★★★ इरफानचं सत्य म्हणजे भूमिकेची गांभीर्यता आणि गांभीर्यतेची भूमिका ★★★
भूमिकेची गांभीर्यता किंवा गांभीर्यतेची भूमिका काय असते? अशी चिकित्सा जर कधी चित्रपट क्षेत्रातील समिकक्षेने संशोधनाला घेतली तरआजपासून एक नाव इतिहासातपूरक ठरेल ते म्हणजे इरफान. होय इरफान खान.
चित्रपटाची समीक्षा करणे किंवा चित्रपटातल्या एखाद्या नायकाच्या विश्लेषणात्मक बाबी चिकित्सक दृष्टीने चितारत जाणे आवश्यक तितके सोप्पे नाही. यात असंख्य गोष्टींचा आणि सिद्धांतांचा सखोल अभ्यास असणे गरजेचे ठरते. अशी समीक्षा किंवा विश्लेषणे आपण केवळ चित्रपटापूरते करत आहोत का? की ही सामाजिक भूमिका आहे असा दुहेरी सवालही इथे उभा राहतो. त्या त्या नायकांचे चित्रपटातील असणे हे त्याचे असणे आहे की त्याच्यावर लेखकाचा म्हणजेच संहितेचा पगडा, दिग्दर्शकाचे हातूळे, की यांत्रतांत्रिक वैगैरेंचा प्रभाव आहे? याची चिकित्सा होय. ही चिकित्सा करतांना त्या त्या पार्श्वभूमीवर मानसिकतेचा झरोका तपासून घेणेही महत्वाचे. इरफानचे चित्रपटातील असणे हीच इरफानविषयीची चिकित्सा घडवून आणणारी बाब मोलाची वाटते.
"काळ, काम, वेग, अंतर आणि भूमिका अशीही समिधा व त्या समिधांचा परस्परसंबंध तसा विरोधी ऋणानुबंध या विश्लेषण तंत्रात येतो. चित्रपटात ह्या वैज्ञानिक संज्ञा समजून घेऊन भूमिका करणे अतिशय गुंतागुंतीचे आहे. शेक्सपिअर जाणून घेतांना हा अनुभव येतो. नाट्यशास्त्र संहितेसहित भूमिका अंगीभूत करतांना हा अनुभव येत राहतो!" इरफान खान त्याच्या भूमिकेसंदर्भात असे ठामपणे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचे चौफेर वाचन, त्याची जिज्ञासूवृत्ती, भावनांचे प्रबंधन आणि प्रचलन करण्याची क्षमता, सामाजिक आकलन, सिनेसृष्टीतील वैचारिक स्तर ह्या बाबींचा तपशील गवसतो.
जागतिक स्तरावर भूमिका मांडत राहणे आणि काळावर स्थिर असणे बहुतांश इरफानने शिकून घेतलं होतं. इरफान ज्या सांस्कृतिक पार्श्वभूमीपासून येत होता त्यादृष्टीने त्याची ही पुढील वाटचाल त्याच्या जीवनाराखड्याचा बिंदू उत्कर्षाला भिडविणारी होती. इरफान एखादा संवाद जरी व्यक्त होत असला तरी त्याची जिवंतपणाची ओतीव भूमिका त्याच्या व्यक्ततेतुन तर उठून दिसत होतीच परंतु त्यांची आंतरिक तळमळ त्या भूमिकेची मूळ गाभा असायची ही सुक्ष्मता त्याच्या परिवर्तनाची बीजे होय.
एम.ए. करत असताना त्याला दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली. पुढे दूरचित्रवाणी मधून काही मालिकांमध्ये इरफान खान उजळून निघाला. चंद्रकांता, चाणक्य, डर, भारत एक खोज, द ग्रेट मराठा - रोहिला सरदार नजीब - उद - दौलाच्या भूमिकेत तो छोट्या पडद्यावर होता. नंतर काही चित्रपट त्याला मिळाले. नेमसेक, स्लमडॉग मिलेनियरर या इंग्रजी व पानसिंग तोमर, मकबूल या चित्रपटांतील कामामुळे प्रकाशझोतात आला. २०११ मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
इरफानने केलेली काही चित्रपट आवर्जून पहावे तर त्यात ॲसिड फॅक्टरी, एक डॉक्टर की मौत, ज्युरासिक वर्ल्ड, द अमेझिंग स्पायडरमॅन, द वॉंरियर, नेमसेक (इंग्रजी),
लाईफ ऑफ पाय, लाईफ इन मेट्रो, सच अ लॉंग जर्नी (इंग्रजी), पानसिंग तोमर, मकबूल, रोग, रोड टु लडाख (लघुपट), सलाम बॉंबे,स्लमडॉग मिलेनियर,हासिल
अशा कारकिर्दीत खान यांच्या जीवनात फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार - २००३ (हासिल चित्रपटातील भूमिकेसाठी), फिल्मफेअर सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता पुरस्कार - २००७ (लाईफ इन मेट्रो चित्रपटासाठी), राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता- २०१२ पानसिंग तोमर चित्रपटाकरिता पुरस्कार-सन्मान मिळत गेले. त्यामागे त्याची जिद्द-चिकाटी-आत्मविश्वासाने भरलेली जिंदगी होती.
साल २०१७ ला प्रदर्शित झालेल्या 'इंग्रजी मीडियम' या चित्रपटात त्यांनी अतिशय उत्तम काम केलं होते. आणि त्याची जाणीव त्यातून दिसत होती. त्यासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कारही मिळाला होता. भारत आणि चीनमध्ये हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट डिजीटल माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाला होता.
इरफानला २८ एप्रिल २०२० ला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. २९ एप्रिल ला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भारतीय सिनेमासृष्टीत एक मोलाचा हिरा आता नाही. इरफान यांना न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर हा आजार झाल्याचं त्यानं ट्विटरद्वारे सांगितलं होतं. हा आजार दुर्मीळ समजला जातो. शरीराच्या कोणत्याही भागात हा ट्युमर होऊ शकतो.
इरफान खान यांनी तेव्हा ट्वीटवर असं व्यक्त केलं होतं की, "जीवनात आलेले अनपेक्षित बदल तुम्हाला पुढे जायला शिकवतात. गेल्या काही दिवसांत माझ्याबाबतीत हेच घडलं आहे. मला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर झाला आहे आणि हे स्वीकारणं फार कठीण आहे. पण माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत, त्यांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मला शक्ती मिळाली आहे. त्यामुळे मला आशेचा किरण दिसतो आहे. सध्या, या आजाराच्या उपचारासाठी मला दुसऱ्या देशात जाऊन उपचार करावे लागणार आहेत. पण, माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचे संदेश मला पाठवत राहा."
एक दिवस असा की, भारत सरकार आणि राजकीय नेते यांनी इरफानच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. सिनेसृष्टीतील कैक अभिनेत्याचा तसाच तमाम सर्वसामान्य जनतेचा चाहता इरफान आता नाही.
इरफानचं वेगळेपण त्याचा जगण्यात आहे. सुतपा आणि इरफान ही एक वेगळी प्रेमकहाणी आहे त्यांच्या सहजीवनाची. पण दोघेही जीवावर जीवापाड औदार्य करणारी जोडी. सुतपा आणि इरफान दिल्लीला भेटले. त्या काळात त्यांनी लिव्ह इन रिलेशन जगण्याची उमेद केली. कैक दिवस ते या नात्यात जगले एकमेकांना दुरून तितक्याच जवळून समजत. त्याची भीती - समझदारी आणि जीवनातील न सांगता येणारे प्रसंगही इरफान सुतपाला बिनदिक्कतपणे सांगायचा. ही त्यांच्या नात्यातील वेगळेपण घेणारे आणि जयपूर - दिल्ली - मुंबई - ते परदेश अशा प्रवासात सुतपा त्याची साथसंगत होती. जीवाची जीव होती. जीवाची लळ होती. हे इरफानचे वेगळेपण त्याच्या जीवनात तर ठाशीवपणे होतंच परंतु ते जगभरातल्या सिनेसृष्टीतवर अधिराज्य करणारे ठरले हे सत्य. इरफान सतत डोळ्यातून बोलता होता. इरफानचे बोलके डोळे चित्रपटातून बोलत राहतील.
संदर्भ- filmibeat,TIME मॅक्झिन 2019, NSDC दिल्ली डायरी, फिल्मीजगत.
-विश्वनाथ साठे [9921056462]



Comments
Post a Comment