★★★इथल्या धर्माला धम्माची गरज....★★★

भाग-एक

"त्त त्या दिवशी प्रा.डॉ सिद्धार्थ आगळे सरांच्या तासाला सेमिनार चालू होता."सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीकोनातून कला -वाङमय क्षेत्रातील जीवनमूल्ये आणि कलामुल्ये "ह्या विषयावर सेमिनार म्या दिला होता.त्यानंतर मुक्तवेळ होता. केवळ इतरांची मतं ऐकून घेण्यासाठी व विषयाचे काही भागावर मतप्रवाह जाणून घ्यासाठी थांबलो.सरांनी एक कापडी पिशवी माझ्याकडे सरकवली.अन म्हणाले,
"जरा यावर नजर टाकून घे....विश्वनाथ!"
पिशवी उकलत आतला कागदांचा बंच बाहेर काढत..
"हं हो सर.....लगेच..!" म्हणालो. अन सर इतर विद्यार्थ्यांचे सेमिनार निरीक्षण करत बसले.
पी.एच.डी. च्या प्रबंधाएव्हढा जाडजूड तो संशोधन संग्रह होता.
एम.फिलचा-संशोधन संग्रह होता.
"तथागत"या कादंबरीचा वाङमयीन अभ्यास-
अभ्यासक-सचिन पवार.
तर वाचत वाचत इतकं वाचनात आलं की,बुद्ध आयुष्य,बुद्ध तत्वज्ञान, बुद्ध सारविवेक,जीवनक्रमा व अनुयायी उपदेश सिद्धांतन,या बऱ्याच समकल्पना वाचनात आल्या.पी.एच.डी.ला पूर्ण होईल अशी सखोल व संदर्भासहित एम.फीलचे संशोधन ते होते.
मधेच सेमिनार पण ऐकत होतो.एकाने "सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीकोनातून कला -वाङमय क्षेत्रातील कला आणि नीतीे "ह्या विषयावर सेमिनार दिला.सेमिनार झाला की सर त्याला जुळेल असे नवे,जुने चालू घडामोडीलतील संदर्भ देतात.कला व नीती संदर्भात सॉक्रेटिस,प्लेटो सांगत सरांनी बुद्धांच्या जीवनातील एक प्रसंग सांगायला सुरुवात केली.
"बुद्धांवर असाच एके दिवशी खुनाचा आळ येतो.त्यांच्या विहारात रोज एक बाई धम्मसाधनेसाठी येत असे.हे इतर दुर्जन लोकांना कळले आणि तिला एके दिवशी जीवे मारून टाकतात.तिचे मेलेले शरीर त्या विहाराजवळ पुरून टाकतात.की जेणेकरून या अपहरण आणि खुनाचा आळ बुद्धांवर यावा आणि त्यांनी इथून निघून जावे.नगरात चर्चा सुरू होते.जिकडे तिकडे शोध मोहीम सुरू होते.भूमका उठविल्या जाते की, हा अपहरणाचा आणि खूनाचा थांग तथागतांकडे जातो आहे.अन प्रेतही तिथे विहाराजवळ पुरले आहे.नगर सैनिक ते जाऊन शहानिशा करतात.त्या चर्चेत आणि चौकशीत एक वेळ संभ्रमावस्थेत
सर्व बौद्ध भिुक्कुंची अशी धारणा बनते की हे काम.बुद्धांनी हे दुष्कृत्य केले आहे.कारण गेली कित्येक महिने ती स्त्री नित्यनेमाने विहारात धम्मसाधना करण्यासाठी येते हे भिक्कुंना माहिती होते तसे नगरातील सर्व जनतेला माहिती असते.परुंतु अहिंसेचा पुकार करणारे,शब्दांतूनही हिंसा न घडो म्हणणारे बुद्ध जिवंत स्त्रीला का मारतात यावर कित्येक जणांचा अजून विश्वास बसला नव्हता.कारण बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव तिथे होता. काही काळ लोटल्यावर म्हणजे महिना दोन महिन्यानंतर..परंतु पूर्णतः हे सत्य होते की ती स्त्री मेली आहे.आणि तिचा मृत्यूदेह विहाराजवळ सापडला आहे.मोठा नीती पेचप्रसंग होता मित्रांनो...."
आगळे सर म्हणाले.आम्ही ऐकणारे पार आतुर झालो पुढचं ऐकण्यासाठी...
कपिल म्हणला,पुढं सर.????
मागच्या बाकड्यावरून प्रतीक्षा बोलली सर सांगा....आतुरलोय...आम्ही सारे खरं ऐकायला...
अन आगळे सर टेबलावर हात ठेवत शांतपणे स्मित हसले.हसतांना त्यांनी डोळे लावण्याची सवय मोडली नव्हती.डोळे लावून त्यांनी काही पुढची वाक्य बोलली.म्या सरांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो.आगळे सर फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी शिकवायला.विद्यापीठात ते सौंदर्यशास्त्र शिकवायला येत असतात.फार अभ्यासू माणूस आणि दिलदार.
ते बोलले पुढं ...सारे जण ऐकूण घेत होतो.
"ठराव झाला.खुनाचा निकाल होईपर्यंत बुद्ध येथून जाणार नाही.विहाराजवळ सुरक्षा लागली.जणू नजर कैदेत असल्यासारखं....सारं... बुद्ध शांत ,निश्चल,स्तब्ध व विवेकाने दोन शब्द बोलले..ठीक आहे.
"काळ बोलेल..!"
आणि ते ध्यानमग्न झाले.विवेकागर्भात लिन झाले.आर्त खोल सारासार तत्वात रतले.
काही दिवस तसेच गेले.आणि नगरात अजून भूमका उठली की,
"खुणेकरी पकडले," "खुणेकरी पकडले."
जिकडे तिकडे वाऱ्यासारखा प्रसार झाला बातमीचा.
"महाराज्या ..अरे सत्याचा जय,अन पराजय झालानं अनितीचा....!"
आगळे सर धीरगंभीर स्वरात बोलले.सारा वर्ग निःशब्द शांत.प्रश्न होता की,
"हे सारं घडलं कसं.?

विश्वा[9921056462]
क्रमशः-
30/4

Comments

Popular posts from this blog