"वेदना - कैक अंतरंगाच्या रेघुट्या"
इथल्या मातीनं रेघुट्या हैत. सजीवं कैक रेघुट्या पाह्यतात. त्या रेघुट्या सत्येच्या अस्तात. जुलूमजबरीच्या अस्तात. हुकूमशाहीच्या अस्तात. गुलामगिरीत खितपत पडलेल्या संघर्षाच्या अस्तात. त्या रेघुट्या अशांत शांततेच्या असतात. सरळ, वाकड्यातिकड्या, नागमोडया, गोल अश्या कैक आकारांच्या रेघुट्या अस्तात. कधी त्या अज्ञानात धगधगत अस्तात तर कधी घामेजल्या डोळ्यांच्या खोबणीत निस्तेज.
कालपरवा गावाकडं जानं झालं. सगळं हिरवं रान डोळ्यांत मावत नव्हतं. तर हिरवं रान डोळ्यांच्या खोबणीतून जाणिवेच्या ठस्यापर्यंत नेत होतो. सगळेच नेतात. कधी ही प्रक्रिया थातूरमातूर असते. कधी सखोल नेणिवेसह ठासिव असते. हेच हिरवं रान उन्हाळ्यात कोर्डंफट्टक होतं. रानाची रयाते जाते. निस्तेज होतं जातं सारं. त्या डोळ्यांच्या खोबणीतल्या रेघुट्या सारखं.
"पण कोणत्या ह्या रेघुट्या?"
"का निर्माण होतात त्या?"
"कोण जन्म घालतं या रेघुट्यांना?"
"त्या डोळ्यांच्या खोबणीतच का?"
"कैक प्रश्न आहेत तसेच आहेत?"
विचारांचं एक जाळंच तयार होत जातं तेही रेघुट्यासारखं.
म्या लोणारच्या वाटंनं पायीच प्रवास केला.
शेळी चारता चारता त्ये म्हतारं बोलू लागलं,
"रेघुट्या रेघुट्या नस्तात बाबू!"
"जहारी कळा अस्तात त्या रेघुट्यात"
ह्या पाह्य शेळीच्या डोळ्यात.
जांभळ्या रंगाच्या झेनियाच्या फुलांचे गुच्चे दातांनं वर्पत शेळी पुढं पुढं पळत होती. तिच्या बुबुळाजवळ ढवळाशिप्पीत रंग तयार होत होता.
लोणारच्या बसस्थानकाजवळ पोचलो तेव्हा दाढीचे खुंट वाढलेला माणूस म्हणाला,
"इनबिन करून आला साहेब हाये क्का?"
"ह्ये पोतं उचल्ता येतंय क्का?"
दमखम खाऊन त्यानं एकट्यानं ते पोतं उचलून येष्टीच्या टपावर नेऊन ठेवलं म्या सारं न्याहाळत होतो एकही शब्द न बोलता.
तो खाली आला त्याच्या डोळ्याच्या खोबणीत रेघुट्या उमटल्या होत्या. त्यांनी आता लालसर रंग घेतला होता.
स्टेट बँकेजवळ आलो. आज बँकेत खाते तपासून घ्यायचे होते. चार पाच वर्षांपासून व्यवहारच नव्हता खात्यावर. काउंटरवर थांबलो. खाते तपासून घेतले. अन बाहेर पडलो.
पुढं एक हमाल पाठीवर सिमेंटच्या गोण्या वाहत होता.सिमेंटच्या धुळीत त्याचे कपडे अन त्याचं शरीर हिरवट दिसत होतं. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या आवाजाचा कस ऐकला. त्यो म्हणे,
"बाजूलं सर्का अंगावर रेघुट्या उठतील सिमेंटच्या."
उद्या दिवाळी. नाना रंगारं रात्री भारतील. आभाळात रेघुट्या उठतील. त्या रेघुट्या डोळ्यांतही उमटतील. त्या रेघुट्यांना ह्या डोळ्यांच्या खोबणीत चिरलेल्या रेघुट्या समजून घेतील का?
त्या निस्तेज, हिरवट, ढवळ्याशिप्पीत, लालसर रेघुट्या डोळ्यांच्या खोबणीत सल्तात आज उद्या.
-विश्वनाथ साठे[9921056452]
@VISHWANATHSATHE.BLOG.COM
#दिवाळवेदना - कैक अंतरंगाच्या रेघुट्या

Comments
Post a Comment