खंड पंचम -
संघ
अनुयायी - भिक्खु, गृहस्थ - उपासक हे दोन वर्ग संघामध्ये असतात.
सत्यज्ञानाचा शोध - परिव्राज्यक फार जुनी संस्था आहे. प्राचीन परिव्राज्यक कौटुंबिकत्व सोडून इतस्थ परिभ्रमणात करणारा समूह म्हणजे संघ असे म्हणायचे. त्यात स्त्रिया पण असत. नियमरहित ही संस्था असे. प्रथम तथागतांनीच या परिव्राज्यक प्राचीन संस्थेचे रूपांतर संघामध्ये केले. त्यांना उपदेश, उद्देश, नियम दिले. बौद्ध संघात केवळ एक भेद होता तो भेद म्हणजेच लिंगभेद. स्त्री भिक्खुनी व पुरुष भिक्खु असा तो भेद असे. संघातील घटकाचे दोन वर्गात रूपांतर व्हायचे.
१) श्रमनेर २) भिक्खु
श्रामनेर हा वीस वर्षाखालील तर भिक्खु संघ हा वीस वर्षाच्या पुढील.
त्रिशरण - बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाणे म्हणजे त्रिशरण.
बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम शरणम् गच्छामि, संघम शरणम् गच्छामि' अशाप्रकारे या त्रिशरण मध्ये द्वितीयंती आणि तृतीयंती अशा प्रकारचे चरण लावून त्रिशरणाचे नऊ पद निर्माण होतात. ते मिळून त्रिशरण होते.
दशशीला - अहिंसा, अचोरी, ब्रह्मचर्य, सत्य अमद्यपान, अवेळी अन्नसेवन, असभ्य अनैतिक वर्तन, अलंकारविहिन शरीर,ऐश्वर्यारामापासून दूर, सुवर्ण व रोप्यांचा अलोभ ह्या दहा प्रतिज्ञा म्हणजे श्रामनेर बनण्याचे प्रक्रियेतला दशशीला मार्ग आहे. परिव्राज्या व उपसंपदाशिवाय भिक्खूत्व नाही. ही एक अवस्था असते. त्यांचे नियम पाहिले तर ते शरीर मानसिक शरीर मानसिक गरजा, विचार, कृतीवर्तनाच्या बाबतीतील आहेत. भिक्खु पूर्णपणे स्वतंत्र हक्काधिकारयुक्त व ज्ञानाचा पासंग असलेले आशयाचे हे नियम आहेत.
पाराजिका - दोष, भिकूची चूक असेल तर संघातून हकालपट्टी,
प्रतिज्ञाभंग - धम्माविरुद्ध अपराध (विनयपीटक) परतफेड, पश्चाताप - शिक्षा सेखीय धम्म शिष्टाचाराचा नियम असे शिष्टचाराचे एकूण पंचाहत्तर नियम आहेत.
कायदेकानून सहित या शिक्षा आहेत. न्याय, आरोप, खटला, बचाव, संधी, बहिष्कार या सर्व बाबी नियमाने होत.
प्रतिबंध - शीलनिर्मिती व शीलसंवर्धन होय. चुकीची उघड - सर्वांसमोर कबुली देणे प्रतिबंधाचा प्रकार होय.
गृहस्थ, श्रामनेर, भिक्खु, भिक्खुनी यांचे नियमत्व व धम्म परिवर्तन यांच्यातील प्राचीन बुद्धकालीन अवस्था प्रकार विविध प्रकारात चालत आलेली दिसून येते.
भिक्खु आणि त्यांच्याविषयी बुद्धाची कल्पना -
चित्तमलनिर्मल, संयमी, सत्यवत, सतवचनी, शालीन, मधुरवाणी, शिलाचरणी, मैत्रीत्व.
नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख न करणे. ओघतीर्ण - पाच बंधमुक्त मनुष्य भिक्खुतत्व. चिंतनात आनंद - मन, अविचाराचे भय, सदैव जागृत, स्वस्वामी, धम्माचे ज्ञान, प्रज्ञाशोध, संघावर एकाग्र, शरीरप्रक्रियांचे रात्रंदिवस ध्यान, करूणेतील मन, करुणेत समाधानी, धम्मश्रद्धा.
शील आणि यश सर्वत्र पूजनीय, दुःखमय
भिक्खु आणि तपस्वी -
भिक्खु व तपस्वी यांची भिन्नता - निग्रोध नावाच्या परिव्राज्यकाबरोबर तथागतांची चर्चा.
राजगृह गृध्रकूट पर्वतावर वस्तीस्थान - कुटुंबरिका राणी जवळ - निग्रोध होता. सुमंगधान नदीकाठी.
आत्मक्लेश, कलंक, लोभ, हाव, योग्य अयोग्यत्येचा अभाव, उपभोगी, मोह, भेदमती, कलंकत्व, तिरस्कार, मत्सर, स्वमान, असत्य मान्यता, क्रोधाधिन, शत्रुत्व, कपटी, कावेबाज, कृपण, निर्दयी पोकळ डौल, ढोंगी, फसवा, भावनाहीन, लोभी, दुष्ट, वासनाधीन विकार यांपासून अलिप्त.
भिक्खु आणि ब्राह्मण -
१) भिक्खु - भिक्खु बनावे लागते. भिक्खु ही जात नाही. भिक्खु नष्ट होऊ शकतो. भिक्खुत्व नष्ट होऊ शकते. पाप - पुण्य, जन्म - मृत्यू संस्कार मान्य नाही. भिक्खुला मात्र नैतिक मानसिक शिक्षणाची आवश्यकता असते. संपत्तीची सवलत भिक्खूंना नसते.
२) ब्राम्हण - ब्राह्मण जन्म जात आहे. त्याला सामाजिक जात आहे. ब्राह्मण ब्राह्मणच राहतो. तो पुरोहितशाही करतो. त्याला पाप - पुण्य, जन्म - मृत्यू संस्कार कल्पना मान्य आहेत. मानसिक नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. त्या जातीत जन्माला आला तो ब्राम्हण झाला. ब्राह्मणांना संपत्तीची सवलत आहे.
हा नैतिक फरक भिक्खु व ब्राह्मणात आहे.
मालमत्ता ही नैतिक व मानसिक आचार विचारांना निर्णयत - नियंत्रित करते. या लालसेने नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा पडतात.
भिक्खु व उपासक -
१) भिक्खु - ब्रह्मचर्य, अविवाहित, असंपत्तिक, अहिंसक, पंचशील, भिक्षापात्र सक्तीचे, व्यक्तिगत साधना व भिक्षा, लोकमार्गदर्शन
२) उपासक - अब्रह्मचर्य, लग्न, मालमत्ता, गरजेसाठी हिंसा व बंधन नाही, पंचशील, पाळण्याजोगे नियम, इच्छेवर नियम, भिक्षा, भिक्खु सेवा व चिंतन.
तथागतांनी सदाचरणाचे राज्य स्थापनेसाठी सर्वांना धम्म सांगितला. करुणा, धम्मतत्त्व, सेवा, प्रेम, स्वतः संपूर्ण प्रथम ज्ञान, सर्वश्रेष्ठ, धार्मिक, ज्ञानसंपन्न - व्यक्तिगत व सामाजिक साधना, आदर्श, नितीतत्व.
भिक्खुची कर्तव्य -
भिक्खूची नवदीक्षितासंबंधी कर्तव्य - धम्म परिवर्तनाच्या काळी हे शक्य नव्हते तेव्हा परीक्षक मंडळ लायकी असल्यास उपसंपदा व भिक्खूत्व होण्याची प्रक्रिया म्हणून निर्णय द्यायचे. धम्म देशोदेशी पोचवता येईल म्हणून धम्मदूत पाठवीत. सर्व देशात धम्मदूत पोचले तेव्हा त्यांची संख्या साठ अशी होती. दोघांनी एका वाटेने दोघांनी न जाता दोन वाटेने दोघांनी जावे. अंत:करण करुणेने भरलेले ठेवून जा. दुःखीतांना बंधमुक्त करा.
शेत तनाने बिघडते. तन मनाने बिघडते. मन वासनेने. धम्मदान सर्वश्रेष्ठ, आनंद सर्वश्रेष्ठ, प्रजा गर्वामुळे, तृष्णेमुळे बिघडते. मोहापायी प्रजा बिघडते.
धम्मदीक्षा चमत्काराने करावयाची नाही.
मल्लांच्या गावी अनुपिय येथे भगव्वाशी भेट. माणसाला चमत्कार करता येईल किंवा नाही हे सिद्ध करण्यास धम्म शिकवत नाही. दुःखाचा पूर्ण निरास हे तत्व माझ्या धम्मात आहे. सुक्खन्नताची निंदा ही बुद्धतत्त्वज्ञानातील नसणाऱ्या अंधश्रद्धा व चमत्काराची कमी न्यून सांगते. हे एक प्रकारे धम्म या प्रथेतून बाद आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा चमत्कार अथवा अलौकिक गुढ सांगितलेले नाही - तथागत.
धम्मपरिवर्तन हे बळाने करावयाचे नसते. राजगृह व नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून तथागत प्रवासित होते. सुप्पीय परिव्राज्यक भिक्खु संघ व ब्रह्मदत्त नावाचा तरुण शिष्य रात्रीला अंबलटठिक्का बागेत विहाराजवळ थांबले. कोणी धम्म, संघ, बुद्ध विरुद्ध असे बोलला तर त्याचा द्वेष करू नका. मनात आढी आणू नका. क्रोधाविष्ट झालात तर दुसऱ्यांच्या बोलण्याची योग्यायोग्यता तपासता किंवा ठरविता येणार नाही. कोणत्याही एका इंद्रियाचे ज्ञान हे घातक, दोषयुक्त, सत्यास अपयुक्त असते. श्रवणदोष क्रोधाविष्ठता आणतो.
प्रशंसा, लोभहीन, जीवन प्रामाणिकपणे हृदयशुद्धीने व्यतीत केले पाहिजे. ब्रह्मचर्यपालन, संयोग व क्रियांपासून दूर राहिले पाहिजे. भिक्खुने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे.
सत्याचा शिक्षक जगातील कोणत्याही माणसाशी भांडत नसतो. श्रेष्ठ - शील, प्रज्ञा, ध्येय यासाठी झटणे - युद्ध करणे - वीरगती.
ज्यावेळेस शील संकटात आहे त्यावेळी संघर्ष करायला घाबरू नका. दुबळेपणाने वागू नका.
भिक्खु आणि उपासक -
भिक्षापाश -
अनिकेत म्हणजे घर सोडून असे. धम्मप्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव बौद्ध धम्माचा ऱ्हास होण्याचे कारण ठरले. प्रवेशित तो दुसऱ्या धम्मातही फिरू शके म्हणजे (दोन्ही) धम्म - धर्म आचरणाची मुभा त्याला मिळे. यामुळेच तत्वांच्या आचरणात परस्परावरील परिणाम होत.
अंगूत्तरनिकाय - नियम भिक्षापाश.
विनयपिटक - भिक्खुच्या चुकांचा व न्यायदानाचा भाग असलेला आहे. उपसकांनी केलेल्या तक्रारींचा योग्य न्याय साधन म्हणजे विनयपीटक.
पंचशील, अष्टांगमार्ग, दशपारमिता - उपासक व भिक्खू ही दोन गट समोर ठेवूनच उपदेश त्यामध्ये आहे.
काहीही कृती करण्यापूर्वी रूप, गंध, रूची, शब्द आणि स्पर्श यासंबंधीच्या असक्तीला मनातून नष्ट करणे.
बाह्यपदार्थासोबत न धावता एकटे राहणे. स्थिरचित्त - बाह्यपदार्थ ही केवळ साधने आहेत. साध्य नाही. त्याचा वापर कमलदलाप्रमाणे पाण्यात राहून करणे योग्य.
धम्म हा दोघांनाही समान आहे.
उपासकांसाठी नियम - धनवंतासाठी नियम -
दारिद्र्यात जगू नका. संपत्ती स्वागताहार्य व विनयशाशित असली पाहिजे. सन्मानाने धन मिळवा. आपले आप्तेष्ट, नातलग, सन्माननीय मार्गानेच सुधन मिळवीत आहेत याची काळजी घेणे व दीर्घायु होणे.
१) श्रद्धा - सम्यक बुद्धी, विद्या, सदाचरण
२) सदाचार - हिंसा, चोरी, व्याभिचार, खोटे, सुरामदिरापान यापासून परावृत्त
३) औदार्य - मुक्तहस्त दान, कंजूषीपासून दूर
४) प्रज्ञा - आळस, तंद्री, लोभ, हावरेपणा, द्वेष अनावधान, धांदल यांनी ग्रस्त नसणे, शंकाखोर मन नसणे. या चारही गोष्टी म्हणजे सुख व सन्मान यांना पारखा नसणे.
दोषहित प्रज्ञेनी दृष्टी स्वच्छ व संपूर्ण ज्ञानी होता येते.
सियालवाद - गृहस्थासाठी विनय -
राजगृह, वेळवण विहारात कंदलनिवास सियाल हा तरुण पुत्र.
मद्यपान - संपत्तीनाश, वाढती भांडणे, रोगाधिनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक, बुद्धीनाश या प्रकारे नाश होतो. जिंकलात तर सहकाऱ्यांचा दोष. हरलात तर द्रव्यनाश निश्चित.
कुसंगत - जुगार, व्यभिचार, लबाड, दारुबाज, पैसेखाऊ, हिंसक.
इतर मित्र - शत्रू, लोभी, बोलघेवडा, कृतीशून्य, खुशामत्या, उधळ्यावृत्तीचा पुरुष. स्वार्थी ), लोभी, भीती, देतो कमी घेतो अधिक, आतून शत्रुत्व
बोलघेवडा - कृतीशून्य पोकळ शब्द -भूतभविष्य हेतू, दगा, सहाय्य न करण्याची प्रसंगी क्षमता नाही सांगतो.
खुशामती - दुष्कृत्यसंमत, तोंडावर स्तुती पाठीमागे निंदा.
उधळ्या - क्रीडाभृंग अवस्थेत सोबती करतो.
पुत्रांसाठी विनय -
वाढवडील - आई, आप्तेस्वकीयांची सेवा, धर्म, कुळपरंपरा, योग्यता, गुणांचा उपदेश, दुर्गुणांपासून दूर, व्यावसायिक शिक्षण, साजेल असे लग्न व आपली मालमत्ता योग्य ते वेळी सुपूर्द करतात. काळजी.
शिष्यांसाठी विनय -
गुरूसेवा, मान, अभिवादन, शिकावे, एकाग्रचित्त, प्रेम, आदर, अध्यापनाने दृढ निश्चय करणे, ज्ञान, काळजी.
पतीपत्नीसाठी विनय -
सन्मान, आदरभाव, एकनिष्ठ वागणूक, सत्ता देणे, दागदागिने पुरवून ठेवणे, सेवा, नातलगांचे आदरातिथ्य, प्रतिव्रत्य, धनसंचयन व काळजी. कर्तव्यउद्यम, उद्योग आणि कुशलतेने संकटात आधार, परिवारहित.
धनी व सेवकांसाठी विनय -
सामर्थ्याप्रमाणे काम द्यावे. अन्न व मजुरी द्यावी. आजारात शुश्रुषा करावी. स्वादिष्ट पक्वांन्ने वाटप करावी. रजा द्यावी. समाधानी ठेवावे. कीर्ती - चोखपणे धन्यता, एकनिष्ठ.
अनेक रीतीने सत्य विशद करता येते. जसे - काळोखात उजेड दिवा, पथभ्रष्टाला सन्मार्ग, स्थानभ्रष्टाला मार्गदर्शन, वस्तू जागेवर बसवावी त्याप्रमाणे स्थानब्धता, डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवणे.
कन्येसाठी विनय -
लवकर उठणे. उशिरा झोपणे. मनःपूर्वक कामात व्यस्त असणे. गोड आवाजात - गोडगुलाबीने पतीशी बोलणे. नातेआदर. घरी येताच आत्मसन्मान. त्यांना पाणी देणे. सत्कार करणे. कामे चपळाईने व कौशल्याने करणे. कामाचे स्वरूप नीट समजावून घेणे आणि त्या बाबतीत सुलभतेने नियम करणे. आपल्या पतीची कमाई सुरक्षित ठेवणे. पतीवर प्रेम करणे.
संग्राहक - विश्वनाथ साठे, पुणे

Comments
Post a Comment