खंड  चतुर्थ -
धर्म - Religion आणि धम्म
धर्म - Religion म्हणजे काय ? -

धर्माचा मूळ गाभा केंद्र बिंदू -
धर्माच्या अवस्था -
१) आदिमानव काळात धर्म व जादू एकच समजूत होती. वीज, वारा, वादळ, पाऊस, पूर, भूकंप, ज्वालामुखी, नैसर्गिक संकटे ही निसर्गातील जादू ही एकच समज समजत होते. चमत्कारिक प्रयोग तो समजत. कार्यकारण भाव समजत नसे. व निसर्गाचे ज्ञान त्यास नव्हते.
२) विधी, कर्मकांडे, धर्मसूत्र, प्रार्थना, यज्ञ, पाठ, इ. स्वरूप त्यास आले.
३) देवाने हे जग निर्माण केले ही रूढ झाली. मानवी मनावर ही संकल्पना स्थापल्या गेली.
४) दैवी आणि सैतानी - हितकारक आणि नाशकारक अशी संकल्पना रूढ होऊ लागली.

धर्माचे स्थित्यंतरे-

१) प्रारंभी ही शक्ती अज्ञात, अज्ञेय आदिमानव ज्ञानसामर्थ्याच्या पलीकडे होती.
२) ती सैतानी - दैवी असे ही समज होती. 
३) मानवाला सुखर जगण्यासाठी तिला पर्याय  म्हणजे प्रसन्न करून घेत.
४) दैवी - सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी गौण कर्मकांडे आवश्यकता भासली.

धर्माचा गाभा व निसर्गनिय -
१) माणसाला आत्मा आहे.
२) तो अमर आहे.
३) कर्माचा जाब देवासमोर देणे लागेल ही समजूत रूढ झाली होती.
४) देवावर श्रद्धा, प्रार्थना, पूजा, विधी व यज्ञ याग इ. देवाला प्रसन्न करून घेण्यास सुरुवात.
५) आत्म्य, विश्वासंबंधी विश्वास, ईश्वरपूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा - प्रार्थनाविधी.

धर्म व हे सर्व असे आशय धर्म या शब्दानेच व्यक्त होतात.

अनासक्ती, राग, द्वेषापासून मुक्ती, शांती, विकारशमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्ग आणि निर्वाण.

जगाची पुनर्रचना म्हणजे धम्माचे प्रयोजन आहे. एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो.

प्रत्येक धर्माचे मूळ नीती नव्हे. प्रत्येक धर्म नीती शिकवितो. परंतु ती आकस्मिक - प्रारंभिक. धम्म म्हणजे नीती. नीती म्हणजे धम्म. माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. यातून नीतीचा उगम होतो. त्यासाठी कोणत्या देव - ईश्वराची गरज भासत नाही. धम्माचा सार नीती. नीती शिवाय धम्म नाही. आणि केवळ निती असून पुरेशी नाही. ती पवित्र आणि सर्वव्यापक, सर्वसमावेशक असली पाहिजे.

प्रत्येक प्राथमिक - प्रगल्भ समाजात वस्तू, समजुती, पवित्र वा अपवित्र मानल्या जातात. त्यांची तोडफोड, धारणा करणे, योग्य - अयोग्य धर्मनिष्ठ समजले जाते. या धर्मनिष्ठ पवित्र अपवित्रतेच्या संकल्पनेत जीवन पद्धतीनुसार जीवन कलह निर्माण होतो. यात आयोग्यतम आपोआप नष्ट होतेच परंतु योग्यतम टिकून राहिले पाहिजेत. वस्तू, माणसे, विचार इथे नीती व ती पवित्र, सर्वव्यापक अर्थाने उदयीत होते.  अज्ञान, मर्यादी अन्नसामग्रीसाठी संघर्ष, कर्मकांड, कमी उत्पादिते आणि त्यांचा असलेला तुटवडा, रक्तरंजित भयानक वास्तव, अस्थिर, जंगली - रानटी अवस्था.

दरोडेखोरांच्या टोळीतही निती असते. परंतु त्यांची उपयोग्यता अनिष्ठ अशी आहे.

बंधुता, मातृभाव म्हणजे नीती. पवित्र नीतिमत्ता. सामाजिक समता - नितीन्यायाच्या पोटी बंधुता येते.

पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात -

पुनर्जन्म -

शाश्वतावाद, उच्छेदवाद - बुद्ध समकालीन मत, विचारसरणी - पुनर्जन्म.
१) आत्मा अमर - जीवन शाश्वत - कुडी बदलणे - पुनर्जन्म - कल्पना.
२) मृत्यू नश्वर -सर्वनाश - मृत्यूनंतर काही उरत नाही - वास्तव

अलगद्दूप्पमसुत्त यामध्ये बुद्ध सांगतात की, माझ्यावर उच्छेदवादी असल्याचा आरोप तत्त्ववादी करतात. बुद्ध पुनर्जन्म मानतात. माणूस मरतो म्हणजे त्यातील चार - घटक, पृथ्वी, आप, तेज, वायू हे आकाशातील तरंगणाऱ्या समूहाला (MASS) मिळतात. तेव्हा पुनर्जन्म - एक नवा जन्म होतो. या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. (अन्नसाखळी प्रक्रिया)

मन चेतना शरीर सडणे राख होणे पृथ्वी माती चिखल पाणी जल्मय वायू आश्रया तेज, तेजःपुंज झुपका, धग - आप शरीर अवयवांची, कवटीची माती. रक्त घाम मल - रसायन - जल, श्वास - गॅस, हवा, वायू ,

पंचंद्रिय - कान, नाक, डोळे, जीव्हा, त्वचा
स्पर्शतत्त्व अंतिम अधिष्ठान व उपभोक्ता. चालतात पंचंद्रिय चेतनेवर चालतात.उष्णता म्हणजे चेतना. उष्णतेवर चेतना चालते. उष्णता चेतनेवर. दिवा, ज्योत, प्रकाशन्याय.

शरीरमृत होण्यापूर्वी शरीरातील तीन वस्तू सोडून जातात. १) चेतना २) उष्णता ३) विज्ञान म्हणजेच जाणीव. मृत शरीरात कायावाचामन यांचेच विज्ञान (जाणीवक्रिया) थांबलेले असतात. इंद्रिय सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते. भिक्खुत (निब्बाण) अवस्थेमध्ये ध्यानस्थ चेतना - उष्णता कायम शाबूत राहतात. इंद्रिय शक्ती शाबूत जरी त्यांचे श्वासोच्छ्वास, वितर्कविचार, संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरी चेतना असतात.

उष्णता म्हणजे शक्ती (ENERGY)
मृत शरीर व समाधीस्थ भिकू समान आहेत. शरीर मरते परंतु त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. कबीर बीजकच्या संदर्भात येते - 38 शब्द यात तत्व - आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी, काम, क्रोध, मोह, हर्ष
वायुतत्व - बल, वेग, प्रसार, प्रसारण, संकोच, अंकुचन ध्वनी, बोलणे - ध्वनी.
अग्नीतत्व - झोप, जांभळी, आळस, भूक, तहान.

शरीरमृत झाल्यावर (ENERGY) - शक्ती उत्पन्न करण्याचे थांबविते. कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती. भौतिक बदल घडविण्याची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा.

ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. ती एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. ऊर्जा अक्षयतेचा नियम इथे लागू पडतो. ऊर्जेला वस्तुमान असते. रेणु - अणू - गती असते. ऊर्जा ऊर्जेला मापके असतात. वापरावर वस्तूची ऊर्जा एकके असतात. शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिळून जाते.

मृत्यू म्हणजे शक्तीचे उत्पादन थांबणे आणि उच्छेदन म्हणजे विश्वसंपाती शक्ती समूहात नवी भर पडते.

यामुळे पूर्णता उच्छदवादी असणे योग्य नाही. आत्म्याच्या कक्षापर्यंतच उच्छेदवादी. परंतु शरीराच्या भौतिक घटका (MATTER) बाबत नाही. शरीर घटकांचे (MATTER) पुनर्जन्म आहे. आत्म्याचा पुनर्जन्म नाही. कारण शक्तीचे म्हणजे (ENERGY) सामूहिक सातत्य प्रमाणशीर व सतत - अनित्य असते. मृत्यूनंतर ही (ENERGY) विश्वात समाविष्ट होते.

भिक्खुनी खेमा कोशल देशात श्रावस्ती या प्रदेशात साकेत नगरजवळ तोरणवत्थूमध्ये राहत होती. खेमा व प्रसेनजित यांच्यात हा पुनर्जन्माबाबतीत चर्चासंवाद झालेला आहे.

गंगेतील वाळूचे कण व सागरातील पाण्याची क्षमता जो कोणी मोजू शकत नाही तो पुनर्जन्म कुणाचा कसा सांगू शकेल? अशी पुनर्जन्म संकल्पना आहे.
संशोध ताल वृक्ष काटलेले.
मी हा ग्रंथ वाचू लागलो तेव्हा मला विज्ञान व भौतिक विज्ञानाचा अभ्यास महत्त्वाचा वाटू लागला. सर्वसामान्य माणसांना हा अभ्यास नसतो. म्हणून ते धर्मभोळे होतात, अंधश्रद्धेमध्ये पडतात. ईश्वर, देवता, चमत्कार अशा गोष्टींना ते मानू लागतात. मानसिक गुलामीत अडकून व्यवस्थेकडून शोषित बनतात.

"यासंबंधी मी काहीच म्हटले नाही मी तसेही म्हटले नाही."

कर्म सिद्धांत- हिंदू ब्राह्मणी धर्म आत्मा मानतो. आत्म्याचे पुनर्जन्म मानतो. देह व्यतिरिक्त आत्मा आहे, यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही. आत्मा देहातून निघून जातो. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. कर्मावर पुढील जन्माचे अधिकार ठरलेले असतात. आणि ते मागच्या जन्माच्या केलेल्या कर्मावर आधारलेले असतात. म्हणून पुढील जन्मात असणारे पाप - पुण्याचे घटसुद्धा कर्म सिद्धांतांनी भरलेले आहेत, असे हिंदू धर्म मानतो.

बौद्ध धम्म कम्मसिद्धांत आत्मा मानत नाही. आत्मा पुनर्जन्म घेत नाही. आत्म्याचा पुनर्जन्म त्यांना मान्य नाही. देहाव्यतिरिक्त आत्मा आहे हे धम्मात नाही. धम्मात आत्म्याचे स्थान नाही. या मायाजालिक शब्दांपासून सावध राहिले पाहिजे. हे धम्म शिकवतो कारण धम्मामध्ये नीती आहे. देहिक चार तत्वांची मृत्योत्तर पुनर्स्थापना होते. म्हणजे देहात असलेल्या तत्त्वांची मृत्योत्तर पुनर्स्थापना होते. त्याअर्थी पुनर्जन्म मानला आहे.

पूर्वीचा असर या जीवनावर होतो. असे मानणे म्हणजे माणसाच्या श्रमाला काही स्थान आयुष्यात उरणार नाही. निष्क्रियता वाढीला लागेल. कर्माने गतजन्मीच पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. गतकर्म माणसासमवेत वारसा म्हणून येते. अनुवंशिकता कसोटी कम्मसिद्धांत कसा आहे? प्रक्रिया कशी? रूप कसे? स्वसंपादित की माता - पितरांकडून हा कम्मसिद्धांत येतो काय? काय मिळते?

कर्म सिद्धांतांची चर्चा राजगृह येथे इंद्रकर पर्वतावर ज्यावेळेस बुद्ध वास करीत होते त्या ठिकाणी यक्ष त्यांच्याकडे आला आणि हा प्रश्न करून त्यांचे विवेचन ऐकू लागला. तेव्हा तथागत म्हणतात, "आंबा. आंब्याची फळ गोड. त्याची रसदारता, त्याची मूळ क्षारता, जलद्रव्यक्षारता, पर्जन्य सूर्यांक्षारता, गुणधर्म - पुढे या फळातून बी मध्ये उतरतात तसेच कर्म पूर्वजन्मीचे मातेपित्यांकडून शरीरात येतात हे सत्य नाही."

चूळ, दुःख खंदसूसुत्तात बुद्ध - जैन यांचा संवाद आहे.

माणसाची स्थिती ही अनुवंशक्तीपेक्षा त्याच्या भोवताल (भौतिक) परिस्थितीवर अधिक अवलंबून असते.
देवधम्मसुत्त - वर्तमानातील सुखकर दुखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष असतात. गतकर्मीचा या जन्मावर परिणाम होत नाही -तथागत.

अहिंसा म्हणजे करुणा व मैत्रीच्या दुवा अहिंसा आहे.

सिलोन देशातील बुद्ध अनुयायांची युद्ध विचारांची मीमांसा सम खंबीर भूमिका  - हे युद्ध.

ब्रह्मदेशातील बुद्ध अनुयायांची युद्ध विकाराची मीमांसा विरोधी खंबीर भूमिका नाही. - युद्ध

जीवहत्येची हमहारता व गरज, आवश्यकता हा फरक आहे.

दिलेले मांस (स्वतः न मारलेले पशु, पक्षी, प्राणी) खाण्यात हिंसा नाही.

तत्व (PRINCIPAL) आणि नियम (ROOLLS)
यात तफावत आहे. तत्त्वापुढे नियम तोडणे ही नीती आहे. तत्वाच्या परिस्थितीत नियम तुम्हांस मोडता येतो. नियमाला तुम्ही.

बॅक्टेरियाचा राजा मिलिंद व नागसेन यांच्यात चर्चा होते. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. संशरण म्हणजे एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश हे तथागत यांनी नाकारले आहे. पहिल्या दिव्याने दुसऱ्या दिव्यास पेटविले. यार्थी पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले. नाही. संसरण आत्म्याविन पुनर्जन्म शक्य आहे.

भणक जे भिकू केवळ बुद्धवचन, विश्लेषण पाठ करून ठेवून देत ते म्हणजे भणक. भणक लागणे. पुढे हा वाक्यप्रचार आला. भणभण काय करायला लागला अरे? असेही  बोलण्यात म्हणतात. त्रिपिटक व अट्टकथा 'साहित्य समुद्र' जर बौद्ध तत्वज्ञान आहे.

तथागतांच्या विश्लेषणाचे गैरकथन
१) आलमदुदुपम
२)महाकम्म विभाग
३) कुणकठ्ठल
४) महातन्हा संखय
५) जीवन
या पाच सुत्तात झाले आहे. ते मुखाने विवेचन करायचे श्रोतु भिक्खुसंघ ऐकून त्याचे शब्दात रूपांतरसंवाद करायचे. म्हणून हे विश्लेषणाचे गैरकथन पुढे झाले आहे.

१)जे जेबुद्धीला विसंगत तर्काला सोडून ते ते बुद्धाचे नाही - कसोटी.
२) निश्चित अंतिम व अनिश्चित अनिश्चित व अंतिम या विषयी मन बदलू शकतो.
३) मनुष्य कल्याणाला पोषक.
असे वरील तीन कसोट्या महत्त्वाच्या आहेत

बौद्ध जीवन मार्ग सत् असत् आणि पाप-


जे केल्याने खेद वा खंत वाटत नाही आनंदाने समाधानी परिस्थिती स्वीकारता येते ते सर्व चांगले - रीतीने.

धूप, चंदन, कमळ, मधुमालती, सुगंधापेक्षा सदाचाराचा सुगंध - सुवास उच्चस्थ असतो.

खेद, खंत, अश्रु, शोक, ज्यात आहे ते करणे बरे नाही.

बैलाच्या खुरामांगून चाक धावते तसे इष्ट कर्माने दुःख मागेच धावत राहते.
काम (वासना) एक प्रकारचे कर्म आहे. मग त्यापासून भय - दुःख का निपजावे? काममुक्ततेतून मुक्त जो दुःख भयापासून मुक्त.

भूक सर्वात वाईट रोग. संसार सर्वात मोठे दुःख. हे सत्य समजले की, निब्बाण सर्वश्रेष्ठ सुख वाटते.

लोक आणि तृष्णा - घातक -

धनाचा सारखा वर्षाव होत राहिला की, कामना शमत नाही. ही लालसेची भावना अशक्य दुःखकर आहे. लोभ तृष्णातून मुक्त झाल्यास भय व दुःख यातूनही मुक्त होता येते. 

ज्यांना कोणतेही अतिप्रिय व अथवा द्वेष करणे योग्य वाटत नाही त्यांना कोणतेच दुःख व बंधने नसतात.

आसक्ती दुःख निर्मितीचे कारण आहे.


बुद्धत्व अंतर्बाह्य -

सत्य, न्यायी, कर्तव्यतत्पर, जागृत, शुद्धाचरण, विद्या, वीर्य, समाधी, श्रद्धा, शीलवान, संयमी, सदोष, विनम्र, पवित्र, बुद्धिमान, निष्कलंक, निर्मळ, चंचल, अहिंसा, क्षमा, स्तब्ध, शांत, दुर्दशी, शहाणा, सहचरी, सदाचारी, ध्येर्यशील, एकाग्र, विवेकशील, सुज्ञान, प्रज्ञावान,

वियोग हे सुखाचेही (पुनर्र) मूळ आहे.

क्लेश आणि द्वेष, क्रोध आणि वैर, मनुष्य मन आणि मनोमल.

मनात क्रोधभाव ठेवू नका. वैरभाव विरळून शत्रुलाही प्रेमाने जिंका.

माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे.

कामाग्नीसारखी आणि क्रोधाअग्नीसारखी अग्नी नाही. द्वेषासारखे दुर्दैव नाही. उपदानासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. लोभासारखा लोंढा नाही.

वैराने वैर कधीच शांत होत नाही. अवैरानेच शांत होते. ही सनातन नीती आहे.

बाणासारखे मन सरळ व तीक्ष्ण करावे. पाण्याबाहेरील मासुळीचे तरफडणे म्हणजे मनाच्या माराने दुःख झेलने.

सोनार रुप्यातील हीन कणाकणाने जाळून टाकतो. त्याप्रमाणे चित्ताचा मला विवेकाने नाहीसा होतो.
लोखंडातून जन्माला येऊन लोखंडाला गंजून नाश करतो तसे इष्टकर्म व दुःख माणसाचा सत्यानाश करते.

शेजाऱ्याचे दोष धान्याचा तूस पकडल्याप्रमाणे पाखडतो दुष्ट विचार.

माणूस स्वतःचा स्वामी आहे दुसऱ्या कोणाचाही स्वामी असू शकत नाही.

कथ्थक बोरुचे फळ (संशोध) स्वतःचा स्वतःच खरा विनाश. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या वेगाने दुबळे झाड नाश पावते. त्याप्रमाणे आताताईपणाने ते नाश पावते.

स्वतःवर प्रेम असेल तर तो दक्ष असला पाहिजे. स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे.

प्रज्ञा - न्याय - सत्संगती -

पाटकार - माळी पाण्याला वळण.
बाणकार - तीराला वळण.
सुतारकार - लाकडाला वळण.
त्याप्रमाणे नितीमूल्ये स्वतःला नियम व वळण लावण्याचे सत्कर्म करीत असते.

ज्याप्रमाणे कातळ दगड वाऱ्याने कंप पावत नाही त्याप्रमाणे शहाणा मनुष्य निंदा, स्तुतीने विचलित होत नाही.

खोल निष्कंप तळे असते त्याप्रमाणे धीरगंभीर मन शांत आणि विचाराने सखोल असते.

जीवन प्रवासात स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा कोणी भेटला नाही तर निग्रहाने एकलेपणाने प्रवास करावा. परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये.

पळीला आमटीची चव काय? त्याप्रमाणे मुर्खाला सत्संगतीची रस काय?  जिभेला आणि शहाण्याला हा उपदेश केला आहे.

एकांत श्रेष्ठ पण मूर्खाची संगती नको. वनगजाप्रमाणे.

विवेकशीलता आणि एकाग्रता -
कर्दमान (चिखलात) रुतलेला हत्ती त्याप्रमाणे असत्यात रुतलेला मनुष्य असतो.

ओबडधोबड शाकारलेल्या घरात पाणी पाझरते त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार पाझरतात.
ज्याप्रमाणे माहुत शुब्ध गजाला वळवितो त्याप्रमाणे मनावर स्वामित्व मिळवावे.

आई - बाप, आप्तेष्टाहून चांगल्या मार्गाकडे वळवलेले मन आपले अधिक चांगले करेल, हित साधेल आणि तेच आपले स्वतःचे नातेवाईक असतील.

जागरूकता - कळकळ आणि धैर्य -

दक्षता (अप्रमाद) अमर आहे. अविचार प्रमाद मृत्यूचे पद.

दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरवलेल्या हेतूपासून विचलित होता कामा नये.

आळस, सुस्तपणा हा शरीरात घुसलेला विषारी बाण आहे. तो त्वरित उपटून काढला पाहिजे.

दुःख आणि सुख दान आणि कर्म -

दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे. क्षुधा (तृष्णा) हा भयंकर रोग आहे. आरोग्य सर्वश्रेष्ठ देणगी. समाधान श्रेष्ठ संपत्ती. विश्वास श्रेष्ठ नाते. निर्वाण सर्वश्रेष्ठ सुख.

तनाने शेत नाश पावते तसे दुर्विकाराने मन व मानवजात. विषयोपभोगानेही व्यक्ती व समाज नाश पावतात.

द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही. शरीरासारखे दुःख नाही. शांतीसारखे सुख नाही.

ढोंग -

तथागत का म्हणतात?
यथाभाषी तथाकारी (जे बोलणे ते करणे) यथाकारी तथाभाषी (जे करणे ते बोलणे) हा स्वभाव आहे.



सम्यक मार्गानुसरण -

प्रज्ञाशुद्धी - अष्टांगमार्ग, सत्यचतुष्ट्य, अनासक्त, विवेक, पारख - सत्यप्रज्ञा.

सर्वसुष्ठ पदार्थ निर्मिती -
अनु रेणू (विनाशाधीन) आहे. त्यात दुःख काय?
सर्व रूपे (All DISPLAYS) अनित्य, परिवर्तनशील आहे. त्यात दुःख काय?

काया, वाचा, कर्म - संयम, सावधान, नितीयुक्त म्हणजेच प्रज्ञा.

शरद ऋतूतील कमळाप्रमाणे आत्मप्रीति खुडून काढावी.

घनविमुक्त - ढगमुक्तचंद

वाणीच्या (वाचा) क्रोधापासून सावध राहून जिभेचा संयम राखावा.

सद्धर्म आणि असद्धर्म -

संकरापासून दूर ठेवा.

विना शाकारलेल्या घरात पाणी शिरते तसे विना संस्कारी मनात तृष्णा शिरते, प्रवेश करते.

बुद्धाची प्रवचने - गृहस्थांसाठी प्रवचने -

सुखी गृहस्थ - अनाथपिंडीकाशी चर्चा

स्वामित्व, उपभोग, न ऋणत्व, निर्दोष - धनज्ञान - न्याय, भलेपण, उद्योग, शरिरसामर्थ्य, निढळाच्या घामाने कमविलेले - काया वाचा मन शुद्धी कृत्य.

पुत्रापेक्षा कन्या बरी - श्रावस्ती -प्रसेनजित यांच्याशी चर्चा

कन्या, पत्नी, माता सर्वश्रेष्ठ कर्म - वीरत्व.

पत्नी - आणि पती -
मदुरा - निरंजना रडत्यासवर - विवाहित जोडप्यांशी चर्चा, त्यांचा लंगर तेथून जात असतो. जोडपे -
१) दुष्ट दुष्ट - दोघेही
२) दुष्ट देवता - दोहोंपैकी एक
३) सतविचारी दुष्ट - दोहोंपैकी एक
४) सतविचारी सतविचारी - दोघे
वरील जोडप्यांचे एकमेकांशी कर्म व विचार विरोधतत्व, समतत्व असतात.

शीलपरिपालन प्रवचने -

अधोगती - शीलनष्टत्व - श्रावस्ती - जेतवन, अनाथपिंडीक विहारस्थान-

कारणे - अधर्म, दुर्गुण, झोप, व्यर्थ बडबड, निरोद्योगीपणा, आळस, क्रोधाविष्टता, आईबाबांची जिम्मेदारी न घेणे, असत्य, एकट्यानेच उपभोग घेणे, समाजाचा तिरस्कार करणे, मद्यपाणी घेणे, जुगार खेळणे, व्याभिचार करणे, वेश्यागणिकासोबत व्यवहार करणे,  परस्त्री समागम करणे, असंयमी, उधळी स्त्री व पुरुष यांच्या हातात अर्थकारण देणे, क्षमतेवर अवलंबून नसता अफाट महत्त्वकांक्षा व इच्छा बाळगणे,

दुष्ट मनुष्य - द्वेष दाखवणारा न विचारताच.  विचारले असता सद्गुण सांगत नाही असा.

सर्वोत्तम पुरुष -
१) स्व, स्वेतरांसाठी झटत नाही. - दोन्ही बाजूने पेटलेल्या, शेणाने माखलेल्या मशालीसारखा गावात वा वनात इंधन म्हणून वापरता येत नाही.
२) स्वहित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. ३) स्वहित पण दुसऱ्यांच्या हितासाठी नाही.
४) स्व, स्वेतरांच्या हितासाठी झटतो तो सर्वोत्तम पुरुष.

ज्ञानी पुरुष -  उकठ्ठ व सेतब्ब नगररस्त्यावर द्रोण ब्राह्मणाची चर्चा.

तथागत म्हणजे ज्ञानी पुरुष. अंगच्या आसवांचा निरास -  खुंटवून, नष्ट करून, गाळीव आसवे ते दुःख असतात ते बंद, नष्ट करणे, संपवणे.

न्यायी - सज्जन पुरुष -
विषय, वासना, अविद्या, क्रोधनाश.

कुशल कर्म - सत्कर्म -
दान - शील - संयम - फळयुक्त

संकल्प - श्रावस्तीत जेतवन - भिकूंशी चर्चा माता-पितांचा सांभाळ, आदर, कुलपतींचा आदर, मृदूवाणी, सत्यवचन, प्रेमपूरक अंतकरण, शुद्ध, शांत, क्रोधहीन

सदाचरणावरील प्रवचने -

कोसल या राज्यामध्ये 'झाला' या गावी (MORALITY) नैतिकता या संदर्भात प्रवचने झाली.
शारीरिक दुराचरण - हिंसा, चोरी व्याभिचार वाचिक दुराचरण - खोटे बोलणे, चुगलखोरी करणे, कडवट बोलणे, सदैव बडबड करणे, वैचारिक दुरचरण - लोभवृत्ती, दुस्वास, द्वेष.

काया, वाचा, मन आणि कर्म याचे परिणाम या दुराचरणामुळे होतात.

पाटली या गावात उपासकांशी चर्चा - आळसाने द्रव्यहानी, लज्जाहानी, मानसिक हानी होते. दृष्ट आणि अनितीमान असे वर्तन होते.

धनंजानी मतपरिवर्तन -
न्याय आणि सदाचरणाचा मार्ग.

सदाचरणाची परिपूर्णता - हत्या, हिंसा व दुःख करू नका. चोरी करू नका. शील म्हणजे ब्रह्मचर्य सांभाळा. खोटे बोलू नका. मद्यपान करू नका. हिंसा करू नका. ढोंग सोंग करू नका.

साधी राहणीमान, अन्नपाणी दान करा. वयोवृद्धाचा आदर करा. उद्यम चांगला राखा.

सदाचाराणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

हत्ती शरप्रहार सहन करतो तर त्याप्रमाणे जगात कटू शब्द सहन करणे.

सिंधू देशाचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. हत्ती व अश्व त्याहीपेक्षा आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय.

गरजा मर्यादित करणे, एकांत, कुविचार सोडणे, उपद्रव टाळणे, लोभ टाळणे, मच्छर टाळणे, आळस टाळणे, गर्व टाळणे, इ. सदाचरणामध्ये येतात.

क्रोध, मच्छर, द्वेष, दुष्टबुद्धी, कार्पण्य, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नितीहीनता, अज्ञान, सुस्तपणा, गोंधळ, अविचार, आळस,

निब्बाणावरील प्रवचने - निब्बाण -

अनाथपिंडीकाच्या आश्रमाच्यामध्ये सारिपुत्तासह सहवासात.असताना निब्बाणावरील चर्चा झालेली आहे. हा भाग श्रावस्तीत येतो.

मध्यम मार्ग म्हणजे - डोळे - दृष्टी - ज्ञान - शांती - प्रज्ञा - बोधि निब्बाणमार्ग - अष्टांगमार्ग - विकारापासून मुक्ती.

पाच बंधने लावलेली आहेत -
१) शरीर म्हणजे 'मी' जाणीव
२) मानसिक अस्वस्थता
३)धार्मिक कर्मकांडे विधी यावर अवलंबून विसंबून नैतिक शोषण.
४) ऐंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद
५) दृष्टबुद्धी - अर्भका पासून जर्राजरपर्यंत सुप्त अवस्थेत.

धम्मावरील प्रवचने -

सम्यक दृष्टी - कार्यकारणभावाची ओळख. का? कशासाठी? कोणी? कधी? कशाला? काय? किती? बुद्धीपूर्वक कोणते शक्य आहे? कोणते अशक्य आहे? हे ओळखणे म्हणजे धम्मावरील सम्यक दृष्टी प्रवचन होय.

मृत्यूनंतर जीवनाची चिंता कशाला? महाकश्यप व सारीपुत्त यांचा बनारसजवळ इसिपत्तनमधील मृगदायांमध्ये वास करत असताना हा प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न मानवतेच्या व श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशी संलग्न नाही. निब्बाण - प्रज्ञा काहीच साधू देत नाही. म्हणून त्या प्रश्नाचे उत्तरे तथागतांनी दिली नाही. दोन शिष्यत चर्चा त्या ठिकाणी झाली होती.

आचिवर्ती नदीच्या काठावरील एक प्रसंग -देवाची प्रार्थना - आव्हान करणे व्यर्थ आहे. नदीला म्हणले की, इकडे ये आणि मला या काठावरचे त्या काठावर सोड. तर शक्य नाही.

विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. विकार, अंगीकार ग्रहण करणे म्हणजे मांस भोजन होय. मांस भोजने नव्हेत.

मृतमास व पक्षांप्राण्यांची मांस पकवान्ने याची व्याख्या कशी करता आपण?
(विज्ञानसाखळी -अन्नसाखळी)

अधोगतीचे कारण दुष्कर्म. अन्न नव्हे. या आमगंध ब्राह्मणासी हिमालयात चर्चा. जीवहिंसा, ताडन, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, शुल्लक गोष्टीचे ज्ञान, व्याभिचार, अमंगल आहे. मृतमांस मांस भोजन करणे अमंगंध नव्हे.

स्वभाव -
विश्वासघातकी, उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, निर्दय, अहंकारी, अनुदार, स्वार्थी, दोषी, रागिष्ट, हावरट, कपटी, दोषी, हुशारकी, अनिती, लुच्चेगिरी, ढोंगी, नीच, असंयमी, क्रूर, लोभी इ. 

देहप्रक्षालन पुरेशे नाही. श्रावस्ती खंडगाग ब्राह्मणाला स्नान करण्याची सवय.

तडागात निमज्जन - नदीत प्रवाहात असतात ते पैलतिरी पोहोचतात. धर्मीच्या अनुषंगाने उल्लेख.

शरीर व वाणी निमंत्रणास - अशुद्धता, असक्ती, तृष्णा यापासून विमोचन - पवित्र जीवन.

सामाजिक व राजकीय प्रश्नावरील प्रवचने -

राजकृपेवर अवलंबून राहू नका. राजगृह वेळूवन - कलंदक - निवास.

ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चोळून थापले असता तो अधिक पिसाळतो. अति जीव लावणे, पिसाळणे. लालच, लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षाव करू नका. दुर व्हा यापासून. आढळशांती व सुखमार्गावरील दुःखकर हे अडसर आहेत.

राजा धार्मिक तर प्रजाही धार्मिक होते. नगरवाशी, गृहस्थ, पाथिस्थ, प्रवासी, हे ही धार्मिक होतात. राजा तथा प्रजा.

राजकीय आणि लष्करी शक्ती समाजव्यवस्थेवर अवलंबून असते.
बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात.
प्रजातंत्रावरील विश्वास, सदाचरण, धम्म मान,  वृद्ध मान, स्त्री मान, एकोपा, पूर्वनियम परंपरा, समाजमान्यता, उद्दिष्टे पूर्ण करण्याची वृत्ती, तोपर्यंत कोणत्याही समाजाचा नाश नाही.

युद्ध चुकीचा मार्ग - विजयातून द्वेष जन्म घेतो. जिताला दुःखात काळ कंठावा लागतो. जो शांत तो क्रोधरहित तो सुखी.
प्रसेनजित - (काशी) मांग - अजातशत्रूशी (वाईटवृत्तीचा) लढाईत हार पत्करून श्रावस्ती वास्तव्य.
पुन्हा लढाई - अजातशत्रू हरतो. जीवानिशी सोडल्या जाते. ही लढाई काका - पुटण्याची असते.

स्वार्थाला लुटीची ईर्षा लुटच निर्माण करते.
ऋतुजा, अनुग्रहपूर्ण वाणी, उद्धटपणाविरहीत दयाळू वृत्ती, सर्व जीवमात्रांसंबंधी विवेक.


संग्राहक - विश्वनाथ साठे, पुणे

Comments

Popular posts from this blog