द्वितीय खंड -


धम्मदीक्षेची मोहीम - बुद्ध आणि त्यांचा विषादयोग -

असे घडते आहे तसे घडू न देणे - विवेकाधीन.
स्वस्थ बसणे हे योग्य नाही - कर्तव्यविवेक.
बुद्ध ज्ञानप्राप्तीनंतर निष्क्रिय अवस्थेकडे गेले असता त्यांना ब्रह्म सहंपती नामक व्यक्तीने सांगितले, "जगाला तुझ्या ज्ञानाची गरज आहे. म्हणून उद्युक्त केले व बुद्ध आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याशी निश्चयी झाले."
धम्म म्हणजे काय? बुद्धिवादी मार्ग, धार्मिक भोळसटपणातून मुक्तता, मध्यम मार्गाचा उपदेश, अधर्म, मैत्री, कारुण्य व भातृभावाची शिकवण, बांधवाची, बंधमुक्ताची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत, सत्य - संपूर्ण सत्य व सत्याशिवाय काहीही नाही, समतेचा वारसा, आशा, विश्वास, धीर, दुःखाचे ओझे नष्ट करण्याचे तत्व म्हणजे धम्म होय.

परिव्राज्यकांची धम्मदीक्षा  -

तथागतांचे सारनाथ येथे आगमन पाच परिव्राज्यकांना धम्मदीक्षा.
मज्जिम पतिपद म्हणजे मधला मार्ग. मज्जिम. उपभोगायचाही नाही आणि आत्मक्लेषही नाही. नैसर्गिक गरजांच्या परिपूर्तीचा विचार म्हणजेच मलीन विचारापासून मुक्तता.

ज्या गोष्टींचे आकर्षण कामवासनेच्या दृष्टीने होते त्यात विषयासक्त डुंबने आणि तपश्चर्या, आत्मक्लेश हे दोन्ही मार्ग दुःखदायक, अयोग्य व हानिकारक आहेत. या दोन टोकांमध्ये सुद्धा एक मध्य टोक आहे. ते म्हणजे मध्यम मार्ग.

ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काही एक संबंध नाही. तसेच कर्मकांडाशी काही एक संबंध नाही.

दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि त्याचा नष्टावा करण्याचा मार्ग दाखविणे म्हणजेच मध्यम मार्ग धम्म होय.

दुःखाचा नष्टावावा करण्याचा धम्ममार्ग
१) पावित्र्याचा मार्ग अनुसरणे
२) सदाचाराचा मार्ग स्वीकारणे
३) शील मार्गाचा अवलंब केल्यास दुःखाचा निरोध होईल.

पावित्र्य, सदाचरण, शील म्हणजेच धम्म - दुःख नष्ट विशुद्धी मार्ग.

जीवनाचे काही तत्व मान्य करणे म्हणजे विशुद्ध होणे, विशुद्धी मार्ग. बुद्धांचे हे पहिले प्रवचन होते. त्यामध्ये अहिंसा - इजा न करणे, चोरी न करणे - दुसऱ्याची वस्तू न बळकावणे, व्याभिचार न करणे,असत्य न बोलणे म्हणजे सत्य बोलणे, मादक पेय ग्रहण न करणे, चांगल्या - वाईट वर्तणुकीचे मोजमाप, व्यक्तीहित व समाजहित यात सापडते. आपल्यासमोर नेहमी आदर्श असला पाहिजेत. त्यासाठी विवेक आणि विवेकाने जगणे स्वीकारले पाहिजे.

अष्टांगिक मार्ग - सदाचाराचा मार्ग
१) सम्मा दिठ्ठी - सम्यक दृष्टी - अविद्येचा विनाश २) सम्यक संकल्प
३) सम्यक वाचा
४) सम्यक कर्मांत - सुकर्मवर्तणूक
५) सम्यक आजीविका - जगण्यापुरते इतरांना अन्याय न होता
६) सम्यक व्यायाम - मानसिक, शारीरिक
७) सम्यक स्मृती - जागृती
८) सम्यक समाधी - ध्यानधारणा

सम्यक समधीपर्यंत जातांना अडथळे पण येतात. लोभ, द्वेष आळस,स्तुती, संशय, अनिश्चय समाधी पर्यंत जाताना येणारे अडथळे बंधनेच होत. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता.

शीलमार्ग -
महत्त्वाचे घटक येतात १) शील २)दान ३)उपेक्षा ४) नैष्कर्म  ५) वीर्य ६) शांती ७) सत्य ८) अधिष्ठान ९) करुणा १०) मैत्री या दहा पारमितावर प्रज्ञा होय.

शील म्हणजे नीतिमत्ता - वाईट गोष्टी न करण्याकडे व चांगल्या गोष्टी करण्याकडे मनाचा असलेला कल होय. पापभीरूता
नैष्कर्म - ऐहिक सुखाचा त्याग मालमत्ता, रक्त, द्वेष, प्राणत्याग - दान
वीर्य - सम्यक (योग) प्रयत्न - कार्यपूर्ती प्रबळ.
शांती - क्षमाशीलता, सत्य - खरे
अधिष्ठान - ध्येयाचा दृढनिश्चय
करुणा सर्वांभूती दयाशीलता
मैत्री - सर्व प्राणीमात्रांविषयी, शत्रू देखील जीवमात्र - बंधुभाव यांची उपेक्षा न करता औदासिन्याहून निराळी - अलिप्तता अनासक्ती आवडनावड नसलेली मनस्थिती.
मैत्री - प्रेमापेक्षा व्यापक, सदगुणांना म्हणजे प्रज्ञेची (बुद्धी) दिल्यास ज्ञान, जाणीव, शहाणपण, समज इ.

दहा पारमितासोबत प्रज्ञा महत्त्वाची आहे. सारनाथला हे पाच भिख्कू धम्मात आले ते ठिकाण ऋषिपतन नावाने ओळखले जाते.

उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा -

वाराणसी - यशस् व त्याचे मित्र विमल, सुबाहू, पुण्यजीत, गवांपती
वाराणसी - काश्यप बंधू
मुचलिंद - नागराजा (फाल्गु) नदीच्या तटावरील काश्यप बंधूंच्या आश्रमात यायचा काळा विषारी व भयंकर नाग. त्याला शांत करण्यासाठी तथागतांनी शांती व प्रसन्नता, क्रोध - शांत करण्याची वृत्ती घेतली. इथे अकराशे युवक श्रमण झाले.

काम, क्रोध, अविद्या हे अग्नीप्रमाणे आहेत. दुःखाचा धूर (काळा) ते निर्माण करतात.

पापाविषयी घृणा नाहीशी होते व मनुष्य श्रमण होतो. सारीपुत्त - राजगृह, सारीपुत्त व मोग्गलान अडीचशे युवक श्रमण झाले. त्याकाळी राजगृह मगध राजश्रेणी राजा बिंबिसार हा होता.

कुशलक्षेतम म्हणजे ख्यालखुशाली

श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा. ययत असा उपदेश झाला."देवाने जर जग निर्माण केले असते तर पाप, आपली दुःख, ह्या वाईट गोष्टी नसायला नको होत्या. कारण; चांगल्या वाईट गोष्टींचा उदय त्याच्यापासूनच जर झाला असेल तर तो स्वयंभू असणे शक्य नाही.

बी पासून झाड होते तर भवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात आल्या. मग ब्रह्म हे सर्व वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वेव्यापी असेल तर निश्चितपणे तो त्यांचा निर्माता होऊ शकत नाही.

निर्माता, देव, देवी, ईश्वर, आत्मा, ब्रह्म हे सर्व तथागतांनी नाकारले. आपले कृत्य व त्याचे परिणाम हेच सुख दुख व जीवनाची वाट निर्माण करणारे असतात. हे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. संपत्तीचा त्याग ही विषयमुक्त होण्याची कारणे आहेत. संपत्तीचा चांगला उपयोग होणे, जीवन संपत्ती, सत्ता माणसाला गुलाम करीत नाही तर त्याची अभिलाषा माणसाला गुलाम करत असते. स्वार्थाचे भ्रम नष्ट करून चित्तशुद्धी व सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग होता सदाचारनाचे जीवन म्हणजे धम्म होते.

जेतवन विहार - श्रावस्ती राजा प्रसेनजित करुणामय हृदय आयुष्यमान असायला हवे. तपश्चर्याने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ होत नसतो. जिथे वासना असते तेथे सत्य राहू शकत नाही. जशी झाडास आग लागते तशी त्यावर राहणारी पक्षी देखील तिथे राहत नाही. कामवासना हे एक सागरी तुफान आहे. प्रत्येक जीव त्यात अडकून आहे. सुटका नाही. प्रज्ञा ही नका असून विचार हे तिचे सुकाणू आहेत. यातून निघता येते. किनारा आहे.

तुमचा आनंद हा बाह्य वस्तूवर नसून मनाच्या अंतर्गत असा मानसिकतेवर अवलंबून आहे.

राजगृह - जीविकाची धम्मदीक्षा
शालवती नावाची वेश्या मुलगी तिला मुलगा झाला तो टोपलीत घालून मातीच्या ढिगारावर फेकून दिल्या गेला. अभय नावाच्या राजाने त्याचे पालनपोषण केल.  तिथून त्याला उचलून घेऊन गेला. तक्षशिला विद्यापीठात त्यांनी वैद्यकीय अभ्यास केला आणि हाच मुलगा पुढे मेंदूच्या शस्त्रक्रियेवर सक्षम असलेला वैद्यक ठरला.
कुरु देश - थुल्ल कोठ्ठीत रठ्ठपालांचे धर्मांतर - असे करण्यास तुझ्या माता - पित्यांची संमती आहे का? विचारणा .

अनित्यत्ता, अनिश्वर रक्षणकर्ता, पालनकर्ता नाही. वस्तुनाश, तृष्णावल, दुःखमय.

घरचे निमंत्रण - शुद्धोधनाची शेवटची भेट -

कपिलवस्तू - घरी भेटण्यासाठी तथागत सात वर्षानंतर परत आले.
ज्या नगरच्या रथातून फिरले त्याच नगरात भिक्षापात्रासह भिक्षेसाठी फिरणे ह्ये नाट्य नव्हे सत्य होय.

प्राचीन बुद्ध व त्यांचे वंशज अशी संकल्पना, कोटी आली आहे. भिक्षा का मागत आहे या पित्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना ही वंशपरंपरा तथागतांनी सांगितली आहे.

ज्याला दुःखाने व दुरीताने ग्रासले आहे. म्हणून त्याग त्याला सर्वश्रेष्ठ आहे. प्रियजनांचा वियोग अनिवार्य. वियोग हा पुन्हापुन्हा असतो.

अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे। साहित्यात भरघोस पिकू घातलेला विरह अज्ञानी जनतेच्या अज्ञानी भावनांना विकून साहित्यिक शोषण करतात. मग ते शोषण भावनिक, मानसिक, आर्थिक, नैतिक, शारिरप्रकारचे असते. कारण अज्ञानाने दुःख निर्माण होते व वियोग हा मानवी जीवनात मृत्यू या अटळ सत्यामुळे अटळ असा असल्याने विरह उत्पन्न होणारच. त्यापासून दुःखाची पैदास.

दुःख नष्ट करता येते आणि विरहही.

जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काय खंत?

काळ हा सर्व वस्तूंशी अविभाज्यतेने संलग्न असतो. काळ हा जगाला कुठल्याही विविध परिवर्तनात नेतो. ऐश्वर्य अग्निसम पेटल्यासारखे, मिष्टान्न विषसम, कमलपुष्पांनी सज्जित शैया मृत्यू मगरांनी  ग्रासल्यासारखे असते.

तपश्चर्याने अभ्यास आणि चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर वस्तू (इतर काहीही) विषयिच्या सत्याचे मी स्वतः आकलन करेन. त्यासाठी दुसऱ्यांच्या शब्दांनी माझे निरसन होणार नाही. दुसऱ्यांच्या श्रेष्ठतेवर मी अवलंबून राहणार नाही. कारण वादग्रस्त सिद्धांत शेकडो वर्ष पूर्वग्रहांनी तो ग्रासलेला असू शकतो. पूर्व दोषयुक्त विचारांनी तो ग्रासलेला असू शकतो.

विश्वसनीयता म्हणजे निर्दोषिता. जो सर्वस्वी निर्दोष तो सत्याचा आपलाप करू शकत नाही. भडकलेल्या अग्नीत प्रवेश करेन पण ठरविलेले ध्येय सोडणार नाही. सूर्य पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल परंतु; इंद्रिय सुखासाठी आणि ध्येय असाध्य होण्यासाठी मी कधीच ध्येयाच्युत होणार नाही. अविचल निश्चय होय.

धम्मदीक्षा मोहिमेस पुन्हा सुरुवात -
गृध्रकूट पर्वताच्या पाठीमागे खेडे - तेथील ब्राह्मणांना धम्मदीक्षा.

जे थोर्तंडाचा अवलंब करून असत्याचा सत्य आणि हा सत्याचा असत्य मानेन त्यास ही सद्गती प्राप्त होत नाही.

घराचे छप्पर शाबूत नसते तेव्हा गळते, भिजते किंवा भिंती उलथतात. तसे विचार शाबूत नसल्याने सुसंकल्प पोखरले जातात, उलथतात.

सुगंध चांगला विचार दुर्गंध वाईट विचार धारण करण्याच्या शैलीवर अवलंबून असतो.

श्रावस्ती - जेतवन - उत्तरावती प्रदेश. हा प्रदेश श्रावस्तीच्या पूर्वेस आहे.

'सबंध' नावाची संकल्पना बुद्ध आणि त्यांचा धम्म अशी आलेली आहे बुद्धांच्या प्रवचनात त्यांनी रात्रभर ज्ञानग्रहण केले परंतु घरी गेल्यावर त्याच्या पत्नीने विचारले की, तू कुठे होता? त्यावेळी तिने बुद्धांना शिव्याशाप दिला. फसवणूक करणारा म्हणून हिणवले. पतीने तिच्यापुढे मान तुकवली. मेल्यावर तो समंध झाला. त्याला झाडावरच बांधून ठेवले. समंध ही संकल्पना काय आहे? अंधश्रद्धा असावी काय? ही भाषांतर करण्याच्या लेखकांची एक वेगळी खेळी तर नसावी?

दुर्विचारातून सुटका जर होत नसेल तर अंगाला काही फासून फायदा काय?

कनिष्ठ आणि सामान्य जणांना धम्मदीक्षा -

१) उपाली नाव्ही - श्रावस्ती
२) सुनीत भंगी

संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो.

३) सोपाक आणि सुप्पीय - अस्पृश्य - श्रावस्ती सोपाकच्या जन्माच्या वेळी त्याची आई मेली म्हणून स्मशानात नेऊन जाळण्याची तयारी केली. ती मेली नव्हती. तिने सोपाकला जन्म दिला व ती नंतर मेली. स्मशान चालकाने सोपाकला उचलून घेतले. त्याचे पालन पोषण केले सुप्पीय नावाच्या आपल्या पुत्राबरोबर ते दोघे लहानाची मोठी झाली. सोपाक ही एक जात होती.
४) सुमंगल हीन जातीतील श्रावस्ती शेतकरी.
५) छन्न - नोकर
५) धन्नीय - कुंभार - राजगृह
६) कपत - कुर - श्रावस्तीत भिक मागणारा व चिंध्या व तांदूळ गोळा करणारा.
७) महारोगी - सुप्रबुद्ध यांची धम्मदीक्षा -  राजगृह वेळूवन

अंतकरणाचे पैलू - मृदु, लवचिक, बंधमुक्त, प्रमुदीत, श्रद्धापूर्ण

दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध.
दुःख निरोधाचा मार्ग - धम्म.

ज्याला प्रारंभ आहे त्याला अंत नक्कीच असला पाहिजे.
मनाचे पैलू - नीमग्न, संदेह, विश्वासू, चैतन्य, सिद्ध, जागृत, समाधान

बुद्ध - धम्म - संघ - तथागत.

स्त्रियांची धम्मदीक्षा -

महाप्रजापती गौतमी, यशोधरा, मैत्रिणी,  कपिलवस्तू तथागतांनी परिव्रज्याची विनंती नाकारली होती. आणि ती दोन वेळा नाकारली होती. (न्यग्रोधारामात) कुटागार (स्थान)

स्त्री धम्मप्रवेश केवळ व्यावहारिक कारणावर आधारलेला होता. आठ नियम प्रवेश. मग पाचशे स्त्रियांना शिष्य नंदक याने उपदेश दिला. आनंदाने प्रश्न केला, "धम्मस्त्री प्रवेश का नाकारता येईल तथागता?"

यशोधरा - भद्दा कच्चाना (भद्रा कात्यायना) म्हणून प्रवेश प्रव्रज्येनंतर ओळखली जाऊ लागली.

चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा - चांडालिका ही एक जात होती. त्या जातीत प्रकृती नावाची मुगली होतं श्रावस्ती जेतवनात राहत होती. अंत्यज म्हणून तिचे आयुष्य व्यवस्थेने ठरविलेले होते. तिची आई मातंगी. प्रकृतीच्या आग्रहामुळे मातंगीने प्रकृतीचा विवाह आनंदाची लावावा यासाठी आग्रह धरला. 

कान मळाचे, डोके अश्रूंचे, तोंड थुंकीचे,  नाक घाणीचे, शरीर मलमूत्राचे घर आहे.
उपदेश कोणत्या भागावर प्रेम आहे? कोणता भाग आवडतो?

बुद्धकालीन जातीप्रथा -
अंत्यज, सोपाक, चांडालिक, मांग, नाव्ही, चांभार, कुंभार, ब्राह्मण, भंगी, अस्पृश्य, हीन, महारोगी

बुद्धकालीन अंधश्रद्धा -
चेटूक, करणी, भानामती, मूठ मारणे,

बुद्धकालीन प्रथा -
स्त्री केशकर्तन, मुंडन पशुबळी, नरबळी, यज्ञ, पूजा, पाठ, ब्राह्मण भोजने

पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा -

आघात - दुःखआघात झाले तरी विचलित न होता आपली बुद्धिमत्ता निर्भयपणे व्यक्त व्हावी. भद्र - व्यवहारिक.
कात्यायनी म्हणजे काय?
अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते.
अंगुलीमाल दरोडेखोर - कोसल देश प्रसेनजितराजाच्या प्रदेशातील दरोडेखोर

प्रसेनजित - पसेनदी

गाग्र्य आणि मैत्रायणीचा पुत्र अंगुलीमाल. प्रसेनजित आणि अंगुली कदाचित दोघे भाऊ. प्रसेनजित राजा आणि डाकू अंगुली. 
राजाला त्रास देणारा डाकू जो शोषित आहे. उद्धारकारण तथागत म्हणतात, "राजन आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या!" म्हणजे काय?

दुःखासारखी यत्न देणारी दुसरी जखम कुठलीच नाही. सर्व जखमा खपल्या धरून बऱ्या होणाऱ्या.

सातपुड्यातील पाचशे डाकूंना धम्मदीक्षा.
एकशे बावीस लोकांच्या टोळीची धम्मदीक्षा चंबळ खोरे - मांग. शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाणारी जमात.

संग्राहक - विश्वनाथ साठे, पुणे

Comments

Popular posts from this blog