तृतीय खंड -
बुद्धांनी काय शिकवले - धम्मामध्ये बुद्धाचे स्थान -
ख्रिस्ताने धर्मीयांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले - ख्रिस्ती धर्म
इस्लाम धर्मात मुमुक्षुने प्रथम महंमद प्रेषित आणि महंमद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानल्याखेरीज मोक्ष (निजात) नाही - इस्लाम धर्म
बुद्ध धम्मात असे स्थान बुद्धांनी स्वतःसाठी ठेवले नाही.
धम्म म्हणजे शोध. पृथ्वीतलावरील मानवांच्या जीवनाचा सखोल. या अभ्यासातून जो उदयाला तो धम्म.
बुद्ध निर्माणानंतर पहिली संगिनी (संगिती) झाली त्यात उपाली, आनंद, कपिलवस्तूवाशी व काश्यप हा अध्यक्षतेत होता. संघाची ही बैठक होती.तथागत गेल्यावर काश्यपाने बुद्ध जीवनातील घटनांवर चर्चा करायला हवी होती. परंतु तसे झाले नाही.
बुद्ध आणि त्याचा धम्म या दोन गोष्टी अगदी अलग होत. धम्म हा स्वतःच उत्तराधिकारी. अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे. त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. मी मार्गदाता आहे. मोक्षदाता नाही. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी समजले जातात. प्रेषिताचे काम धर्म इमान राखणाऱ्यांना मोक्ष प्राप्ती करवून देणे. त्यासाठी जे आपणास देवदूत मानत असतील व आणलेल्या देवाच्या आज्ञा प्रेषितांकडून ऐकून तशा प्रकारचे वर्तन करून पाळत असतील तर नरकापासून सुटका करण्याची हमी प्रेषितांची, देवांची अल्लाह, ईश्वरांची.
श्रमण दार्शनिक स्थिती डोळ्याने वस्तू पाहिली तर तिच्या बाह्यरूपकावर विसंबून (भारला) राहू नकोस. इंद्रिय संयमी ठेव. रसग्रहण.
कानाने स्वरवाज - श्रवण ग्रहण, नाकाने वास - रसग्रहण, जिभेने रुची - रसग्रहण, शरीराने वस्तू - स्पर्श ग्रहण, मनाला त्या वस्तूची - जाणीव ग्रहण, सामान्य माणसाप्रमाणे मोहून जाऊ नकोस.
इंद्रियदमन, मनचित्तदमन - जागृत, अभ्यास, चिंतन जागृतावस्था, व सम्यक स्मृती जाणीव, आत्मसंयम - जाणीवपूर्वक संयम ठेवणे - सर्वकाळ
भावना - एकांतवास - ध्यान
निर्वाण - राग, लोग, विकारांचा नाश - निग्रह - मोक्ष - निर्वाण
धर्माला कसोटी लावून प्रश्न विचारण्यासाठी आणि परीक्षणीय चिकित्सा करणे कोणत्याही धर्म संस्थापकाने मार्ग मोकळे ठेवले नाहीत केवळ बुद्ध धर्मातच ही मोकळीक आहे.
बुद्धांच्या धम्मासंबंधी -
धम्म, अधम्म, सधम्म हे तीन वर्गीकरण आले आहेत.
धम्म म्हणजे काय? -
धम्म म्हणजे जीवनसुचिता राखणे होय. वाक् सुचिता म्हणजे असत्य भाषेपासून अलिप्तताराखणे होय.
मन सुचिता म्हणजे वासना, द्वेष, आळस, तंद्री, उद्धटपणा, शंका, गोंधळ यापासून अलिप्तता राखणे होय. सुरक्षा राखणे होय. म्हणजेच काया - वाचा - मन शुद्ध आणि पवित्रता राखणे होय.
कायामध्ये - मनुष्य हिंसा, चोरी काम मिथ्या
वाचामध्ये - असत्य, बडबड, व्यर्थ चर्चा मनमध्ये - लोभ, ईर्षा
शुद्धतामध्ये - सम्यक दृष्टी
काया - वेदना - चित्त - विचार - समाधी घात - अपयश
१) शिलाघात - चोरी, काम, मिथ्याचार असत्य भाषण, आळस वाढविणाऱ्या मध्याचे सेवन
२) चित्ताघात - लोभ, दुष्ठपणा
३) दृष्टिघात - दान, त्याग, परित्याग, गुणहीण, सदाचार - दुराचार यांना फल नाही.
वरील गुणांनाचे पालन व अवगुणांचे टाळण केले तर शीललाभ, चित्तलाभ, दृष्टिलाभ होतो.
धम्म - जीवन परिपूर्णता म्हणजे आत्मसाधना होय.
चित्तमल - मनाचा मळ - आसवे. रडू दिले पाहिजे. चित्तावरील मळ नाहीसा होऊन स्वच्छ स्वभाव होतो.
अंतःबाह्य वस्तूचे दान व प्रेरणा - दान.
क्षमाशील व प्रेरणा - शांती.
अखंड मग्न व प्रेरणा - वीर्य.
कौशल्याने ध्यान व प्रेरणा - ध्यान.
भौतिक अधिभौतिक अतिभौतिक धर्मात (एकाचधम्म चिंतनात) मग्न न राहता सर्वधर्म चिकित्साचिंतन व तशी प्रेरणा - प्रज्ञा.
निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. केंद्रवर्ती सिद्धांत.
बुद्धपूर्वकालीन परंपरा - निब्बाण - आत्म्याची मोक्षमुक्ती समज.
बुद्धपूर्व निब्बाण संकल्पना - १) योग (वेळ, काळ)
२) लौकिक (शरीर)
३) औपनिषद (आत्मा)
४) ब्राह्मणी (आत्मा)
निब्बान
बुद्धकालीन निब्बाण - आत्ममोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा विचार (वास्तव)
जिवंतपणीचे सुख दुसरा विचार (वास्तव) विकारांवर मात तिसरा (अंतःकरण)
रागाग्नि, द्वेषाग्नि, मोहाग्नि, जन्म, जरा, मृत्यु, दुःख, उपहास, निराशा यामुळे माणूस जळत राहतो.
जगातील साहित्य लोभ आणि रागाने व मोहाने क्षुब्ध, मूढ झाल्याने ते आपले स्व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात व त्यामुळे ते स्वतः व वाचनाऱ्यांनाही दुसऱ्यांदा वेदना व पीडा उत्पन्न करतात. दुःख, पीडा उत्पन्न करणारे साहित्य जगभर प्रसिद्ध होते. ते विकत घेतले जाते.
षडविकारांचा नाश हे दुःखमुक्तीचे मार्गस्थान आहे.
विकार - तृष्णा - कामुकता, लोभ,
वितृष्णा - घृणा, क्रोध, द्वेष म्हणजे अग्नी - भावना, दृष्टिकोन, भूमिका बदलतात.
अविद्या - जडता, मूर्खता, मूढता म्हणजे अग्नी - असत्य, मोह, वर्तन व विचार बदलतात.
वरील सर्व बाबी निब्बाण अडचणींच्या श्रृंखला आहेत.
निब्बाण - धर्ममार्गावर चालतांना आपल्या प्रवृत्तीवर ताबा ठेवणे - निर्दोष जीवन म्हणजेच अष्टांगमार्ग.
परिनिब्बाण - शरीर नाश पावते, पाहणे थांबते,, संज्ञा नाहीशी होते, चलन वलनादी क्रिया थांबतात, चेतना जातात.
क्रोध, द्वेष, ईर्षा, मच्छर, कृपणता, लालचिपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद इ. विकार आहेत.
परिस्थिती पुढे कधीही शरणागती पत्करणे ठीक नाही. लोभसंयम, रागसंयम, विकारसंयम.
लाभच्छेने तृष्णा निर्मिती व मालमत्ता मिळवण्याच्या इच्छा स्वामित्वाची धारणा चिटकवून घेतात तेव्हा त्याचे रूपांतर लोभ व तृष्णेमध्ये होते. तृष्णा काबूत ठेवली पाहिजे. ही स्थिती सर्वकाळ जिंकता आली पाहिजे. कारण मारामारी, आघात, झगडे, वाद, प्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य या सर्वांचे मूळ लोभतृष्णेत आहे. यामुळे वर्गकलह निर्माण होतो. समूह कलह निर्माण होतो.
सर्व वस्तू ह्या हेतू व प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात त्यांचा उच्छेद झाला की, त्या अस्तित्वात ठैरत नाही.
सर्व कृती ह्या हेतू व प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात त्यांचा उच्छेद झाला की, त्या अस्तित्वात ठैरत नाही.
सर्व कृतीवर्तन या हेतू व प्रत्येय यामुळे उत्पन्न होतात त्यांचा उच्छेद झाला की, त्या अस्तित्वात ठैरत नाही.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश - जीव या प्रत्येक तत्त्वाचे पृथक्करण झाले तर तो प्राणी प्राणी म्हणून उरत नाही. म्हणजे या सगळ्या तत्त्वांची वेगवेगळी भूमिका पाहिली, या सर्वांना वेगवेगळे केले तर जीव हा एक तत्ववानिशी राहत नाही. अनेकतत्वी वस्तू म्हणून तो स्वरूपात दिसतो - असतो. तो अनेकतत्वी वस्तू आणि ते म्हणून या जगामध्ये असतो.
एकतत्वी वस्तू ही नित्य आहे. अनेकतत्वी वस्तू ही अनित्य आहे.
भूतकाळामध्ये जो प्राणी होता तो वर्तमान काळात असणार नाही आणि तो भविष्यातही तोच असेल असे नाही. परिवर्तनशील संवर्धनशील दोन क्षणी जीवनाम तोच तो नसतो. सर्वच अनित्य असल्यामुळे परिवर्तन शक्य आहे.
यापुढे शून्यवादाचा उदय झाला. शून्यवाद म्हणजे काहीच नाही. ह्या विश्वात प्रत्येक क्षणी परिवर्तन सुरू आहे. सर्व वस्तू अनित्य असल्यामुळे कोणत्याही वस्तू संबंधी आसक्ती राखणे ठीक नाही.
कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. हे मान्य करणे म्हणजे धम्म. नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळत नसून माणसावर सोपविलेली आहे. नैतिक व्यवस्था ही कर्म (कम्म) नियमाप्रमाणे सांभाळली जाते. इतर कोणावरही ही नैतिक व्यवस्था नाही.
कर्म म्हणजे कार्य. त्याचा विपाक म्हणजे परिणाम. कार्यपरिणाम. कार्यकारण. कार्यकारण मीमांसा म्हणजे विवेक.
दिवसा मागून जशी रात्र येते त्याप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो. नियम आहे. कुशल - अकुशल कर्म हे त्या प्रकारे कारण परिणाम घेऊन येतात. कर्म व त्याच्या परिणामात कालांतर म्हणजे काळ (भेद - फरक - अंतर) असते. हे तत्काळ, दीर्घ आणि अनिश्चित स्वरूपाचे असतात. काही कर्मांचा परिणाम नसतो. ते शून्य कर्मामुळे परिणामकारक होऊ शकत नाहीत. कर्माचा विपाक केवळ कर्त्याला भोगावा लागतो. परंतु काही कर्माच्या नियमांमुळे कर्त्यालाच परिणाम भोगावा लागतो. दुसऱ्यांना त्याचा परिणाम नाही असे नाही. त्याअर्थी कर्म हे दुसऱ्यांनाही त्रासदायी ठरतात हेही सत्य आहे.
बुद्धाच्या धम्मामध्ये जे स्थान ईश्वराला नाही ते नीतीला (कर्म) आहे. कारण व्यक्ती येतात जातात. जगतातला नैतिक व्यवस्थेचा नियम कायम राहतो. कर्म नियम केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेची आहे. व्यक्ती, भाग्य, दुर्भाग्य, नसीब यांचा कोणत्याही प्रकारचा सहसंबंध नाही. कर्म नियम हा केवळ वैश्विक नैतिक व्यवस्था राखणे हे आहे. धम्माचे प्रमुख अंग म्हणजे कर्म होय. नीतिमत्तापूर्ण कर्म.
अधम्म म्हणजे काय ? -
दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय.
घटना - कारण - मीमांसा - कार्य = कारण त्याचा परिणाम आणि अंतरकाल = घटना
कारण + घटना = परिणाम
काही तत्काळ असतात.
कारण + घटना = परिणाम
काही दीर्घकाळ असतात.
कारण + घटना = परिणाम
काही नैमित्तिक पण असतात.
घटना मानवी हस्तक्षेपकारण आणि प्राकृतिककारण यावर अवलंबून असतात. आणि या दोघांचेही परिणाम वैविध्यपूर्ण असतात. बुद्ध पूर्वजांचा दोन वेळा उल्लेख या घटनेच्या मीमांसेसंदर्भात आलेला आहे.
जर मनुष्य दैव चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? दैवी चमत्कृतीला विरोध म्हणजेच बुद्धीवादी बनणे, स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध घेणे, भ्रामक समजुती नष्ट करून मानवी शोधप्रवृत्ती सुधारणे. भ्रामक समजुती ह्या मानवी शोधप्रवृत्ती नष्ट करतात. त्यांचे उगम स्थान नष्ट करतात. आणि म्हणून दैवी चमत्कृतीला विरोध करणे, सत्याचा शोध घेणे, भ्रामक समजुती नष्ट करणे म्हणजे कम्मसिद्धांत - हेतूवाद.
ईश्वरावर विश्वास हे धम्म अंग नव्हे. ईश्वर नाही मग त्याचे अस्तित्व कसे मानायचे? उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी इथून अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? ईश्वर सर्वशक्तीमान, सर्वशक्तिमत्ता, सर्वशक्तीमक्ता खोटी आहे. जर त्याने मनुष्यप्राणीमात्रास उत्पन्न केले असल्यास सर्व कर्ताकरविता जर तो आहे तर मनुष्याला जगातील कोणतेही कार्य का करावे लागते? क्रियेचा कर्म का ठरतो मनुष्य? तो तर निष्क्रिय प्राणी ठरेल. जर असे असेल तर ब्रह्माने निर्माण का केले? मानवी अस्तित्व व ईश्वर गरजेसाठी निष्क्रियता निर्माण होईल. ही सुधाररचना आहे. अन्याय आहे. ईश्वर कृतीकार्य केवळ भ्रम आहे.
क्रियाकलाप (धार्मिक व्रतविधीकांड) भ्रामक समृद्धीचे आगर असते.(२५० पा. क्र.)
पूजा, पाठ, विधी, व्रतवैकल्य दुःखाच्या उत्पादित बाबी आहेत. यातून पुरोहित बांडगुळी विचार समजात पेरल्या जातात. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करून दाखवा किंवा त्याने ही सृष्टी कशी निर्माण केली ते सांगा? जर तथाकथित ईश्वराने 'काहीतरी' हे 'काहीतरी' मधून निर्मिले असेल असे म्हटले तर ज्या 'काहीतरी'तून जे नवे 'काहीतरी' निर्मिले ते निर्मितीपूर्वच काही तरी' अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून या ईश्वराला त्या पूर्वीचे अस्तित्वात असलेल्या 'काहीतरी'चा निर्माता म्हणता येणार नाही. कसे म्हणता येईल त्यास आदीकारण? म्हणता येणार नाही.
कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यास तिला प्रमाण म्हणून असले पाहिजे. ते प्रत्यक्ष व अनुमान असे होय.
आत्म्यावरील विश्वास हाही अधम्म आहे. आत्म्यावरील अविश्वासाला अनात्मवाद म्हणतात. आत्मचिकित्सा आकृती व आकार? शरीर मरणोत्तर आत्मस्थिती काय? आत्मा आणि कर्मकांडे - श्राद्ध, दहावा, पिंडदान, विधीयाग, शोषणाचे षडयंत्र आहेत.
पाच तत्वापैकी आकाश तत्व म्हणजे विज्ञान. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ज्ञानमूलक असते. सहज ग्रहण करता येते. अंतर्बाह्य घटनेचे ज्ञान होते. म्हणजे ज्ञान.
सुखकर - दुःखकर लक्षणयुक्त चित्त म्हणजे भावनामूलक लक्षण - विज्ञान वेदनांची अनुभूतीनिर्मिती करते. म्हणजे भावना.
क्रियाशील अवस्था विशिष्ट ध्येयोधिष्टीसाठी क्रिया आणि प्रेरणा म्हणजे संकल्पजनक विज्ञान म्हणजे कार्यकृती प्रेरणानिर्मिती. चेतना.
या तिन्ही गोष्टी म्हणजे प्रकृती विज्ञान होय. विज्ञानाची प्रकृती होय. प्रकृतीचे विज्ञान होय.
नामस्कंद रूपस्कंद
नाम - कार्य, चेतना + रूप - पाच तत्व
पाचतत्व चित्तचेतना उदय = जीवितप्राणी निर्मिती.
जीवनातील प्रधानतत्व म्हणजे विज्ञान. देव नाही.
आत्म्याचे कार्य कोणते?
यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे कुटदंत, उज्जयी, उदाई या तीन ब्राह्मणांशी यज्ञवाद तथागतांनी केला.
यज्ञात प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईल म्हणतो तो धर्म हीन धर्म आहे.
जो यज्ञ विचारदान, गृहदान, सांगतो तो द्रव हीन धर्म आहे.
उपदेशग्रहण, निरंतरदान सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रज्ञावान आणि दुःख रहित आनंद तो खरा यज्ञ. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म धम्म नव्हे. जगाची उत्क्रांती झालेली आहे निर्मिती यावर त्यांचा विश्वास नाही. धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धम्म नव्हे.
शीलरहित विद्या नाशकारक आहे.
जो राखून बोलतो, विचार संयमी व आपल्या देहाने दुसऱ्यास उपद्रव करीत नाही तो निब्बाण मिळवू शकतो.
विद्या अधिक नसले तरी चालते कारण शील ही सर्वोत्तम वस्तू आहे.
धर्म पुस्तके प्रमादित आहेत असे मानणे म्हणजे अधम्म होय. ग्रंथ प्रामाण्य खोटे असते. आधारहीन. वेद म्हणजे निष्पथ अरण्य, निर्जल वाळवंट, नरक आहे. तेविज्युसुत्त यामध्ये तथागतांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. "जे केवळ ऐकले, सांगितले, पुस्तकात लिहिले, डोळ्याने पाहिले, तर्क केले, न्याय केले, समजले, अनुकूल झाले, बाह्य खरे झाले, केवळ बाह्य सत्य झाले, कोणी व्यक्तीने सांगितले, एवढ्यावर विश्वास ठेवू नका. केवळ हितकारक आहे, टाकाऊ आहे, त्यातून दुःख कष्ट उगवते आहे काय हे पाहणे. त्याचा नकार - स्वीकार करणे. त्याग करणे. त्यापासून दुःख उत्पन्न होत असेल तर ते टाकून देणे ते सर्व त्याज्य करणे म्हणजे धम्म.
सद्धम्म म्हणजे काय ? -
मन हे कृतीची कार्य प्रेरणा आहे. मन हे कारण आहे. सर्व तृष्णाभोगाचे व दुःखोत्पन्नतेचे मूळ म्हणजे मन आहे. जग हे धम्मराज्य बनविणे. धर्माकडे तीनच राज्य होय - १) स्वर्ग २) इहलोकी ३) नरक.
धम्माचे राज्य ईलोकीचे आहे. त्याची प्राप्ती धम्मशील आचरणाने घडते. पंचशील, अष्टांगमार्ग, पारमिता यावर धम्माची भर आहे.
अनुचित व्यवहारवर्तन म्हणजेच दुःखाचे मूळ.
देवदाहसुत्तामध्ये एके ठिकाणी असे सांगितले गेले आहे की, "नैसर्गिक परिस्थितीला वळण लावणे, चित्तसाधना सुसंस्कृत करणे ही पहिली धम्माची शिकवण आहे." यात जैन धर्माबद्दलसुद्धा उल्लेख आलेला आहे. सुलेखसुत्तामध्ये असे सांगितले गेले की, "उचित म्हणून साध्य समजल्यावर कोणी सोबत नसला तरीही धैर्यशील, धैर्यानिशी मार्गावरून विचलित न होणे, दृढ निश्चय करणे, सम्यक संकल्प, दृष्टीवाणी, कर्म, अजिविका, व्यायाम, स्मृती, समाधी अनिश्चल असली पाहिजे.
जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो तो सधम्म. प्रज्ञेला उत्तेजन देतो तो धम्म. लोहिच्च ब्राह्मणांबरोबर झालेला वाद हा ज्ञानमार्ग मुक्त व सर्वांकडे जाणारा आहे. शालवाटीकेमध्ये कोशल प्रदेशात एका खेडेगावात हा वाद झालेला आहे.
कोसंबीचा सुस्वर विहार.
विद्या - शब्द, राज, युद्ध, ज्योतिर, विद्या, होण, विद्या व प्रज्ञा - ज्ञान व शहाणपण असा भेद त्यात आहे.
चार गुण बहुजन सुखरत, स्वभावतःरम्य, आर्यमार्ग अनुयायीनिष्ठ, विचारसमरस व विचारनिष्ठ याचबरोबर संकल्प उत्पन्न, संकल्प मुक्त सुप्रज्ञावान व थोर मनुष्य.
१) मैत्री - मैत्रीस उत्तेजन,
२) प्रज्ञा - विचार पद्धती धम्म
३) शील - आचरण पद्धती धम्म अखिल जीवित जीव जातीसंबंधी मैत्री, प्रेम. शील हे प्रज्ञा पेक्षा श्रेष्ठ आहे. शुद्ध असले पाहिजे.
४) करुणा - करणेस उत्तेजना. गांधारदेशात (आजचा पाकिस्तान) रोगाने पिछाडलेला वृद्धाची सेवा करून करुणेची प्रारूपे तथागतांनी दर्शविली.
भूमीला इजा होत नाही. हवेशी कोणीही प्रतिक्रिया करू शकत नाही. जल जळत नाही. त्याप्रमाणे पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल, गंगेसारखे गंभीर मन आणि त्याची अवस्था करुणहृद्य असली पाहिजे.
खरा भिकू हा मैत्री भावनेने मृदू असतो. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. अंतकरणाची मुक्तता. सामाजिक भेद नष्ट करणे म्हणजे धम्म. जातीसंस्थेचा विरोधक व समतेचा पहिला अत्यंत खंबीर समर्थक म्हणजे तथागत गौतम बुद्ध.
जाती विषमतेच्या विचारांचे खंडन करतांना तथागत गौतम बुद्ध अश्वलायनसूत्तामध्ये निर्देश करतात. यामध्ये जात विषमता कथाआशय आला आहे. योन व कंबोज या देशात दास व मालक दोन वर्ण आहेत. स्वामी आणि दास अशी तेथील समाजव्यवस्था आहे. ब्राह्मणी काय ऋतुमती म्हणजे (पोटूश्या) होत नाहीत काय? ब्राह्मण स्त्रीशी क्षत्रियाने संयोग केला तर काय जन्मास येईल? चतुरष्पाद प्राणी की मनुष्य? अश्वलायनाला उत्तर देता येईना. इतर स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणी पण गर्भार राहतात, प्रसवतात. मग प्राचीन ब्राम्हणीची हे नालस्ती करतायेत का? असा प्रश्न तथागत इथे करतात. ब्राह्मणांनी निर्माण केलेली ही चार वर्णांची विभागणी सर्व जगात मान्य आहे का? आव्हान व वस्तुस्थिती.
ज्या गोष्टीने वाईटपणा येतो ती गोष्ट नाकारली पाहिजे. वंश, कुल, सामाजिक दर्जा - ज्या घरात जन्मला त्या घरची अग्नी लाकूड, शेण, गौरी केर कचऱ्याची कोणत्याही पदार्थांची आहे ती अग्नीच आहे. मग अर्भक हे अर्भकच त्याची जात कोणती? आग आगच असते. वस्तूवरून ती आग कशाची आहे हे ठरविले जाते. प्रथम व शेवटी ही आगच असते. उच्च आदर्श हा उच्च कुळापेक्षाही श्रेष्ठ असतो. माणसाचे मोठेपण जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरते. अंगीक योग्यता - कुशलता अनाथपिंडीकाच्या जेतवनातील हे उपदेश जातिव्यवस्था निर्मूलनातील अत्यंत जाज्वल्य असे आहेत. हे संवाद श्रावस्ती येथे घडलेले आहेत.
केशकृंचिता - टक्कल असलेले - केस कापलेला.
वृषल - बहिष्कृत असा अर्थ आहे.
निंदाप्रिय, मिथ्यादृष्टी, वंचक असा मनुष्य रागाने लांछित दीर्घाद्वेषी, दुर्गुणी, सजीवांना उपद्रव्य करतो, मनुष्यांचा नाश करतो, चोरी करतो, ऋणकृतघ्न, लबाड, लबाडी करतो, हिंसा, खोटे बोलतो, शीलभ्रष्ट, मातृ-पितृकृतघ्न, कपटी, वाईटविचारी तो बहिष्कृत - वृषल होय.
समतेची शिकवणी देणारा धम्म म्हणजे मार्ग - धम्ममार्ग जो संघर्षात योग्य तो समाजात योग्य असायला पाहिजे तसा तो समता युक्त धम्म.
संग्राहक - विश्वनाथ साठे, पुणे

Comments
Post a Comment