बुद्ध आणि त्यांचा धम्म
- भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
प्रथम खंड -
बुद्धांनी परिव्रज्या का ग्रहण केली? मृतदेह, रुग्ण, जर्राजर ह्या तीन गोष्टी तथागतांनी पाहिल्या ही गोष्ट पारंपरिक मताला अनुसरणारी आहे.
स्वप्न - हिमालयातील मानस सरोवर येथे सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामायेच्या स्वप्नात आला. आणि असितमुनीला राजा शुध्दोधनाच्या घरी येण्याची ईर्षा होते आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने आलो आहे.
महापुरुषांची बत्तीस लक्षणे व ऐंशी शुभचिन्हांनी युक्त मूलाला उचलून असितमुनी उचलून रडू लागले. माझे आयु संपले आहे आणि आता तथागत मला दिसणार नाहीत. हे मूल बुद्ध होऊन धम्मचक्रपरिवर्तन करतील तेव्हा मी नसेन. मी म्हातारा झालो असेन. सेवा करता येणार नाही.
सात दिवसांचा सिद्धार्थ असतांना आई - महामायेला बाळंतपणात आजार जडतो व ती निधन पावते. सिद्धार्थाचा धाकटा भाऊ नंद, महानाम व आंनद या लहान मोठ्या भावसह सिद्धार्थ मोठे होत होते. अशावेळी सिध्दार्थचा परतपाळ त्यांची मावशी महाप्रजापती यांनी केला.
शेतावरील मजुराचे चित्रण पाहून तथागत पहिल्यांदा जगातील श्रमसंस्कृती अनुभवत होते. भांडवलवाद समजत होते.
नगरात विविध स्पर्धा सुरू असायच्या. विवाहाच्या पध्दतीतही विविध स्पर्धा होत. निशानेबाजीची स्पर्धा नगरात सिद्ध झाली. श्याक्य कुळातील दण्डपाणी यांची मुलगी यशोधरा हिचसाठी स्पर्धा ठेवल्या गेली. सिद्धार्थ तरुण वयात होते. तिरकमान निशानेबाजीत ते तरबेज झाले होते. या स्पर्धेत त्यांनी यशोधरेशी विवाहयुक्त ठरले. व संसार सुरू झाला. नवदाम्पत्यास मुलगा झाला. राहुल नाव ठेवल्या गेले.
कपिलवस्तूनगर मध्ये एकदा शाखेच्या संघाचे सभागृह संथागार या ठिकाणी एक सभा भरली. ती सभा अशी होती की, शाक्य आणि कोळी यांच्या दोन नगरांमध्ये जे नदीचे पाणी येत होते त्या पाण्यावरून हे आपापसात भांडण व्हायची, वाद वाद व्हायचे. हे होऊ नये म्हणून ह्या सभा घेतल्या जायच्या. यातून काय जो मार्ग निघेल दोन्ही राज्य मिळून ठरवायचे. यावेळी मात्र युद्ध हा विचार सर्वानुमते ठरला. परंतु तथागतांनी हे मान्य केले नाही. संमती मिळो देश सोडून जाण्याची तयारी तथागत गौतम बुद्ध यांनी घेतली जर युद्ध होत असेल शक्य संघातील आणि कोलीय संघातील माणसाची प्राणहानी होईल तर मी देश सोडून जायला तयार आहे. सत्य आणि न्याय यापासून परावृत्त होता कामा नये. कारण सत्य तेच असते जे न्याय तत्व घेऊन असते. आणि न्याय तोच देता आला पाहिजे जे सत्य आहे. धैर्य धरले पाहिजेत. दुःखाच्या आवेगावरला पाहिजेत. हे युद्ध करणे, रडणे हे विवेकी विचारसरणीला शोभत नाही. यावेळी यशोधरेला समजते की, तथागत देश सोडून द्यायला तयार आहे. ती म्हणते, "आपला निर्णय योग्य आहे. मी जर आपल्या जागी असते तर हाच निर्णय घेतला असता. त्यात सत्य न्याय आहे. चांगला, लोक कल्याणकारी जीवनमर्ग शोधून काढा. जो सर्वकाळ, सर्वोच्य, सर्वांसासाठी उपयुक्त ठरेल असे तत्व शोधावे." यशोधरा तथागतांना तथागत सोडून जाताना म्हणते तिची केवळ हीच एक इच्छा होती की, "तथागतांनी जर असा विचारच केला असेल तर मोहात न राहता विश्वकल्याणकारी सत्य शोधावे." ती धैर्यवान, उदात्त विचार करणारी, खंबीरपणा असलेली शूर स्त्री होती.तथागतांचा आवडता घोडा कंठ हा देखील खिंकाळत होता. त्यांचा सेवक छन्न हा देखील जीवघेण्या रडकुंडीच्या प्रसंगातून जात होता. तथागत सगळ्यांना सोडून जातात याचे दुःख कपिलवस्तूनगरीवर अतोनात पडलं होतं. कपिलवस्तूनगरीच्या बाजूलाच अनोभा नदी आहे. तथागतांचे केवळ एकोणतीस वर्ष असताना घर, कुटुंब, नातेवाईक, गाव, नगर सोडून जाण्याचा प्रसंग म्हणजे सत्याच्या शोधनाचा प्रसंग.
ज्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्याबद्दल कोण आपुलकी दाखवणार नाही? पण निसर्गाचे फिरले की, आपली वाटणारी माणसेदेखील नेहमी स्वार्थ, निरपेक्षता, परक्यासारखी वागतात. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असू शकत नाही. सहवास हा कितीही दिर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट होतोच. अति तृष्णा, प्रेम, राग यामुळे नाते तोडले जातात. वियोग अटळ आहे. संपत्तीचे वारसा हक्क सांगणारे असतील परंतु विचारांचे कोण आहे? कारण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते.
प्रेम आणि दया, बदल हा अटळ आहे. मी नसेल सोडले परंतु मृत्यूने आम्हांला अगतिकपणे एकमेकांस सोडण्यास भाग पाडेल हे सत्य. निवऱ्यासाठी आलेले पक्षी वियोग सहवास शेवट. हे जजग एकमेकांच्या फसवणुकीने चालले असल्या काळात भीतीदायक संयोगकाळ, माझे ते माझे म्हणणे बरोबर नाही. भौतिक प्रेम सोडा व त्याचा निर्धार ऐका -तथागत.
तथागत यांना परिव्रज्या घेण्याकरिता काषायवस्त्र महानाम (चुलतभाऊ) यांनी आणले होते.
कायमचा संसारत्याग -
राजगृह ते कपिलवस्तू चारशे मैल अंतरावर आहे. हा प्रवास तथागतांनी सुरू केला आहे. लोध्रवृक्ष - मगधराज्य - बिंबिसारच्या ( पर्वतप्रमाणे धिप्पाड देहाचा - मांग) राजगृहाचे ठिकाण हे यांच पुरुषाच्या आश्रयासाठी धाव घेते. सज्जनांच्या साहाय्याने सज्जनांचा उत्कर्ष प्रभावी ठरतो. सुख- तरुण, संपत्ती- वयस्कर, धर्म वृक्श असतो.सुख समाधान असन हेच सुख आहे.देयने भरलेले हृदय समाधान असते. अंधश्रद्धा विषयक - भावी काळाच्या आशेने असहाय्य पशूला ठार करण्यानेच यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारे असले तरीदेखील दयाशील आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्य कृती ठरते. भावी काळासाठी कृती करणे हे योग्य नाही हा मोह, महाराज पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही. असल्या कृती अनिश्चित असतात. त्या ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात.
रोहिणी नदीच्या पाणीवाटपाबाबत राज्य तिरस्कारणारा आणि शाक्य - कोलीय जनतेत शांतता आणणारा तथागत बुद्धांचा संकेत पाणी प्रश्नावरील महत्वाचा उत्तरदुवा आहे.
युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या व कालसमस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो एक केवळ भाग आहे. संशोधनासाठी नाविन्यपूर्ण येथे वाव आहे. जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल? म्हणून प्रत्येक गोष्ट स्वतः तपासून पाहण्याचा निश्चय केला. या भागात परिव्रज्या व राजगृहाकडे प्रस्थान बिंबिसारची भेट व उपदेश, उत्तर व नवा प्रश्न उभा.
नव्या प्रकाशाच्या शोधात -
भृगु ऋषींच्या आश्रमात तपश्चर्येचे प्रकार व दुःख नाश करायची शरीर यातना ह्या गोष्टी समजल्या. ऐहिक जीवनाचे दुःख सोडविता येत नाही त्यांनी सांख्य तत्वज्ञानाचे व समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे ह्या सूचना ध्यानात घेतल्या. (शरीर व सांख्य गणितीय संकल्पना आणि समाधी मार्गातील विकाराचे सूत्र निर्मितीस मोलाची विकल्पे अनुभूतीस आली.)
विंध्य पर्वतावर (आत्ताचा सातपुडा पर्वत) अलारकालाम ऋषींनी शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान मिळविले असून त्यांचा आश्रम या गोष्टी शिकवितो. त्यावेळी ते वैशालीत राहत होते. सांख्य तत्वज्ञानाचे ते पंडित होते. आणि ध्यानमार्गावरील प्रभुत्ववादी होते. त्यांचा ध्यानमार्ग (समाधी) म्हणजे श्वासोश्वासवर नियंत्रण ठेवणे. याकरिता एक अनायासति, दोन प्राणायाम(श्वास आत - पूरक, श्वास रोखणे -कुंभक, श्वास बाहेर सोडणे - रेचक), तीन समाधी ध्यानमार्ग यात सात सिद्धीपायरी ठरलेली आहे. अलारकालाम आणि भृगु दोन्ही कोशल पंचक्रोशीतील प्रसिद्ध तत्ववेत्ते होते. यानंतर उद्यक रामपुत्त यांनी योगसाधना ध्यानसाधनाच्या वरची म्हणजे आठवी पायरी आहे असे प्रतिपादन केले.
मगध देशातील ध्यानपरंपरा ही श्वास थांबवून चित्ताग्रता करण्याची होती. परंतु कोशल देशात श्वास सुरू असतांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याची पद्धत होती. तत्काली वैराग्य कसोटी, सांख्य, समाधी ह्या शिक्षणाच्या गोष्टी स्वतः अनुभवूनच त्यावर भाष्य तत्वज्ञान करण्याचा प्रघात होता.
वैराग्य गयानगरी, बोधगया, उरुवेला येथे नेगरी यांच्या आश्रमी नेरंजना नदी हे एकांत स्थळ आहे. या प्रदेशात तेलबिया, भात, डाळ, तीळ, तांदूळ इ. पदार्थ जेवणात असतात. हा प्रदेश मुख्यत्वेकरून सद्या बिहारप्रदेश या भागात येतो.
शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येणार नाही. धर्मत्व जे शरीरांनाही वेदन देत नाही.
विचारांवर ताबा हेच योग्य. विचारांशिवाय शरीर कुत्र्याप्रमाणे. खरी शांती आणि एकाग्रता शरीर गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्यप्रकारे लाभतात. जे ध्येय मनाच्या साहाय्याने गाठायचे आहेत ते त्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो तर कसे गाठू शकेल?
सेनानीची मुलगी सुजाता नवस करते. सोन्याच्या वाटीने (शिजवलेले अन्न) सुत्तपिठ नावाच्या घाटावर अंघोळ करून ग्रहण केली.
तपश्चर्या आणि आत्मक्लेश नाकारले.
या भागात ते भृगु ऋषींच्या आश्रमातून तथागत सांख्यतत्व, अलारकालाम यांचेकडून समाधी तत्वज्ञान करण्यासाठी आश्रमात गेले व ते पुढे विंध्यकोष्ठास येऊन पुढील मुक्काम वैशाली येथे केला. यानंतर उरुवेला - गया येथे आले.
ज्ञानप्राप्तीसाठी नव्या मार्गाची दृष्टी -
सुजाताने आणलेले पात्र परीक्षा करून घेऊन ते काळ नावाच्या नागराजांच्या निवसस्थानाजवळ बुडाले.
आशा व निश्चय सर्व मार्ग चोखळले असता यशस्वीता नाही. परंतु त्या मार्गाची ज्ञानमिता ही यशस्वीता हे ठरले.
काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवरणप्रभा.
मार - काम वासना. पण त्यांना श्रद्धा व शॉर्य, ध्येर्य, नष्ट करतात. आणि ह्या बाबी कामवासनेला नष्ट करतात.
नद्यांचे प्रवाहदेखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील पण माझा निश्चय नाही.
यानंतर तथागत चार आठवडे ध्यानस्थ बसले. ध्यानावस्था, ध्यानमग्न ही ज्ञानप्राप्तीची पायरी. अशा एकूण चार पायऱ्या.
१) तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला - एकांतवास खूप महत्त्वाचा.
२) एकाग्रतेची भर टाकली.
३) मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे साहाय्य.
४) मनाच्या समतोलपणात शुद्धतेची व सावधानतेची, समतोलतेची अवस्था आणणे.
या चारही पायरीने अहंकाराचा नाश होतो. आणि यासाठी एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर, वासनाविरहीत उद्देश घेऊन केलेली ध्यानधारणा म्हणजे प्रकाश उदय, नवज्ञानमार्ग.
समस्या - उत्तरशोधनप्रक्रिया लक्ष केंद्रीतीकरण
१) जगात दुःख आहे.
२) हे दुःख कसे नष्ट करावे? व मानवजातीला सुखी कसे करावे?
३) जगात समस्या आहेत.
दुःखाची कारणे कोणती? दुःख आहे तर त्याची कारणेही आहेत. कष्टाची कारणे? दुःख कसे नाहीसे करता येईल?
याचे उत्तर म्हणजे सम्यक संबोधी - खरी ज्ञानप्राप्ती.
(बोधी - ज्ञान, बोधीवृक्ष - वड)
जीवनटप्पे -
१) आनंद
२) शुद्धता
३) तेजस्विता
४) अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता
५) जिंकण्यास कठीण अशी स्थिती
६) अभिमुखी करुणा
७) वियोग
८) अचलनिश्चल
९) साधुमती
१०) धर्ममेध दिव्यदृष्टी
बोधिसत्वाची दहा स्थित्यंतरे - पारमिता
१) मुदिता (आनंद)
२)विमलता (शुद्धता) दयाशील
३) प्रभाकरी (तेजस्विता) कशाचाही त्याग होतो.
- अनात्म व अनित्य फरक समजतो.
४) अर्चिष्मती (अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता) ५) सुदुर्जया (जिंकण्यास कठीण अशी स्थिती) ६)साधुमती (पूर्वज्ञानाकलन)
७) अभिमुखी (करुणा)
८) दुरड़मा अमोही निर्मोही (वियोगस्थिती)
९) अचल (कष्टहीन)
१०) धर्ममेध (दिव्यदृष्टी)
बोधिसत्वापासून बुद्ध होण्याची प्रक्रिया म्हणजे पारमिता होय.
परोपकारवृत्ती, सहनशीलता, व्यवहारचातुर्यता, शक्ती, शांतवृत्ती, बुद्धी, सर्वश्रेष्ठ प्रज्ञा, करुणा, दयाशील, सदैव आनंद, त्राससहन करून घेण्याची कोणत्याही पातळीवरील क्षमता स्थिती, यशस्वीता इ. बाबतीतील तत्व.
निसर्ग नियमांविरुद्ध काहीही घडू शकत नाही.
अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राम्हणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की, देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो, मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असेल तरी चालेल.
बुद्ध होण्यासाठी आवश्यक अशा दहा जीवनावस्थांतून गेले पाहिजे या सिद्धांताला कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसऱ्या कोणत्याही धर्मसंस्थापकाला असल्या कसोटीतून उतरण्याचे आव्हान ते ते धर्म करत नाही.
बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन -
जग कसे उत्पन्न झाले? वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने झाली? ऐक्य व अस्तित्व यांचे का अस्तित्व आहे? निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेनी झाली? जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार?
सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्र मिथ्या विश्वास टाकून देणे होय.
सिद्धांत संशोधनाला वस्तुस्थितीचा आधार आणि तर्कशास्त्राचा पाया असला पाहिजे.
वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानाने कोणतेही सामाजिक मूल्य जन्मास घातली नाहीत. ते निरर्थक होते म्हणून तथागतांनी वैदिक ऋषींचे तत्त्वज्ञान नाकारले. निरुपयोगी आहे असे म्हणाले ते.
कपिल हे तत्त्वज्ञ असून त्यांची सांख्य तत्त्वज्ञानावर कमांड होती.
सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञान पहिले तत्व होय.
प्रत्यक्ष ज्ञान अनुमान = तर्क अनुमान
म्हणजे कारणावरून कार्य - रिएक्शन ॲक्शन, कार्यावरून कार्य - रिएक्शन ॲक्शन आणि साम्य - असे तर तसे, तसे तर असे, कॅज्युअल सेम - हे तर ते, ते तर हे.
कपिल ऋषी - सत्व, रजस, तमस म्हणजे सुखाचे कारण आणि दुःखाच्या अस्तित्वामुळे या तिघात समतोल ढळतो.
बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर कपिल मुनींचा फार प्रभाव होता. तर्क व वास्तवता एकच. तत्वज्ञ कपिलाकडून बुद्ध तीन गोष्टी ग्रहण करतात.
१) सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे.
२) क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे.
३) विश्व देवाने निर्माण केले आणि त्यासाठी वास्तव व तर्क आधार कोणताच जगात नाही. जगात दुःख आहे हे मान्य केले.
सर्वांना विचार स्वातंत्र्य महत्त्वाच्या आहे. सत्यशोधन्यासाठी विचारस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे.
दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताला त्याग करणे हा खरा यज्ञ होय. वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा खोटा यज्ञ होय. ब्राह्मण धर्माने घातलेली चतुवर्णी वर्गरचना अनैसर्गिक आहे, तसेच ती जुलमी, शोषणयुक्त, सक्तीचे आहे. मुक्तता व स्वातंत्र्यता त्यात नाही. जन्माधारित विषमतावादी आहे. अज्ञानमुलक रीवाज म्हणजे समाजरचना, वर्गवार विषमता. अशी ही ब्राह्मणी धर्माची समाजरचना आहे. व्यवस्था दुर्बलांना दडपण्यासाठी व जलमभर दास - गुलाम म्हणून आणि माणसाने केवळ माणसाची सेवाचाकरी करण्यासाठी ही विषमता आहे. सर्वांच्या अहिताची व एकल ब्राह्मणांच्या हितसंबंधाची समाजव्यवस्था म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्था आहे.
कर्म म्हणजे तुमच्यातील बंड नष्ट करण्यासाठी तयार केलेला वाद होय. कर्मवादी असे म्हणतात.
दुःख स्वतःचे स्वतःशिवाय कोणीही बदलू किंवा नष्ट करू शकत नाही. आणि तो बंड करून बदलू शकतो. विद्यार्जनाचा हक्क नष्ट करून दास्यत्व स्वीकार करून जगणे ही व्यवस्था आहे. व्यवस्था बदलता येणे शक्य नसून ती नष्ट करणे शक्य आहे.
पा. नं. 106 ते 110 महत्वाचे - अंधश्रद्धा निर्मूलन विचार जातीव्यवस्था कर्मकांडे व बुद्धीप्रमाणे विवेकवाद.
उपनिषदे - वेदांचा भाग नसून धार्मिक कोणताच कायदा त्यात नाही. वैदिक सिद्धांती, ब्राह्मण पुरोहित यांच्या विरोधातही ही विचारसरणी मांडली जाते. उपनिषदात वेदातील अज्ञानाचा व अविद्यांचा तिरस्कार आहे. वेद ईश्वरनिर्मित नाहीत हे स्पष्ट त्यात मत आहे. यज्ञ, फल, दक्षिणा, तत्त्वज्ञान चिटकवले असून ती शोषणाची भूमिका तत्वे होत असे उपनिषदे मानतात. यात ब्रह्म व आत्मा यांची चर्चा आहे. ब्रह्म हे सत्य व सत्य म्हणजे आत्मा. ब्रह्म मी मध्ये गुंतलेला आहे. यातूनच त्याची मुक्तता करणे हा उपनिषदांचा मुख्य सिद्धांत होय. ब्रह्म सत्य आहे याचा पुरावा नाही. म्हणून असे अमान्य आहे. कुणालाच काही माहिती नाही ते सत्य कसे असू शकेल? केवळ कल्पनाही सत्यता नसते.
बुद्ध आणि त्यांचे समकालीन -
तथागतांनी परिव्रज्या घेतली तेव्हा ब्राह्मणी धर्मतत्त्वज्ञानाला नाकारणारे एकूण बासष्ट पंथ भारतीय उपखंडात अस्तित्वात होते.
१) अक्रियावाद - काश्यप - कर्माचा आत्म्यावर परिणाम नाही.
२) नियतीवाद - मख्खली गोसाल - दैववाद - निश्चयवाद - नियतीने जे ठरविले ते स्वीकार करावे. दुःख कोणीही नष्ट करू शकत नाही. असें म्हणणे नियतीवादामध्ये येते.
३)उच्छेदवाद - अजित केशकंबल - विनाशवाद - यज्ञमेघाला काही अर्थ नाही, चारलक्ष योनीतून गेलेच पाहिजे. दुःख नष्ट करता येत नाही. असें उच्छेदवाद म्हणतो.
४) अनन्यवाद - पकूध कच्चायन - जीव पाच तत्वाने बनलेला आहे. आप, तेज, वायू, पृथ्वी, सुख व दुःख आत्मा यांनी युक्त आहे. त्यांचा परस्पर परिणाम नाही. असं म्हणतो
५) विक्षेपवाद - संजय बेलपुत्त - संशयवाद वारणे यावर भर. अस्तित्वावर भर होता.
६) चातुर्यामसंवरवाद - महावीर म्हणजे निगंठनपुत्त - पुनर्जन्म, पूर्वजन्म, दुष्कर्म, आत्मा, पुनरुज्जीवन, तपश्चर्या, चातुर्मास ह्या गोष्टी त्यांना मान्य आहे. यामध्ये अहिंसा, अचोरी, सत्य, संपत्तीहीन व ब्रह्मचर्याचे पालन इ. नियम या वादामध्ये आहे. नव्या तत्ववेत्त्यांची शिकवण त्यांनी मानली नाही. कारण पकूध कच्चायन व काश्यपाच्या तत्त्वाने चालणारा कोणीही कधीही काहीही वाईट करू शकेल. मनाला वाटेल असे वागून उपद्रव माजू शकेल. मख्खली गोसालमुळे देवाचा गुलाम होईल व स्वमुक्तता करू शकणार नाही. संजय बेलपुत्तानुसार भटक्याचे जीवन जगावे लागेल. जीवनाचे निश्चित तत्त्वज्ञान नसेल. निगंठनाथपुत्ताचे तत्त्वज्ञान म्हणजे संन्यास तपचर्या यांनाच जीवनमार्ग म्हणून घ्यावा लागेल. सहज प्रकृती व कामनांचा बिमोड होईल. हताश, अविचारी, असाहाय मनाचेच हे अवस्था विवेचन होय.
साम्य आणि भेद-
बुद्धकालीन अंधश्रद्धा - १) वेदप्रामाण्य यावर विश्वास
२) आत्मा व मुक्ती मोक्ष पुनर्जन्मांचा अंत यावरील विश्वास
३) मुक्ती, मोक्षाची साधने या दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ, यज्ञ यावर विश्वास
४) समाज संघटनेसाठी चातुवर्ण्य व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास
५) विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर व विश्वाचे मुलाधार तत्त्व म्हणून ब्रह्मावर विश्वास
६) आत्म्यावर विश्वास
७) संसार, आत्मपुनर्जन्म यावर विश्वास
८) कर्म, पूर्वजन्मकर्माधारित जन्मस्थान निश्चिती तत्त्वावरील विश्वास
९) आत्मा कोठून आला? कोण आहे? कोठे जाणार? यावर विश्वास
१०) शरीर संवेदना, चेतना, विज्ञान, आत्मा हा विश्वास
११) शून्यवादी मतांच्या धर्मगुरुवरील विश्वास
१२) विश्वविकास प्रारंभकाळ सांगता येतो. यावरील विश्वास
१३) देवाने मानवाला निर्माण केले व ब्रम्हाने आपल्या शरीरातून जन्म घातले यावरील विश्वास
तथागतांनी केलेला मौलिक बदल -
१) कार्यकारण भाव
२) दैववाद भवितव्य भविष्य त्याग
३) कर्म व त्याचा दैववाद, पुनर्जन्म व दुःख, शास्त्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
४) आत्म्याचे मुक्ती, मोक्षऐवजी निब्बाण -निर्वाण तत्व
५) आत्मफेरा, संसार या तत्त्वाऐवजी पुनर्जन्म सिद्धांत स्थान दिले.
स्वीकारहार्य बाबी -
१) सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन मानले
२) मन व त्याची अग्रभूमिका, अंमलता, श्रेष्ठत्वता, निर्मिती, आकलन, स्वमन आकलन ३) क्रिया मार्गदर्शन व मन सर्व शक्तीनुसारच मुख्यत्व
४) मन संस्कार
५) बाह्यअंतर्गत बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम -बाह्य अंतर्गत परिणाम, पापकृत्य, धर्मत्वांचे पालन - जीवनचर्या
६) चांगल्या वाईट गोष्टीचा उगम - मन
७) चित्तशुद्धी
क्रमशः -
मूल्य संग्राहक - विश्वनाथ साठे

Comments
Post a Comment