कैक दिवसांनंतर संवाद झाला
ती म्हणे,
"कोणीही मध्ये तू मला घेतलं आज खरंच ? आजवर नाही झालं हे असं आपल्यात.एका क्षणात परक केलंस, का रे ? आपण काल सुद्धा बोललो होतो याविषयावर. पण तू नाहीच म्हणालास. मी मुर्खासारखं तुझ्याशी समजावून बोलत राहिले.का वागलास असा?"
"आता मी रुसले तुझ्यावर!"
"कशी समजूत काढू रे तुझी? रागावू नकोस रे बाळ !
तो इतकंच म्हणाला,
"कशी आहेस तू?"
"मी बरी आहे रे!"
"तू सांग ?"
"सगळं शब्दांत नाही ग सांगू शकत"
"नकोच सांगू"
"तू जी शांतता वाचतेस...सगळं समजतं तुला."
"तुझी शांतता जास्त जवळची आहे रे.मला कळतं सगळं.नको सांगू तू काहीच."
"बऱ्याच मानसिकतेच्या गुंत्यातुन जातोय तुझा स्नेही."
"कळतंय न तुला, नवीन पर्वात पाऊल टाकतोय ना तू, मग काही सवयी बदल.गरजेचं असतं."
"तडजोड करून नातं उभ करू नकोस. "
"पण गरजेनुसार नात्यात तडजोड करायला हरकत नाहीच काही!" असं मला वाटतं.आणि ऐक, "काहीही हवं असल्यास मी आहे हे विसरू नकोस.थोडी रागावेन, रुसेन पण तुझी स्नेही तुझ्यासोबत कायम आहे.!
"बाळ...आता रडवू नकोस.कोरडा पडतोय गं काळजातून."
"लक्षात घे.तुला कधीही रितं व्हावं वाटलं तर बिनधास्त ये.
असलं नसलं सगळं मनसोक्त बोलून रिकामं कर!"
"कित्ती समजूतदार आहेस तू!"
"रडलास तरी चालेल.कोरडा पडू नकोस.कोरड्या मनाची माणसं काही दिवसांनी जाणिवा विसरतात बाळ. आणि माझा स्नेही असा नाही.
"हम्म...समजू शकतो...ऋतूंनाही कोरडं व्हावं लागतं न...हे परिवर्तनच असतं.कोणत्याही अन कधीही जाणिवा नाही विसरणार!"
"आपलं जुनं वाक्य आहे हे. आठवतं का रे तुला ?"
"होय!"
नाही विसरू शकत काही!
"खूप छान आहेस रे तू.पण थोडा व्यवहार शिक."नाही" म्हणायला शिक.स्पष्ट बोलणं गुन्हा नाही.स्पष्ट आणि उद्धट यात फरक आहे ना.मी बरी विसरू देईन.
लिहायचं आहे ना आपल्याला किती काय-काय!"
"हम्म...काही काळावर गोष्टी कश्या आयुष्यात शिरतात नाही?"
"हो रे!"
"आणि क्षणात बदलतं सगळं
"म्हणून...!"
"मग... मी मानसोपचारतज्ञ आहे का तुझी ?"
"त्यांना सुद्धा आधी तुझा गुंता जाणून घ्यावा लागणार तेव्हा ते त्यावर उपचार करतील."
"केव्हाच आहे!"
"ते का कुणी सांगावं?"
"बरं."
"आई अण्णांची काळजी घे!"
"होय घेतेनं.तू इंस्टाला "दूर दूर चालली" हे लिखाण वाचलं का रे माझं लिहिलेलं?"
"लै दिवस झाले ऑनलाइन आलोच नाही सर्फिंग केलं नव्हतं.आज वाचेन."
थांब एकवते. आणि ती बोलू लागली,
"माहितीये मला,
तू थांबला आहेस तिथेच, तसाच...
माझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा असशील ना ?
मोजत असशील पुढे सरकणारं माझं एक एक पाऊल.
चुकत असेल ना तुझ्या हृदयाचा ठोका,
त्या सरकणाऱ्या माझ्या पावलावर ?
जपत असशील माळ मनातल्या मनात,
" पलट पलट " अशी.
कदाचित ओघळत ही असेल एखादा आसू,
नकळत तुझ्या डोळ्यातून.
म्हणूनच तर चांदण्याशिवायच आकाश आज निरभ्र दिसतंय.
मी नाहीच पाहिलं वळून,
तरीही तू स्वतःला सावरशील ना रे ?
तुझ्या बावऱ्या मनाला आवरशील ना रे ?
इथेच.... इथेच स्वार्थी झाले रे मी.
तुझ्या पाठमोऱ्या आकृतीला बघण्याची शिक्षा मला नको होती.
त्या यातना मला नको होत्या.
तू माझ्यापासून दूर जातांना,
उचलणाऱ्या तुझ्या पावलांचे वार मला नको होते.
तू पाठमोरा झाला असतास तर कदाचित,
मी पळत आले असते तुला वळवून घेण्यासाठी.
पण म्हणून नात्यांची गाठ लगेच बांधल्या गेली असती असं नाही ना रे ?
म्हणूनच... म्हणूनच तर मी तुझ्यासमोर पाठमोरी झाले.
म्हणजे माझ्या भविष्याचं वादळ मला एकटीने झेलता येईल.
अन् माझ्या पावलांची परतीची वाट हरवून जाईल, कायमची.
म्हणूनच तर मीच माझ्या पावलांचा मार्ग बदलला.
पण मनात मात्र तुझेच विचार,
तुझ्या आठवणी, तुझी काळजी,
अन् तुझंच प्रेम घेऊन जात आहे.
तू ही हे सगळं जपशील ना रे ?
नकोच अडवूस आज मला,
पण तू ही सुखाचा मार्ग निवडशील ना रे ?
लीहिशीलच एखादी कविता तू.
तुझ्या कविता ही असतील माझ्यासाठी,
माझ्यावरच, आणि माझ्याच आठवणीत.
किनारा, वाळू अन् पाऊलखुणा नकोच ठेवुस तू.
पण नको रे या विरहातही,
मी तुझ्या हृदयात असताना,
स्वतःला असा एकटा म्हणू.
सांग ना,
माझ्या आठवांची सोबत तरी करशील ना रे ?
माझा नाहीच झालास तरीही माझाच राहशील ना रे ?
या जन्मी नाहीच भेटलो, तरीही जन्मोजन्मी असाच का होईना,
भेटशील ना रे ?
तो यावर प्रतिक्रिया देऊ लागला.
"कित्ती काळजतोड लिहिलंस तू!"
"काळजातले सगळे आंदोलने हेलावून जातेस तू तेव्हा...
असतो निवांतपणे लहरणारा किनारा सोसत सगळं...
मागचं काळजतोड लाटेचं असणं!"
"काळजी घे रे.फार ताण देऊ नकोस.स्वतःला असं एकटं करून घेऊ नकोस.बोल कोणाशीही.बोलत रहा. मनातलं सांगत रहा. मी आहे ना ऐकायला.घरी सगळे कसे आहेत ?"
"हं सगळं ठीक...!"
"आठवण झाली की उकल होते.तुझे फ्रेंझ काय म्हणतात
मग तुझी आठवण सांगत असतो."
"करतात काळजी सगळे!"
"काय सांगतोस मी रागावते असं?"
"तुझी काळजी करणारच रे.तू आहेसच सगळ्यांना तुझी काळजी वाटावी असा!"
"म्हणून तू छान रहा म्हणजे सगळे निश्चिंत राहतील.
"ऐकशील.घरी आलो तर तो फॉन्टन माझ्या शर्टवर होता...!"
"हेही लिखाण त्याच फॉन्टनने लिहितोय हे कदाचित माहिती नसावं."
"आपण जेवलो... बोलत बसलो...परक्या शहरात परकी लोकं पण; आपण कित्ती जिवाचे..!"
सगळं सांगत बसतो, एकते ती सगळं.म फॉन्टनची गोष्ट सांगतो.परकी नसतातच शहरे आणि नातीही!"
"हो रे ..."
"कोणाला सांगतोस हे सगळं.बापरे मग ? सगळे विचारत असतील ना कोण ही असं?
म्हणतो आहे ती जिवाभावकाळजाची!"
ती म्हणाली,
"आपण बघ ना काही ओळख नसताना बोललो काय, भेटलो काय आणि किती जवळचे झालो ना रे?"
"हम्म...!"त्याने हुंकार केला.
"मला ना खरंच तुला मनापासून भेटायचं होतं हा. तुला तेव्हा वाचायचे ना रे मी. नंतर तूच बोललास ना तेव्हा तर भेटायचं ठरवलंच होतं. पण ते ही तू सोप्पं केलंस!"
"बाळ...!"
"बोल ना..."
"तू वाचायचीस का सगळं?
"हो!"
अगदी तू तुझ्या जॉईनिंगच्या वेळी टाकलेले होतेस ते ही पाहिले होते आणि तू त्या गाडीत बसलेले छायाचित्रेही.सगळ्यांनी तुझं अभिनंदन केलं होतं हेही माहिती आहे मला बाळ...!"
"बोल ना तुल बोललं की अस्वस्थता कमी होते!"
"का असं ?"
"मग चांगलचं आहे ना.नातं आहे ना रे आपलं"
"हम्म होय आहे!"
"ऐकशील, तू वेळेवर जेवण, औषधी आणि अराम घेत जा बाळ!"
ती म्हणाली,
"आज राहिलं,जेवले नाही,इच्छा नव्हती."
"का असं रे हे ?"
"तरीही जेवण करत जा.तिथे असलो असतो तर हाताने खाऊ घास भरवले असते."
"आपण सोबत जेवलो आहे बाळ..."
"पाहिलं तेही थोडं जेवतेस."
"त्यात म्हणे इच्छा नव्हती आणि जेवली पण नाही.
"तेवढंच आहे माझं जेवण.तुझ्यापेक्षा तरी जास्त आहे
अगाऊ कुठला.
"ऐक न ...एक विमान गेलं...त्याचा आवाज आला
सुई...sssss
"म्हणते लॉकडाऊनच्या काळात कोणतं विमान सुटलं रे?"
"गप्प बस हा उगाच माझ्या नावाचा गोंधळ करू नकोस तू
"अजुन काय,काळजी घे तू.अजिबात विचार करायचे नाही
छोटंसं डोकं ते.त्याला किती ओझं देतोस तू बिचारा लहानगा जीव तुझ्या विचारांचं, काळजीचं, टेन्शनच, ओझं घेऊन जगत असतो!"
"बरं...मला आठवतेस तू ...
जेव्हा स्कुटरवर असतांना...
पाठीवर थाप ठववतेस
तुझ्या असण्याची...!"
मी आहेच.
"समजत नाहीय तू मला माझं असणं सांगत असते की तू तुझ्या असण्यातलं माझं असणं...
आपण कित्ती परके नहीयत न गं या शहरात?
विचार करत असतो...
तू म्हणते अजिबात विचार करायचे नाहीत!
जणू आता विचार असतात, असण्याचे!"
"हे तुझं तू ठरव.मी फक्त सांगितलं."
"ओहो लिहिलं तरी कमिच्ये."
"काय लिहिलस?काय लिहिणार होतास तू आपल्या विषयी सगळं?मला फार उत्सुकता आहे तू काय लिहिणार आहेस याची!"
"काळ सगळं लिहितो...लिहिल रे सगळं पण तू जे शांततेचे शब्द वाचतेस ते नाही कुणाला वाचता येत. म्हणून जे लिहिता येतं ते वाचता येईल पण जे लिहिलं नाही ते तू वाचत असते.म्हणूनही कदाचित!"
"बरं."
"लेखक आहेस बाबा तू.तुझ्यासारखं बोलणं मला जमायचं नाही. म्हणून असेल कदाचित!"
चल पळ आता उशीर झालाय.तू सुद्धा हसत राहा
तुझं हसणं बघून घरचे सुखवतील!"
"बाळ...!"
"काय?"
"आपल्या असण्यात कोणत्याही काळाचा उशीर नाहीय!
स्वतःची काळजी घेत नाहीय तू हल्ली.जेवत पण नाहीय
अन विसरून जातेय तू असं का?"
"मी ?"
"खरंच विसरते का मी तुला ?"
"ना."
"घेतेय रे काळजी!"
"हम्म."
"मागे तू विचारलं होतं,,, प्रेस रिपोर्टर बद्दल त्याविषयी जास्त माहिती काढू शकलो नाहीय रे."
"झालं ते आता बंद सगळं."
"ओह...अरे पण हा पर्याय असू शकत नाहीय न..लढायला पाहिजे होतं.आता याला काही अर्थ आहे का? तिने कळवायला हवं होतं सगळ्यांना."
"लिहीत रहा रे."
"आजकाल नाही रे इच्छा होत.शांत राहाव वाटतं. कुणाशीच बोलू नये असं वाटतं!"
"शांत राहत जा.पण काळावर लिहिलं पाहिजेत सगळं."
"असं का होतंय...?"
"बघू.जमेल तसं."
"कुणी बोललं का तुला?"
"कशाविषयी? नाही अस काही.मला कोणीच काही बोललं नाही.मीच जरा शांत झाली आहे!"
"अच्छा इतकी शांत नको राहू बोलत जा."
"बघा कोण सांगतंय?"
"उशिरा उठू नकोस सकाळी आणि लवकर झोपत जा रात्री.झोप पूर्ण व्हायला हवी."
"वेळेत आहे सगळं!"
"आज फार जागलो ग खरंच!"
"हेच सांगते ना सदा तुला नेहमी."
"मनात साठवून ठेवू नकोस, मोकळं बोलायचं.
"तू एक बोलतोस एक लपवतोस मग गैरसमज होतात ना रे बाळ!"
"एक तर सगळं सांगायचं नाही तर काहीच सांगायचं नाही.
"काळ सगळं बोलतो गं, बोलेल सगळं!"
"बाळ,एक विचारू ?"
"तू खुश आहेस ना तुझ्या लग्नासाठी ?"
"तडजोड नाही ना ही तुझी ?"
"यात बरंच बोललोय बाळ..."
"तरीही."
"कैक प्रश्नाचं वादळ उठतं रे माझ्या मनात, तुझ्याविषयी.
तू आयुष्यभर सुखी रहावस एवढंच वाटतं मनापासून!"
"बाळ."
"तू कशी आहेस बाळ!"
"हे बघ बाळ, माझ्याशी काही बोलू शकत नाहीस, ठीक आहे; पण कोणाशी तरी बोल.होणाऱ्या बायकोशी तरी बोल.घेईल ती समजून.पण गप्प राहू नकोस.सगळ्यांना ती शांतता वाचायला देऊ नकोस.सगळेच ती शांतता अचूक वाचतील असं नाही ना रे...!"
"सत्य आहे तुझी शेवटची ओळ...!"
-विश्वनाथ साठे(9921056462)

Comments
Post a Comment