गीत
लेखणीने अमर झाले
नाव अण्णाभाऊंचे
पनावरती इतिहासाच्या
कोरिले सत्य मानवाचे.....//धृ//
भीमा उकरतो मढी
काढी स्मशानी सोनं
लैय तळमळतो तुका
केला घात बोटानं
जगण्यासाठी संघर्षाच्या
जोखिले रण मरणाचे.....//1//
भाकरीसाठी मौताग
भोमक्या उभ्या जगात
रांडक्या व्यवस्थेशी
आहे सवाल शब्दांत
न्यायासाठी भुकेल्यांच्या
मांडिले बंड बंदीस्तांचे.....//2//
खांडुनि रितिरुढीला।
आवडीनं घाव केला
जुलमी पुरुषार्थाचा
डाव तिनं मोडला
उद्धारासाठी स्त्रीजातीच्या
तोडिले बंध अन्यायाचे
-विश्वा
Comments
Post a Comment