★★★ग्रामगीतेला अभ्यासतांना★★★
"अब तो आँखे खोल अब तो आँखे खोल | बन्दे!"
"अब तो आँखे खोल अब तो आँखे खोल | बन्दे! ।।टेक।।
नीति गयी दुनियासे सारी।
प्रीत हुई मतलब की प्यारी।।
जिधर उधर छलबल,कामी जन।
मिले न निर्मल बोल । बन्दे ! ।। १ ॥
पाप पुण्य का कहाँ गुजारा?
धर्म घुपे गलि मारा-मारा।
ईमानकी तो बात कहाँ है?
बजे झूठके ढोल । बन्दे ! ।। २॥
बिगड़ गयी शासन की रीति।
साम- दाम- दण्डन की नीति।।
अपना -परका देख-देखकर,
झुके न्याय का तोल। बन्दे ! ॥३।।
कोई न तेरा यहाँ सहारा।
जिसका वहि है तारनहारा ॥
कहाँ बन्धुता, सेवा, समता ?
खुदी बढा निजमोल। बन्दे ! ।।४।।
जगमें रहा प्रलय होनेका ।
या तो प्रभु के अवतरनेका।।
तुकड्यादास कहे, मै बोला,
अनुभव लेकर बोल । बन्दे ! ॥५॥"
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
तुकडोजी महाराजांनी ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माण, ग्रामरक्षण, ग्रामआरोग्य, ग्रामशिक्षण, ग्रामकुटुंब, ग्रामप्रार्थना, ग्राममंदिरे, ग्रामसेवा, ग्रामसंस्कार, ग्रामउद्योग, ग्रामसंघटन, ग्रामआचार या सार्यांचा सूक्ष्म विचार "ग्रामगीता' या ग्रंथात केला आहे. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. ग्रामगीतेमध्ये एकेचाळीस अध्यायात आठ पंचके आहेत.
सद्धर्ममंथन, लोकवशीकरण, ग्रामनिर्माण, दृष्टिपरिवर्तन, संस्कारशोधन, प्रेमधर्मस्थापन, देवत्वसाधन, आणि आदर्श जीवन अशी ती आठ पंचके म्हणजे ग्रामजीवनाच्या विकास संकल्पनेतील अष्टमहासिद्धीच होत. थोडक्यात सांगायचे, तर तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हीच ग्रामविकासाची संहिता होय. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती.
समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते. ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे. हा गाव सुखी व्हावा. सर्वार्थाने समृद्ध व्हावा. परस्परांचा स्नेहभाव जागवावा.
ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत, त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी, मानवतेचे तेज झळाळावे, या आर्त तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धीचे पूर्णत्व आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली.राष्ट्रीय हितासाठी अनेक स्तरावर कार्य केलं जसे बंगाल येथील दुष्काळ (1945 ), चीन युध्द (1962 ), पाकीस्तान हमला (1965 ), कोयना भुकंपामुळे उडालेला हाहाकार (1962 ). राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभावित आणि व्यवस्थित रचनात्मक मदत कार्याकरता या सगळया मोहिमांवर गेले होते.
@राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या
विचारांना विनम्र अभिवादन
-विश्वनाथ साठे[9921056462]

Comments
Post a Comment