"भूक आणि काट्याच्या वेदनेचे अस्तर मांडणारे "उत्तम बंडू तुपे" आता नाहीत!"
साहित्याने मानवी जीवन जगायला तत्व दिले. त्या साहित्य लिखाणात- आंदण (१९८४), कोबारा (१९९१), माती आणि माणसे (१९९३), पिंड (१९९५) हे त्यांचे कथासंग्रह लागोपाठ प्रसिद्ध झाले. या कथांत त्यांनी बारा बलुतेदारांच्या खडतर, कष्टाळू जीवनाचे चित्र रेखाटले आहे. अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बंधुमाधव, बाबुराव बागुल, केशव मेश्राम हे त्यांच्या अगोदरचे प्रस्थापित दलित कथाकार होते. अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखे, असे ग्रामीण वातावरण तुपे यांनी चितारले आहे. या स्थितीला जबाबदार असणाऱ्याना त्यांनी दूषणे दिली आहेत. त्यांच्या या कथा गोरगरिबांच्या वेदनांना वाचा फोडणाऱ्या झाल्या आहेत. त्यांत अठराविश्व दारिद्ऱ्याचे दर्शन आहे. शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या वास्तवाला धरून असलेल्या या कथा आहेत म्हणून त्या हृदयस्पर्शी व वाचनीय झाल्या आहेत. त्यांचे व्यक्तिचित्रण खरोखरच मार्मिक आहे.
उत्तम बंडू तुपे यांच्या १६ कादंबऱ्या भटक्या विमुक्तांचे जीवन चित्रित करणाऱ्या, दलित स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या, खेड्यातल्या जीवनातील दाहकतेचा प्रत्यय आणून देणाऱ्या आहेत. संतू, लांबलेल्या सावल्या मधील माधव, चिपाड मधील सुशिक्षित बेकार, शेवंती, खुळी, खाई मधील सावरी, इंजाळमधील श्यामा, झुलवातील जोगतीण, झावळमधला काशिनाथ कोळी या व्यक्तिरेखांवरून याची कल्पना येते.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एनकुळ हे जन्मगाव असलेल्या खेड्यात तुपे यांचे दुष्काळामुळे पोट भरणे शक्यच नव्हते. त्या दुष्काळी परिस्थितीत सापडून ते पुणेकर झाले. आपल्या बहिणीचा आधार त्यांनी घेतला. पुढे त्यांना वामनराव देशपांडे भेटले. तेथे त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य मनःपूर्वक वाचले. तो प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांच्यामधले लेखन बीज अंकुरले. आपल्या आत्याच्या आश्रयाने ते पुण्यात कसेबसे जगले. पडेल ती कामे पत्करली. हातावरची मोलमजुरी करून दिवस काढले. दुर्गंधीयुक्त झोपडपट्टीत हा प्रतिभावंतलेखक वाढला. त्याला योगायोगाने जिवाभावाची मानलेली मीनाताई बहीण भेटली. अनेकानेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागले. छ्बीसारखी सख्खी बहीण पण तिनेही पैशासाठी भावाला नाडले.
शाळेत खोटारडे बसीन मास्तर यांनी जातीयवादी, माणुसकीला काळिमा फासणारी वागणूक दिली. पण शेवटी उत्तम बंडू तुपे या साऱ्यांवर मात करून थोर साहित्यिक झाले. तुपे यांची झुलवा ही विशेष गाजलेली कादंबरी, नाटकात रुपांतरित झाली आहे. ‘मला येगळ्या वाटंनं जायाचंय्, ही मळल्याली वाट सोडून चालायचंय्-’ म्हणणाऱ्या, यल्लम्माच्या कीर्तीचा बाजार मांडणाऱ्या खोट्या दुनियेविरूद्ध प्राण पणाला लावून बंड करणाऱ्या जगन जोगतिणीची ही गोष्ट वाचकाला अंतर्मुख करते. या कादंबरीवरून चेतन दातार यांनी झुलवा नावाचे नाटक लिहिले. दिग्दर्शक व निर्माते वामन केंद्रे होते. त्य नाटकात सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी भूमिका केल्या होत्या
अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले आहे.
कादंबरी, लघुकथा, नाटक आणि आत्मकथन या प्रकारांत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ‘काट्यावरची पोटं’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी ते लिहिले आहे. उपेक्षित, वंचित समाजाच्या वेदना-व्यथा त्यात चित्रित झाल्या आहेत. त्या चित्रणात वास्तवता आहे, सचोटीची अनुभूती आहे मातंग समाजाचे दुखणे मांडलेले आहे; जीवन संघर्षाचे वर्णन आले आहे. या आत्मचरित्रात सामाजिक स्थितीचे विदारक दर्शन घडत असल्याने आजवरच्या दलित आत्मकथनांत त्याचे स्थान अव्वल दर्जाचे म्हणावे लागेल.
उत्तम बंडू तुपे यांनी लिहिलेली आंदण (लघुकथा संग्रह), इजाळ,कळा,कळाशी,खाई,
खुळी, चिपाड,झावळ,झुलवा,नाक्षारी,लांबलेल्या सावल्या, शेवंती,संतू(कादंबरी) काट्यावरची पोटं (आत्मचरित्र), कोबारा (लघुकथा संग्रह)पिंड (लघुकथा संग्रह) भस्म (कादंबरी)माती आणि माणसं (लघुकथा संग्रह) या साहित्याच्या विपुल लेखनाने उत्तम बंडू तुपे हे विविध पुरस्काराचे आणि मानसन्मानाचे मानकरी ठरले.
‘काट्यावरची पोटं’ हे तुपे यांचे आत्मचरित्र महाराष्ट्र राज्य पुरस्कारास पात्र ठरले.
१९९७ साली जळगावमध्ये भरलेल्या कामगार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते
त्यांना अण्णा भाऊ साठे पुरस्कारही मिळला होता. दरम्यान, उत्तम बंडू तुपे यांना राज्य सरकार आणि इतर संस्थांचे अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांच्या 'आंदण' नावाच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. तर 'काट्यावरची पोटं' ही त्यांची आत्मकथा महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आली. 'झुलवा' ही कादंबरी राज्य सरकारची पुरस्कार विजेती कादंबरी ठरली.
तुपे हे आयुष्याच्या उत्तरार्धात हलाखीचे जीवन जगत होते. तुपे आणि त्यांची पत्नी जिजाबाई या दोघांनाही अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांची अवस्था बिकट झाली. दैनंदिन खर्च आणि औषधोपचाराला तोकडी पेन्शन पुरत नसल्याने एके काळी शब्दांची श्रीमंती अनुभवणारा हा लेखक आज एकटा पडला होता. त्याकडे ना सरकारचे लक्ष , ना कोणत्या साहित्य संस्थेचे. सरकारच्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य असलेले तुपे सरकार आपली काही विचारपूस करेल, या भाबड्या आशेने आलेला दिवस रेटत होते.कालांतराने त्यांना शासनाचे गृह मिळाले.
उत्तम बंडू तुपे यांना उणेपुरे 89 वर्षाचे आयुष्य लाभले. इय्यता तिसरी पर्यंतचं शिक्षण घेता आलेल्या या लेखकाने आपल्या लेखनीतुन उजाड आणि उपेक्षित जीवनाचं अनोख जग साहित्यात उभे केले . " काट्यावरचं पोटं "हे त्यांचे गाजलेले आत्मकथन . कथा , कादंबरी नाटक आदी वाड्मयीन प्रांत त्यांनी समृद्ध केला.एकूण 52 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत . विविध विद्यापीठाने त्यांचे साहित्य अभ्यासक्रमाला ठेवले.विशेषतः दलित साहित्यातला हा एक हिराचं ! आज आपल्यात नाही ही वेदनाचं मोठी क्लेष दायक आहे .त्यांची आयुष्यविवंचना साहित्यातील स्तरीय वर्गवाद आणि साहित्यातील जातीवाद या काळावर दर्शवित राहील हे सत्य!
-विश्वनाथ साठे(9921056462)

Comments
Post a Comment