★★★"मिलाई रस्त्यावर आली...!"★★★
-भाग 6 ते 10
"क्काय सांगू नाथ्थब्वॉ....!"
"पुढं क्काय होतंय त्ये सांग नं...जीव हुरूर झालाय..."
"आय्क....!"
"हातालं काम लाग्लं की त्वंडात घास पडाय्चा.कैक सांजेलं दुर्डी तुकड्यावाचून रिकामीच. पोटं भुकेनं कळकळ झालेले.मिळ्कतुकीचं मजुरीसिवा साधन नाही.घाम गळाव तव्हा घरची मीठमिर्ची भागाय्ची. बा खंटीचे काम करून माती उकरू उकरू थकत चाल्ला व्हता.त्यालं मातीचे टोप्ले उचलून बर्गाडीत सिनक उफ्नत व्हती.उन्हांनं त्यो काळाठिक्कर झाला व्हता.बर्सादित फुटक्या पतरामुळं घर सादाळाय्चं.फाटक्या गोधड्यातून हिव अन खालून वदाडपानी डोळ्याची झोप हाकलून देई. हिवाळ्यात टिक्कोर चांदनं डोळ्यात भरत खपाटीपोटानं राती ढक्लाय्च्या."
"आम्ही सगळे आठ त्वंडं खानारे.माय बा राबायचे.त्याहीनं ढोरांसारखं कामं कराय्चं.पोऱ्हं काखत घालून माय सुगीत हाब्रेड खुडाय्लं,बांधाय्लं,पडाय्लं, निंदनाच्या घाती निंदाय्लं,काड बडवाय्लं,तुरी उपनाय्लं जावाव.धुऱ्याबंधुऱ्यानं आढाव गवतं कापून लोणारलं इकाय्चे.मार्वाड्याच्या गाईम्हशीं दुधावर पडाव म्हणून ह्यो रानचारा मैल मैल डोस्क्यावून वाहायचं कामं कराय्चे. त्याच्या मोबदल्यात पाच - सात रुपये पदरात.त्याच्यात आठवड्या बजार. जेवारी,दाळदाना,मीठमिर्ची उर्काय्ची. तहीबी घरी लेकरं आसेनं आस्तील म्हून भातकं पदरी बांधून अनाय्चे.कधी मीठ नाही त्त कधी मिर्चीकुडुक नाही.आखाड कोर्डें आतडे कुर्तडून टाकाय्चं.या दिव्सात कामं ठप्प.माती गरम धापा टाक्नारी.गवतगुळ्या कर्कडीत.वावरासिवारात कोंतं वान नाही.बेंबीच्या देठाची भूक हिर्मसून जाय्ची.आसं सारं जग्नं."
"ह्ये मातर सत्य की,दोन भाग गावात व्हते.खाल्चं अन वर्चं आसा चढउताराचा भेद तिथं व्हता. चढावर वर्चं त्त उतारावर त्याच गावाचा येक भाग व्हता."
"वर्चं गाव अजून बैमान झालं नव्हतं.त्ये उरासिवारात मानुस्की जपून व्हतं.भूकधर्म जानून व्हतं."
"गावकीत्लं खाल्चं गाव हे आप्लं कामाचं गाव हाये"
म्हून त्ये त्याहीची येळ मारून नेत व्हतं.कोन्ही दारात उभं राह्यलं त्त पदर सुना जात नव्हता.अन तसा सुनासुना पदर जानं म्हंजे,
"आब्रु नस्ल्यासारखीच नं.....?"
"आप्ली पन उद्या ही येळ लांबस्तोर नाही"
"आबाळ क्काय जल्मालं पुरत आस्ती क्का...?"
"उद्या पिक्लं की सारं भरमसाठ...भर्भराटच."
जमीनजुमल्यावाले ह्ये समजून व्हते. माडीमाळ्वदात अन कनग्याडाल्यात सुगीचं धन त्ये गाव बाळगून व्हतं.
"ह्ये धन आज आप्लं हाय म्हून हे गर्जेपोटी मांघाय येतात."
"मोठया मनानं देलं पाह्यजे."
"देल्यानं कुठं कमी होतंय क्का?जित्त्या जीवालं जग्वाव."
"मान्साच्या खऱ्या मानुस्कीचा ह्यात धर्म हाय...!"
"हाय म्हून द्याव...नाही त्त नाही...."
"काळ उलटला त्त लैय सडतंय."
"त्यापक्सा कोन्हाच्या मुखात गेलं त्त जीवधर्म जगल."
"अन आखरी त्ये सारे खप्तात न आप्ल्याच मातीत."
"मान्सासारखे मान्संच त्ये...त्याहीलं पन जीव हाय."
"भूक हाय.मन हाय.पोट हाय.परान ह्यै नं.…!"
गावाचे पाटील,कर्ते अन धनिक मंडळी ह्ये जानून व्हते.मनं समजत व्हते.भूक समजत व्हती.भावुक समाज गावात जगत व्हता.मानुस्की जित्ती व्हती.मनामनात आदर आपुल्की व्हती.
गोरगरीब वावरात्ल्या कामावर जगत व्हता.मजूर रोजीरोटी भागवत व्हता.त्यो जमीन कसत व्हता.पिकं काढत व्हता.मुठपसाभर खळं घेऊन बिदागी आनंदीत घालत व्हता.तिथं त्यात त्यालं सारं सुख वाटत व्हतं.जरी दुसरे जमिनीचा मालकी हक्क सांगत व्हते.दाळधान्य घरात साठवत व्हते.पै-पैका जपून व्हते.दांडगाई आंगीकार करत व्हते.
गावातल्या बाया जीवाळू व्हत्या. खायाप्याचं उरलंसुरलं हाक मारून द्याव.सनासुदीच्या वख्तालं तळीवमळीव,वडेपुऱ्या,गुळोनीसार,भातभजे बांधून द्याच्या. त्याहीच्याकडून वाढनवाढवा मिळाय्चा.रुखंसौखं फेकून देवोस्तोर घरी येऊन द्याय्च्या.तुरवरन आलं की त्यात पानी गरम करून साऱ्या खानाऱ्या त्वंडालं गुळनी येवोस्तोर प्याव.कधी नाही त्या गव्हाच्या भाक्रीचा वास याचा.त्यात त्वंडी खाराच्या फोडी आसाय्च्य.मिळाल्या कधी भाक्रीचे काठं हिर्वेगदाड.ते तव्यावर भाजून खाव.
इथं एक मानुस दुसऱ्या काम कर्नाऱ्या मान्सालं जग्वाय्चा.येळ भागवून न्याचा.एक समाज दुसऱ्या समाजालं बर्सादीपान्यात पोटालं पूर्वाय्चा.आडीआडचनीलं धावून जाचा.येक सूत जुळत व्हतं.
"त्या दिव्शी मिलाई हातात तांब्या अन आंगड्याचा पाल्वात वाढन घेऊन दारी आली.
अन म्हंली,
"आवं रत्नामाय ह्यै न्या आत....इकडं या बरं....!"
"माय्बाई अन बोळ्कांडीत इत्का आंधार आस्तुय क्का.. हर्रोज...??
माय ताटीच्या पुढं गेली.अन त्या दोघी बोलू लाग्ल्या.
"जेवनं नस्तील झाले आझुन तुंम्चे...?"
"आं..sss रात पल्डी.कर्ता येईल.ह्ये क्काय घेऊन आल्या वं माय आता..?"
"याच्यात चपात्या,दाळभात हाय.लेकरं खातील.घ्या.!"
"म्या म्हंन्लं,वाया गेल्यापक्सा घरी नेऊन द्याव.नव्हाळी तरी खातील पोऱ्हं.!"
मिलाईनं दाळीचा तांब्या अन गव्हाच्या भाक्रीनं बांधलेला पालव मायच्या हाती देला.माय पाल्वात्ल्या भाक्री दुर्डीत रचत म्हंन्ली,
"बरं.... तांब्या ऱ्हावद्या घासून देईन पाह्यटं...."
हात्चा तांब्या मोठ्या मनानं हिस्कवत मिलाई म्हनी,
"माय्बाई रत्नामाय...!"मह्ये हात झल्डेत क्काय...?"
"नक्का घासीन म्या.घरी जाऊन भांडेच घासाय्चेत."
"हं...बरं झालं ध्यानात आलं....आय्कानं,,
"वोवssss..."
घरात येऊन माय तांब्यात्ली दाळ भगुन्यात रिच्वत उद्गारली,
"क्काय आलं लक्ष्यात.….?"
"उद्या चोपनात्ला मुंग तोडाय्चाय.....तुम्ही,पोऱ्हंपोरी सारे या.....पाह्यटच.... जाऊ संगंमंगं."
"बरं...."
"लवकर उर्का वं माय...जात्ये म्या.आंधारून आलंय सारं."
मिलाई आली तसी सर्रर्रर्कनssss वापस गेली.माय जेर्मलच्या भगुन्यात दाळ अन पानी टाकून बर्बट उक्ळू लाग्ली.चुलीत गौऱ्याचं धुपट अन जाळ दोन्ही धगधगत व्हते.अन भूक पोटातून.
ही परिस्थिती फक्त येका घरात्ली नव्हती.आसे कैक घरं कामं हातात येवोस्तोर जगत व्हते. त्याबदल्यात मजुरीवर,दाळ्दान्यावर गुज्रान करत पर्पंच्य कराय्चा व्हता.धनियाच्या वावरात राबायचं व्हतं. पेर्नीखताचे कामं पार पडाय्चे आस्तात.म्हून खाल्च्या लोकाय्लं हातचंगळ आस्लेला समाज जग्वत व्हता.येका समाजालं भूक लोटून दिव्स जगाय्चे व्हते.त्त दुसऱ्या समाजालं घरच्या शेती,ढोरं संभाळाय बिन्कामाची जमात पाह्यजे व्हती.पीक्पानी अन चारावैरन करून घ्याचं व्हतं.शेन-गु काढून घ्याचा व्हता.येक प्रत्यक्ष राबनारा त्त दुसरा त्याच्यावर नियंत्रन आस्नारा समाज गावाच्या वर्तुळात नांदत व्हता.समाज उकंड्यावर कोय फुटावी तसा उगत व्हता.निढळात पुढं.कधी कधी तुंबळ हानामाऱ्या व्हतं होत्या.काम करून पन पदरात काहीच मिळालं नाही मंग जीव खेस्काळून जात व्हते.जिथं पटलं नाही तिथं रक्तपात व्हतं व्हता.कुऱ्हाडी थिलंग्या पडोस्तर मुंडके उडाय्चे.कुठं मर्नं त्त कुठं जग्नं.दोघं आडकुत्त्यात अस्ल्यासारखं जिणं जग्नं पसन करत व्हते.गावगाडा रेटत व्हता.
मुंगाचं सिजन गेलं.हाब्रेड धुमारत व्हते.केना माजला व्हता.पन जागीच उन्हानं कर्कडून गेला.गुलमेंढ्या,कांग्रेस खळे धरून आला.हरन्या,दुधी, आघाडा धुऱ्यावर अन पिकात सार्खांच.पन सुकू लाग्लं सारं बिनवल्लाईमुळं.ऊन्हात रग येऊ लाग्ली. वातावरणात दरप भरली.सनसुद गेली.गवतगुळी करपटून जात व्हती.ईहीरी काळं पाषाण उघडं करू लाग्ल्या. डव्हं खर्पडून गेले.पोटऱ्यात आलेलं हाब्रेड उभं वाळून गेलं.सिवारात येक आव्कळा फिर्ली.जुने झाडं उभ्याउभ्या वाळून कोळ झाले.आतून कोरट झाले.ढवळ्या मातीच्या भीतीलं चिरा जात व्हत्या.पळसं,बोरी,बाभळी,उरूंच्या, रुगडी,धामनयेल उलत व्हते.
पैनगंगा,पूर्नामाय कोर्डीठन झाली व्हती.वढयावघळानं दगडं उघडे पडू लाग्ले.मातीत्ली वल्लाई इरत खोल जात व्हती.पान्यासाठी ढोरं अन मान्साची कैक मैलोनमैल पायपीट सुरू झाली. कडबाकुट्टी,पेंढ्याच्या सुड्या आगीनं जळू लाग्ल्या. वडाखाल्च्या ईहीरीत्ल पानी झिर्रप्न खुंटुन गेलं.रान धगधग करू लाग्लं.चिमन्या चिडीच्याप.शेळ्या खुट्यावरच पोटात्ला काल निरप्लेला चारा उरळत व्हत्या. चघळत व्हत्या.धामुकडे उगाळत व्हत्या.
राती पळत होत्या.दिव्सं धग सांडवून कलांडत व्हते.काळ जीवावर उठत व्हता.सिळाव्नीची पाखरं किडुकमिडुक,दाळसाळ येचुन पुन्हा झाडावर जात.सारं काही बदलून गेलं व्हतं.पह्यले हिर्वे दिव्सं राह्यले नव्हते.
मिलाई घर आवरत व्हती.कुमा तिलं कामात काम म्हून भांडे घासत व्हती.चंदा वसरीत बस्ली व्हती.सोनाजी,श्यामा पान्याची बैलगाडी घेऊन राजमळ्यात गेले.राहू चारा आनाय्लं बानासंगं तांबरंत आले व्हते.तांबर आझुन येलीपाचुळ्यानं दर्वटून व्हती. तिथं कैक ढोरं चरत व्हते.
गुजाबा निजांपुरातून कुमासाठी सोयरीक पाहून रिकाम्या निरोपी आला.तिथं सोयऱ्याच्या भाव्कीत गुल्बानं ईहीरीत उडी मारून जीव देला व्हता.गोट न कर्ताच सिवेची वाट धरून पाटील घरी आला.त्यानं हात्पाय धुऊन तांब्याभर पानी पेलं.वसरीतून गुजाबा जोत्यावर आला.आबानं भुर्कट अभाळाकडं न्याहाळून येक नजर येटाळीत फिरवली.
आज मिलाई बसून व्हती.टोंगळ्यावर तांब्या ठेवून ती पाहत व्हती.तिलं वाटत व्हतं,
"कुमा आता सासरी जाईल.तिलं भाक्री कोर्ड्यास् याव."
कुमा पीठ चुरता चुरता तिच्या त्वंडालं न्याहाळत व्हती. चूलीनं जाळ धर्ला व्हता.येक भाकर तव्यावर टाकून कुमा दुसऱ्या उंड्याचा गोळा पान्यानं भिजवू लाग्ली.
"उर्का...कुमा! उशीर व्हईल...करा भाक्री."
"ते येतील आता.पाहत बसू नका..."
अन तिनं कुमालं भाक्री करायच्या सांगत्ल्या.
काही बाया सपासप धूनं आपटत व्हत्या. पोऱ्हंसोरं मातीखेळात गुंग झाले व्हते.येटाळीत किस्नाबाप्पू येकटे व्हते.आबानं हाक मार्ली.
"ओ...किस्नाब्वॉssss..! या बिडी वाढाय्लं."
किसनाबप्पूनं आवाजाच्या रोखानं पाह्यलं.टोंगळ्यावर दोन्ही हात टेक्वत उभा राहून दोन पाऊल पुढं आला.
म्हंन्ला,
"क्काय बाप्पा ह्ये चईंतर...."
अन किस्नाबाप्पू खाल्च्या पांदीकडं पाहू लाग्ला.त्याची नजर तकलादू झाली व्हती.गुजाबा पाटील येक हात फाडीवर ठेवत खाली बस्ले.त्ये दोघं जोत्यावर बसून त्यो ईच्यारात पडले.
"झाडं तरी कुठं इतके दाटगर्गट राह्यलेत तरी.
सारी तोडाताड झाली.कधी घरासाठी,नाही त्त कधी लाकूडफाटा-जळ्तनासाठी उभ्या रांकाठ्या,लिंबं,गोडोनी अन बाभळी बुडातून तोडून टाक्ल्यात.बर्साद कमी झाली.व्हतं चाल्ली.आभाळ येतंय अन तसंच कोर्डं निंघून जातंय.येक मोजाय्लं टिपूस नाही.पुखामिर्गात नाही त्त हात्तीत निखळतोय त्त त्यो पन येईना.काळ सुटला.काळ. घडीच बदल्ली.हं..ssss!"
"हं माय झं....!"
"मान्सानं घडीच बिघडून टाक्ली सारी.!"
"लाट येवो जसी दिव्सं आले तसे ते निंघून गेले.मिरग कोर्डाकरड व्हता.हिवाळ्यालं रया नव्हती.उन्हाळ्यानं कडाका फोडला व्हता.सारं चक्रच बिघडून गेलं व्हतं.जमिनी उलत व्हत्या.माती भूगर व्हतं व्हती.सिवारावर औव्कळा उबग्ली.पाखरं कव्हाच सिवार सोडून गेले व्हते.ढोरं पान्याबिना तर्फडून मरत व्हते.दावे तोडून सैरभैर पोटासाठी पळत व्हते.हिर्वा घास कुठं दिसत नव्हता.काही खुट्यावरच बांधलेले पायटाचा खोरून खोरून जीव सोडत व्हते.मान्सं भाक्रीच्या मांघं दैदिशी झाले.हिर्वळ जळून जात व्हती.रानाचा चेहरा भकास वाटू लाग्ला."
"मिलाईच्या कपाळ उघडं पडलं.ती एकाकी झाली.तिलं ना घर ना दार ना उंबरा आसी आवस्था झाली.सारं काही खतम झालं.जनू आभाळ डोस्क्यावर थाडदिनी पडाव आसी तिची गत झाली.सुखासुखी आस्लेला संसार उध्वस्त झाला.तिचे दहा गेले नि पाच राह्यले.अर्धाउबार जीव गेला.त्वंडावर्ची लव गेली.ती निस्तेज झाली."
"आरं तुहं त्वंड काहून सुकलं रे...???"
बोल्ता बोल्ता त्याचा घसा सुकून त्यो आवंढा गिळत म्हंन्ला,
"काही नाही ....!"
"शिवाजीनगर स्टेशनवरून येक मालगाडी भरधाव वेगात.तिच्या इंजनाचा धूर स्टेशनच्या पत्र्यावर हवेत इरत व्हता.तिची शिट्टी साऱ्या धावपळनाऱ्या पायालं गोंधळ्वत व्हती.सिड्यांचा खाडखाड आवाज.हुर्पळनारे स्वास.घामेज्लेले शरीरं.कर्कस आवाजं.आतून काळजं धडधडत व्हती तसे रूळही.मांन्सं गर्दीत घुसत व्हते.पायात पाय गुतत व्हता.मुंडके पुढं पुढं सर्कत व्हते."
"शहरं जुळ्वत नेनारा लोखंडी रूळ.डांबरी चौचौपदरी रस्ते.त्याचावर्चे फ्लायओव्हर्स.सिग्नल्स. नियामक यंत्रासार्खी हाल्चाल.वर्दीधारी पोलीसं. भर्धाव गाड्याघोड्या.काचकूऱ्या इमारती.चकचकीत सारं.धुत्ल्या तांदळासार्खं...?
"टेकडीपलीकडं अन आलीकडं मुळा मुठा.एकमेकींच्या त्वंडात त्वंड घालून ब्रिटिसबार पुढून वळलेल्या.सारी पुण्याची घानगु-मूत घेऊन.हिर्वीपाचुळी अंगावर आथरुन आतून कुजलेलं पानी.सडका घानेऱ्या वास.इकडं येताळ टेकडी,पुढं म्हसुबा माळ.त्याच्यापुढं राणीचा वाडा....सारं सारं जिथंल्ल्या तिथं.मुंग्यांची रीघ तसी मान्साकोंसाची.आज्गरासार्खी सरकणारी.रस्ते पुढं पुढं जातात.तसे चाल्नारे पाय.अन भुकेसाठी पोटं.....!"
त्यो काहीतरी बोलत व्हता.महत्वाचं सांगत व्हता.त्यालं म्हंन्लो,
"आर पन मलं काही पुढं सुचेना...उमगेना नं पोरा...!"
"ह्यै आसं....कसं इरत चाल्लंय,धोतर इरल्यावानी."
"तिचं पुढं काय...ब्वॉ??"
बोल्ता बोल्ता त्याचा आवाज दर्दर्ला.त्यो भावुक झाला. आझुन पुढं काही सांग्नार पन त्यालं शब्द फुटेना.त्यो निस्तब्ध झाला.त्याची कावरीबावर भेदर्लेली नजर शिथिल झाली.त्याची कदर केवल व्हत व्हती.काही घटिक त्यानं शब्द उगाळ्ला नाही.आम्ही दोघं निश्चल.पन धुस्फूस कर्नारी घाल्मेल त्याच्या काळजात सुरू व्हती.त्यो लपव्न्याची वायफळ कोसीस जमवू लाग्ला.पन त्याच्या डोळ्यात ते चित्र साय्नासंगीत उभं व्हतं.
वय थक्ल्यानं गुजाबा पाटील मेला. मरता मरता म्हनी की,
"आता काही खरं नाही गड्या.... पहा पुढं...तुम्हीच.!"
वाड्याचा आधारवड उन्मळून गेला.बानाजीची हय खच्ली.आधीच कर्जाचा फेरा.दामदुप्पटीने याज वाढलं. त्यात कुमाचं लगन दारात केलं.पाव्हनेरावळे,सग्सोयर अन भावकी जेऊ घात्ली.हुंडा,कैकतोळ सोनंनानं करनं पडलं.दोन्हीकडचा बस्ता बांधला.च्यापानी,आहेरमाहेर झालं.मांडव प्रत्नी केली.इव्हाई जवायाची खांदेमळ सारं सारं गुजाबाच्या पश्चात बानानं केलं.आठ येकर वावरात्ल्या दोन येकराचा तुकडा सिल्लक राह्यला.त्यो तुकडा म्हंजे हाडुळा.पडीक.आय्चनाकैचनानं भरून तुंब.छाती येव्हढालं हरन्या गवत फुटलेलं.बैलबारदाना अन सुगीच्या सुड्या लावाय्लं ह्यो हाडुळा वापरात व्हता.पन आता याजाच्यापै पाई गहान व्हता.हक्काच्या हाडुळ्यात वखर घाल्ता येत नव्हता.
सोनाजी अन राहूनं बानालं वाटहिस्सा मांघ्ला.पन जमीन इकूनटिकून कुमाचं लगन,घराची सावरासावर अन गुजाबाचं साव्डणं,तेर्सं,भावकीत जेवनं घात्ले.सिवारात पान्याचा थेंब नव्हता.बानानं मजूर लावून ईहीरीत पडलेल्या फाडी काढल्या.पन अभाळातूनच टिपूस नाही त्त जमिनीत कुठं. ???त्यो पैसा मातीत गेला.सारीकडूनच बोळून आलं.याजं फिर्ली. जमिनीच्या बोली झाल्या.आठ येकराच्या जागी दोन येकर पडीक तेही गहान.मिलाईच्या आंगावर्चं मनीमन्कुलं मोडून टाक्लं.श्यामा अन राहूनं कव्हाच शहरं जवळ केले. दिव्सं पालटले.पाटलाच्या वाड्यावर दरिंद्र्याचा वखर उल्टा फिर्ला.
"येक्काळ आसा व्हता नाथ्यब्वॉ,
"पाटलाच्या घरी अन सिवारात दहा-दहा गडी कामं करत व्हते.पोटाची भूक भाग्वत व्हते.दिव्सं काढत व्हते. दुधाच्या धारा काढाय्लं दोन-दोन मान्सं.चारावैरनीलं दोन. शेन,गु-मूत उप्साय्लं दोघं.लाकडं फोडाय्लं दोघं.जाग्लीवर दोघं.अन दोघं ढोरं-गवारं वळाय्लं.पाटील डमनीतुन त्त कधी घोड्यावून फेर्फटका मारून जाय्चा.धुऱ्यावूनच हाक माराय्चा.कधी त्त कित्ती माल अन धंधान्न झालं.ह्ये पन त्यालं ठाऊक नव्हतं.गडीमान्सं कोठार भराय्चे.डाले कनग्यानं दाळदाना लावाय्ची.लाकूडफाटा जळ्तनासाठी फोडाय्चा.अन्न पाटलानं जत्रा करत सोयऱ्याधायऱ्यात तोऱ्यात हिंडाव.सोयरिकी जमवाव.गावगवत्रे कराव.कधी जत्राचे तमाशे,फड त्त कधी वारी वळकुटी.पैपैख्यालं चिंता नव्हती.बापजाद्याच्या इस्टेटीवर पाटील ताव मारून खाय्चा.उद्याची मनात खैर नव्हती.
"पिक्तय नं मंग खाव.उगा फिस्कु नाही."
"देवानं कुठं सांग्तलंय की,पिक्लं नाही त्त मरून जाईल मानुस.जगल कसं पन.आत्ता ह्यैनं... "
"दहा गडी पोस्तो आपुन क्काय कमी?"
"आज धक्ला बस्स त्त मंग...उद्याचं उद्या पाहू!"
"पिकत व्हतं तव्हरोक बरं व्हतं.पन जसा जसा काळ गेला तसी तसी जमिनीलं भेगा पडल्यावानी वाटेहिस्से पडले.वाड्याचे दोन-तीन वाडे संसार करू लागले.जनपत वाढली.चुली वायल्या झाल्या.घरावर कुऱ्हाड पडली. मारामाऱ्या उठल्या.धनसंपत्ती जीवावर बेत्ली.सिवारात मोक्ळ्या जमिनीच्या जागी धुरेबंधुरे तयार झाले.खोडवन वाटून घेतलं.ईहीरीचं पानी अन हक्काचे तुकडे झाले.जसे वावराचे तुकडे पडले तसे मनाचेही.आपुल्कीलं चिरा गेल्या.मानुस्कीलं तडा पडला."
"ह्ये फक्त येक्ट्या गुजाबा पाटलाच्या घरी व्हतं नव्हतं त्त साऱ्या गावात व्हतं व्हतं.पंचक्रोसीत घडत व्हतं.खेडोपाडी व्हतं व्हतं.गवोगावी ह्ये दुफळीचं इख उगत व्हतं.मान्सं मान्सांपसून तुटत चाल्ली व्हती. आपाप्सात नात्याग्वत्याचा इसर पडत व्हता.दुस्काळानं पोटं भरत नव्हते.म्हून लोकं गाव सोडत व्हते.खाल्च्या गावात्ले मजूर कष्टकरी अन गोरगरीब या प्रवाहानं लवकर वाहून शहराकडं फेकल्या गेले.त्ये भर्भराटानं उधळ्लेले शहरं जवळ करत व्हते.कुठं तरी कार्खान्यात नाही त्त गिरणीत यंत्रावर काम करून जगत व्हते.भूकेच्या आकांतानं चटनी-ठेस्याची आग पावासोबत पोटात कोंबत व्हते.रक्तघाम गाळत व्हते.औद्योगिक भांडवली जगानं ह्ये मान्सं गिळनं चालू केलेत."
"गावगाड्यालं पहिला हादरा इथं बस्ला.कारन ज्या लोकाय्वर ही मदार व्हती.तीच उल्टून गेली.लोकं गावात अन पाटलाच्या हाताखाली कामं करनं येकीकडं सोडत व्हते.त्त दुसरीकडं त्याच श्रमात शहरं जास्त मोबदला देत व्हते.पैस्याची चटक लावत व्हते. प्रत्यक्ष मालक तिथं नव्हता.कंत्राटदार व्हता.पन त्यो मजुरी धोरनं ठरवून अन कामगारी जीवन समजून वागत व्हता.श्रमसक्तीचा कधी कधी विस्फोट घडून येत व्हता.त्त कधी कधी अन्यायी जिणं मिळत व्हतं.पन गावगाड्याची गु-मूत काढाय्ची सक्ती इथं नव्हती.गेलं त्त गेलं नाही त्त राह्यलं भाडे-पतराच्या खोलीत.जरा जरा स्वाभिमान ही लोकं बाळगू लाग्लेत.पण कामगारी जिणं अन मालकी भांडवली व्यवस्था डोस्क्यात बस्ली नाही.जग्तात यंत्राच्या गर्राड्यात अन शहराची रातपाळी करत.जी गावाकडं जागल्या म्हून व्हती."
"शिक्लं पाह्यजे.लढ घेत्ला पाह्यजे. स्वाभिमान इकून टाकू नाही.हक्क अन आधिकाराच्या स्वतंत्र जग्न्यासाठी संघर्ष केला पाह्यजे.म्हून शाळा शिक्ली पाह्यजे.सग्ळे मान्सं जिवंतपानानं सार्खे हायेत. कोन्ही उनं नाही.सन्मानानं जग्न्याचा आधिकार साऱ्या जीवांना हाये.कोन्ही कोन्हावर हुकूम करू शकत नाही. आसा ईच्यार पुढं तळागळात आला.आदीम जमातीचं तत्व बुद्धांच्या तत्वाने चार्वाक पुढं कबीर-तुकाराम अन त्या काळापुढं फुले-शाहू-आंबेडकर,अण्णाभाऊ नावाच्या जीवांनी मान्सालं बहाल केलं.लोकं जगू लाग्ले.तसा ईच्यार करू लाग्ले.गुलामी टाळू लाग्ले.पन पोटाची भूक अन जल्माची दारिद्र्यी आवस्था गावगाडा तोडू देत नव्हती.तरी गावात्ला गोरगरीब जीव बदलत व्हता.प्रवाह नाकारत व्हता.परंपरा उधळत व्हता!"
"वावरात्ली कस्टाचे कामं,राबराब मराय्चे कामं कराय्लं पाह्यजे तित्के लोकं सिल्लक उर्ले नाही.पिक्पानी घटलं.दाळधान्य उगव्नूक कमी झाली.यंत्र आल्यानं रोजगारी अन रोजंदारी उतर्ली.उगवल्या पिकाचा भाव कमी कमी व्हतोय.अन म्हागाई वाढू लाग्ली.त्यात दुस्काळ त्त काळच.ज्यो समाज गावावर हुक्मत करत व्हता त्यो आज पिळून गेलाय.गोचित अडक्ला.येक त्त गाव ना सिवार सोडता येत ना दुसरे शहरं जवळ धर्ता येत.भोपळटांग्या रोग लाग्लाय जनू या जमातीलं.मंधात आटक्ला.ना इकास ना आस्त."
"बाप्पो.....! अय थांब....!"
"पानी प्ये..ह्ये...."
त्यानं हातची सीसी घेत्ली.अन येक आवंढा गिळत दोन घोट पानी प्येलं.त्याच्या नर्ड्यातुन उब्बूक्sss उब्बूक्sss आवाज निंघत व्हता.
"येटाळीत आपाप्सात चर्चा व्हत व्हती.बायासून्वाऱ्या भाक्री कोर्ड्यास् झालं की मिलाईकडं याय्च्या दोन सबुद बोलाय्च्या अन जाय्च्या. कोन्ही हाल्क्या आवाजात म्हनाय्चं,
"त्या दिव्सी त्त ब्बाई येटाळीत करम्लंच नाही."
"काळजीनं जीव जातोय,,,इसरून जा सारं..!"
"दुख क्काय जल्मालं पुर्वनार हाय क्का व मिलू..?"
"गेला जीव येत नाही नं मंग कित्ती जीवाचा गोळा ह्यो.. आवरा...बरं ब्बाई...!""
"मह्या डोळ्यांसमोर त्त त्यो जाळच हाये वं माय मुक्या ऱ्हा....आंगावर काटाच आलाय!"
अन मिलाईच्या डोळ्यांत विदीर्ण भाव गोळा व्हाय्चे. रडकुंडीलं व्हत व्हतं.पन सारे आश्रू गळून गेले व्हते. कोर्डेंफट्ट बुबळं झाले व्हते.हुंदके आवरनं कठीण.तिलं आव्सन राह्यलं नव्हतं.ती काळजातून भेदर्ली व्हती. हात्पाय गळ्हाटून गेले.तिची भाकर तुटली.ती नुस्ती चौकटीकडं पहाय्ची.तिलं वाटाय्चं,
"आत्ता येतील.मंग येतील.पन पत्ता लागत नव्हता."
बाना कुठं गेला तिलं उमग्नं बोजड झालं व्हतं.बानाचे बोल कानात व्हते.ते जिभेवर घोळत व्हती.ती फक्त मनातून मांघंचे दिव्सं आठवू लाग्ली."
"आभाळ आलं व्हतं.वावरात पेर सुरू व्हती.ते आसेच उशीरानं घरी आले.वावरात पेरून आले व्हते.त्याहीनं आंघूळ केली.भाकर खाल्ली.म्या सारं आवरून आथरुन टाक्लं.पळ्हाटीचे फुलं तोडून मही कंबर बोलत व्हती.मीही लवकरच झोपंच्या आधीन झाले. ते नुस्ते या कडेच्या त्या अडुंगावर व्हतं व्हते.मही येक झोप व्हवून तहान लाग्ली म्हून म्या उठले.पाह्यते त्त क्काय....?
ते उठून बस्लेले.माळव्दाकडं येक्टक पाहत व्हते.म्या म्हंन्लं,
"क्काय वं...?क्काय ईच्यार कर्ता..झोप नाही येत क्का??"
त्याहीची तंद्रीच उडाली.म्हंन्ले,
"आप्लं पन वावरपेर व्हाय्ची बाकी है वं.... पन हातात काही नाही.म्या मार्वाड्याकुन उधारी घ्याची ठरवली.देतो म्हनी.पन पाहू...दो-चार दिव्सं दुसऱ्याच्या कामालं जातो. तित्केच खर्चाय व्हतील."
म्या म्हंन्लं,
"व्हईल बरुब्बर....आउंदा पानी पन ह्यै...नं..कित्ती काळजी कर्सान...झोप्पा!"
"नाही तस्सं नाही.आज झोपच येईनं क्काय झालंय त्त??"
"अन तू बिंघोर्र झोप्ली."
"मंग क्काय करू...तुम्हालं झोपू घालू?"
म्या लाडातच उत्तर देलं.
त्याहीनं मह्या डोळ्यांकडं येक भेदक दृष्टी टाक्ली.अन म्या काळजातून पाझर्ले.
"झोप...रात लैय मोठ्ठी हाये...!"
अन त्याहीनं आंग लवंडलं.म्या पानुठ्यावर जावून डेऱ्यात्लं तांब्याभर पानी गटागट पिलं.अन पुन्हा आथरुनात येवून झोप्ले.उशीवर मान तिर्पी करून म्या ईच्यार करू लाग्ले.
"ह्ये थकून आलेत पन आझुन झोप्ले नाहीत काहून?"
तित्क्यात ते म्हंन्ले की,
"आवं आज लैय मोठ्ठा सरप गेला पायातून.म्या पेरण्यात गुंग व्हतो.बरं झालं बैलं बुजाडले.अन त्यो सरप वळवळत धुऱ्यात गायब झाला."
"मह्या कळज्जात धस्स झालं.
"सरप म्हंन्ला की मलं लैय भ्योव वाट्टोय."
म्या म्हंन्लं,
"तुम्ही,आय्का...!"
"मह्या मनाची कँश्या निंघून जाईल...उद्या लिंबेरस प्या. काही व्हतं नाही.पायातून त्त गेलाय नं?"
"क्का डस्ला त्त नाही नं.. .वं...???"
"काही नाही वं.लांब व्हतो म्या...सरप लांबून गेला.डस्ला नाही..!"
अन त्याहीनं मह्या कपाळावर हात ठेव्ला,
"इत्क्या पिवळ्या हाळकुंडालं सोडून लवकर नाही जानार.
महा लैय जीव हाय वं मये तुह्यात...कसं सांगू तुलं...?"
महे डोळे भरून आले.मन आतून वल्लं झालं.पुढचं काहीच कळेना.म्या त्याहीच्या छातीलं घट्ट मिठी मार्ली. त्याहीचा हात पाठीलं बिलगून गेला.दोघांचे गरम स्वास उफाळत व्हते.म्या गांगरून गेले.बाहीर आभाळ बर्सत व्हतं.जमीन भिजत व्हती.ती वल्लीगच्च व्हतं व्हती. आभाळ दम भरून निथळत व्हतं.ढवळ्या मातीचा वास चौफेर दरर्वळत व्हता.रात चढत व्हती.तसी डोळ्यावर्ची निशापन."
"अन मिलाई दातखिळी बसून खाली लवंडली.आशक्तपानानं ती सूद हारर्वून जात व्हती.तिलं काही सुचत नाही.त्या दिव्सी फक्त तिलं समज्लं की,
"आता कोन्ही उर्लं नाही या घरात...जीवाचं!"
ती लैय आठवाय्चा यत्न कराय्ची पन झालं गेलं ती इसरून जात व्हती.पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर त्यो जाळ पहाय्ची."
"माळाच्या बर्गाडीलं जाळाचे लोळ उठत व्हते.आडवा माळ लालपिवळ्या जाळानं उठला व्हता.धुप्पट्या अन करपट वास तिथं घुटमळत व्हता. गावात येक तंग वातावरण झालं व्हतं.येटाळीत रडपडा व्हतं व्हता.भावकी समजूत घालत व्हती.कुत्रे दीर्घ भूकत व्हते.गाव मरनकळ सोसत व्हतं.ऊन उतरत व्हते तव्हा गावात समज्लं की,
"हाडुळ्यात गोंधनीजव्ळच्या लिंबालं बानाचं धड लटक्लेलं हाये."
"बानानं फासी घेत्ली.बाना मेला."
"ढोराच्या येस्नी सोडून गळयात बांधून लिंबालं फासी..!"
"लिंबावरून बानाचा मेलेला देह काढला तव्हा सडका वास तिथं फिरत व्हता.दोन जनानं दारू पिवून त्यो लटक्लेलं शरीर खाली पोत्यात बांधून आन्लं.गाल खोपडीत चिटकुन.सारा हाडामासाचा लगदा झाला व्हता.मुंडकं पाखरानं कोर्लेलं.मडक्यालं भोकं पडाव तसे घारी कावळ्यानं डोळे फोडून कवटी आंधळी झालेली.तसाच पोत्यात भरून त्यो देह म्हसनवट्यात नेला.ना आंघुळ ना इधी ना काही.सारं जाळात खाक."
"साऱ्या गावभर हवेसार्खी हाळी गेली.गाव अंतःकरनातून कळवळ्लं.भावुक झालं.मलूल झालं.वादळात जहाज बुडाव तसं गावात्लं घरंघर दुःखात बुडून गेलं.मिलाईलं ह्ये जव्हा कळलं तव्हा तिचं त्त काळज कापून गेलं.ती सूदबुद इसर्ली.शरीरानं लोळागोळा झाली.तिचे दहा गेले अन पाच उर्ले.तिनं हय खाल्ली.तिनं मोठ्ठ्यानं आरुळी ठोक्ली,
"वं.....माय्यं वं sssss.... आरेर्रे बाप्पो....ssssआं... हं.."
अन तिची दातखिळी बस्ली.धाडकन जमिनीवर कोसळून गेली.पुढचं तिलं काही सुचेनं.डोळ्यावर आंधारी आली."
"गुजाबा पाटील वार्ला.कुमा नांदाय गेली.सोनाजी,चंदा अन मिलाई वाड्यात तिघंच.बाना मेला.भावकीत साव्डनं-तेंर्सं झालं.च्या पान्यावर आले गेले.वाडा उदासवारं पित व्हता.जुना भुजंग जसा वारं पिवून सुस्त तसाच वाडा भग्नं झाला व्हता.जंग्टला व्हता. त्याची मिरासदारी उडून गेलेली दिसत व्हती.ढवळ्या मातीच्या भित्तीनं आधडे घेत्ले.त्याची रया गेली.तशीच मिलाईच्या कपाळाची."
"मिलाई घटिका घटिका वाड्यात बसून राह्याची.येक्काळ आनंदानं भिजलेला वाडा तिलं सुक्ल्यावानी वाटाय्चा.तिलं वाटाय्चं,
"ह्ये पेराय्लंच गेलत.येतील जेव्तील."
"बोल्तील.ह्यै बदलंल.सारे दिव्सं दुखरे राहत नस्तात."
"सुख येईलच....नं...कव्हान कव्हा!"
अन तीचे डोळे खळखळ वाहाय्चे.काळज हुंदके घ्याचं. भावनिक आंदोलनं झेलत ती काळ गिळत व्हती.तिचं मनातून मांघं कोन्हीच उर्लं नव्हतं.सोनाजी ना चंदा.ती येक्टी जगत व्हती.येक्टीच रडत व्हती.कुढत व्हती.दिव्सं ढक्लत व्हती.राती जागून काढत व्हती."
"तिनं येका दिव्सी मनाचा ठिय्या केला.काळजालं पक्कं केलं.ती जखम उकलावी तसी आतून रडून रडून उकलत व्हती.ती मनालं निष्ठुर करून म्हंन्ली,
"उद्याचा उजेड आप्ला नाही."
"इथं राहायचं नाही.इथं महा जीव गुदमर्तोय...ब्बाई."
ती येकदम मोठ्ठ्यानं हासत व्हती.त्त कधी जमीन खोलवर न्याहळत व्हती.हुंदकत व्हती.तिच्या डोळ्याखाली काळेकोर जमू लाग्ले व्हते.अन त्या दिव्सी तिनं गाव पार्खं केलं कोन्हालं उमगून आलं नाही.सारं गाव आपाप्ल्या हर्रोजच्या कामात गुंग व्हतं.
"मिलाई कुठं गेली? कुठं गेली?"
"तिचा जीव रमला नाही."
"तिच्या जीवनात राम उरला नाही.ती कस्यालं राहील इथं..?"
"आर तिचं क्काय झालं आसल गड्या...?"
"जाऊद्या गावात राहून गाव बाटव्लं आस्तं तिनं.बरी गेली बला गावावर्ची."
"गाव नाना चर्चा करू लाग्लं.कोन्ही कोंन्हाच्या त्वंडावर बोट ठेवत नव्हतं.पाह्यजे तसं वाट्टेल तसं तिच्या बाब्तीत बोल्लं जाऊ लाग्लं.गाव पुन्हा भाकर्तुकड्यालं लाग्लं."
"आम्ही दोघं त्या दिव्सी शिवाजीनगरलं आलो व्हतो.त्यालं गावाकडं जळगावलं जाय्चं व्हतं.येस्टी आझुन आगारातच व्हती.पान्याची सीसी जवळ आसाव म्हून आम्ही सीसी घ्याय्लं भाहीर आलों.रस्त्यावर भले गर्दी.त्यो म्हंन्ला,
"इथं घेऊ अन जाऊ."
दुकानातून पान्याची सीसी घेत्ली अन पुढं सर्लो.
त्योच पुढून येक हिरव्या साडीत्ली बाई.त्यालं म्हनी,
"लैय लांबून आल्ये... भूक लाग्ली साह्यब....दा-पाच रूपे द्यानं... फक्त पाच-दा....!"
"पोटात अन्नाचा क्काही कन्नाही.द्या हो...साह्यब..!"
"त्याचं काळज कुरतडत गेलं.त्यो खिसा पाहू लाग्ला.अन दहाची नोट काढून त्यानं झटदिशी तिच्या हातात देली.अन पुन्हा त्यानं खिस्यात हात घातला. पन तसाच रिकामा हात बाहेर घेत त्यो त्या गर्दीकडं पाहू लागला.ती आकृती गर्दीत इरून गेली.दिसेनाशी झाली. मान्सात मान्सं मिळतात तसी.त्याची शून्य नजर ठाव घेत होती.नाना प्रश्न थैमान घालू लाग्ले.कैक ईच्यार येऊन मेंदूलं कोरून गेले.
"त्यो चेहरा इद्रुप झालाय रे....आसी नव्हती मिलाई....!"
त्यो भडकन बोलून गेला.पुढचं काही बोलनं गर्दीमुळं इरत होतं."
"नाही..ती मिलाई नाहीच....!"
"येव्हढ्या लांब कस्यालं येईल ती...."
"चंदा अन सोनाजीचं क्काय झालं आसल...?"
"अन रस्त्यावर.....नाहीच....!"
"आस्यानं आणखीनच इद्रुप होईल तिचं जिणं..!"
"मिलाई रस्त्यावर आली....!"
-लेखक-
विश्वनाथ अर्जुन साठे
-9921056462 [समाप्त] दि.07/09/2018
कार्यक्रम अधिकारी-नेयुके-पुणे
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय-
भारत सरकार.

Comments
Post a Comment