपूर्ण आदरांजली !!                          

कडूबाई खरात, शुद्धोधन, आशा चवरे, आदी नामवंत गायकी क्षेत्रीय कलावंतांनी उत्तम दादा फुलकर यांचे हे गीत गाऊन त्यांना देशभर पोहोचविले. गरीब जनतेला भीम अशाप्रकारे कळत होता. त्याची चळवळ समजत होती. 

उत्तम दादा हे मूळचे पडोळी येथे रहायचे. नंतर ते शेवटी शेवटी बुलढण्यातील खामगाव याजवळील जलंब या गावी आले.
त्या काळात त्यांनी,
"कुठवर आता उत्तम राहील मुका"
असे परखडपणे सांगून ते फुले शाहू आंबेडकर चळवळीचे पुढील पाऊल कसे असावे हेच उघड केले आहे. 

बाबासाहेब आंबेडकरांची दलित चळवळ गायक, कवी, गितकारांनी जनसमुदायासमोर साहित्याच्या माध्यमातून नेत भारतीय सामाजिक न्याय आणि संघर्षाची बीजे, पाळेमुळे रुजविली आहेत. विदर्भात उत्तम दादा फुलकर यांच्यासारखे गीतकार आणि त्यांनी लिहिलेले भिमरायांवरील दलित चळवळीवरील सामाजिक न्याय संघर्षांवरील गीतांच्या रचना बघता दलित साहित्याला आणि दलित साहित्या अंतर्गत असणाऱ्या संवेदनेला वेदना नकार विद्रोहाला शब्द, सूर, ताल, लय, संघर्ष, गुलामीच्या बेड्या तिज्ञाचे तंत्र  - संगीत -गायनामधून बहाल केलेलं आहे. 

ते म्हणतात, 

"वाऱ्याचे बांधून भारे
तारे अकलेचे तोडीती बिचारे
आम्हाला शिकवी आधी....
समाजा शिकविण्या आधी
तुम्ही पहिले शिका
भविष्यात ह्या करू नका चुका..!" 

उत्दातम दादा फुलकर यांचा





आवाज पहाडी, बहारदार - भारदार आणि उंच श्रेणीचा असतांना तत्कालीन गायकी नामांकित क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचे कडे न्याहाळले नाही, हे असें उपेक्षित जीवन जगत राहीले असूनही ते डगमगले नाही.ते म्हणतात, 

"घडू नये प्रांसग असा
बिघडू नये नीटघडी
ती बिघडते कधी कधी
जे काम पडू नये कधी 
ते पडते कधी कधी
जे कळू नये गुपित 
उत्तमला....
ते कळते कधी कधी...!" 

अण्णांच्या परिवर्तन विवेकी विचारांना विनम्र अभिवादन!" 

फुलकर यांना समजून घेण्याकरिता काही लिंक्स - 





- विश्वनाथ अर्जुन साठे, शारा - बुलढाणा  (9921056462)

Comments

Popular posts from this blog