Posts

Showing posts from September, 2019
Image
★★★बलुत्यापुढची ठसठस★★★ मांग,गारूडी,चांभार,भंगी,मेहतर,रूखी,वाल्मिकी,वाघरी,साळी,कोळी,तेली,माळी,कुणबी,लेवापाटील,लेवा पटीदार,कुणबी,मराठा,तांबोळी,भंडारी,गोसावी,भोईर,लोहार,बेलदार,भराडी,गवळी,धनगर,पारधी,वंजारी,वडार,कोंचीकोरवा,कामाटी,मादिगी,हटगर,धोबी,शिंपी,न्हावी,पिंजारी,गोवारी,कोष्टी,मुन्नूर,गाबीत,मुजावर,पटवा, खाटीक, इ.अजून काही जाती-उपजाती-पोटजाती- मुळजाती-रक्तजाती- अधरजाती अभ्यासायच्या नजरेआड आहेत.त्यातल्या मोजक्या "जिण्यावर" हा लेख.... गेली हजारो वर्षें समाज दारिद्र्याच्या गुखाडीत रुतून पडला आहे.तो अज्ञानी आहे.भटका आहे.जीवन जगण्यासाठी भाकरीसाठी मौताग आहे.पोट नेईल तिकडं पळणारा आहे.स्थिर नाही.विकसित नाही.शिक्षणापासून वंचना झालेला समाज गरिबीत पिडलेला,पिळलेल्या आणि दबलेल्या आवाजात जगतो आहे.त्यास वास्तवाच्या जगाचे भान नाही असे नाही पण जी प्रगतीची प्रतवारी आणि परिवर्तनाची गती आहे ती त्याच्याकडे धीम्या वेगाने येत आहे.जो समाज स्थिर होत चालला आहे त्याहीपेक्षा भटक्या विमुक्त समाजाची स्थितीगती आणि त्यात बदल घडवून आणण्यासाठी त्यांचा विकास करणे हा एक मार्ग आहे.त्यापासूनही हा भटक्या विमुक...