★★★"मुन","नवरोझ"अन "पत्रकारिता"★★★
"नव - रोझ" इराणच्या नव्या वर्षाचा दिस... ती सर्व बंधने झुगारून प्रज्ञेसाठी भारतात आली. मून उसका नाम.इराण सें भारतीय पत्रकारिता के खोज में पुणे स्थित हुवी.काही काळातच सर्वांना तिने समजून घेत आपलं अस्तित्व निर्माण केलं ..नव्या भूगोलक्त ती पत्रकारितेचा अभ्यास करतेय... २५ मार्च तिच्या मायभूचा नव्या वर्षाचा दिस ...तिने इराणी मुफ्ता अन गुलाब देत सर्वांना शुभेच्छा दिल्यात......"
"बेस्ट ऑफ लक ऑफ द इयर - मून....."
"मैत्रीत कुठे ऐतिहासिक,सामाजिक,राजकीय,धार्मिक, भाषिक, भौगोलिक,सांस्कृतिक,सीमारेषा असतात का...?" "बोलो तुम ही?"
इराणचा इतिहास हा स्त्री जीवन व त्यादृष्टीने तितका मोकळा नाही.परंतु बदलत्या परिप्रेक्षात तेथील जनजीवणाच्या जाणिवाही बदलत आहेत.मुली शिकू लागल्या आहेत.इव्हन परदेशवारी करून शिकत आहेत.मुन त्यातली एक.ती मराठी बरीच शब्दशब्दाने शिकली आहे.इथला व्यवहार ती शिकली आहे.
तिच्या देशाविषयी चर्चा झाल्यावर कळलं की,तिचा देश हा मध्यपूर्वेतील एक देश आहे.इराण चे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते. पर्शियन संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. खनिज तेल साठयात संपूर्ण जगात क्रमांक तिसरा तर वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.इराकविरुद्ध ९ वर्षे चाललेले युद्ध यादेशाने केले.ईरान मध्ये, फारसी, अझरबैजान,कुर्दिश (कुर्डिस्तान) आणि लूरे हे सर्वात महत्वाचे जातीय गट आहेत.
इराण मध्ये अरब मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर झरत्रुष्ट्र धर्म मानणार्यांचा एक गट तिथून इ.स ८०० च्या दरम्यान निसटला.या गत तेथून भारतात येऊन गुजरात राज्यात वसला.यांनाच आजच्या काळात पारशी असे म्हणतात.या शिवायही इराण येथील याझ्द प्रांतात झरत्रुष्ट्र धर्म मानणारे काही टिकून राहिले. सतराव्या शतकात उरल्यासुरल्या पारशी लोकांचा कट्टर मुस्लिमांकडून छळ सुरु झाला.सुमारे १८५० नंतर यातील अजून काही लोक भारतात आले.त्यांना इराणी म्हणतात.मुंबईयेथील अनेक इराणी उपहारगृहे हीच मंडळी चालवीत असत.
इराणमधील नव्या वर्षाच्या सुरुवातीस - वसंत ऋतूचा पहिला दिवस-फळबागा फळांनी डवरून जातात व अनेक रानफुलांना बहर येतो. .... त्यापैंकी एकास तोफखान्याची चांगली माहिती होती. ... विविध पक्षांना दोन्ही सभागृहांत (सीनेट व मजलिस) अनुक्रमाने पुढीलप्रमाणे जागा मिळाल्या : (१) इराण नोव्हिन पार्टी (नव इराण पक्ष) : २८/२३० ; (२) मार्डोम पार्टी ..... देशात बारा प्रादेशिक नभोवाणी केंद्रे आहेत.'रेडिओ इराण' चे कार्यालय तेहरान येथे आहे.
इराणी मनुष्य शांतताप्रिय असून कोणत्याहि वस्तूंच्या अल्हादजनक स्वरूपाकडेच बहुधा त्याचें लक्ष जातें.हे लोक आतिथ्यतत्पर उपकार करणारे व परकी लोकांविषयीं प्रसन्नचित्त असतात.त्यांच्या अंगी बरेच सद्गुण वसत असतात.ते आपल्या लेकरांचे फार लाड करतात.इराणी मुलगा आपल्या आईबापांविषयी फार आदर दाखवितो,तो बापाच्या समक्ष कधीहि बसत नाही व त्यास धनी म्हणून संबोधितो.त्याच्या मनांत आईविषयीं फारच प्रेम व पूज्यभाव वसत असतो.इराणी पुत्र आपल्या आईची उपासमार कधीहि होऊं देत नाहींत, व आईची आज्ञा कायद्याप्रमाणें शिरसावंद्य मानतात. कुटुंबांत आईला व विशेषतः आजीला फारच महत्त्व असतें,आपली सासू आपणाजवळ असावी अशी इराणी जांवयाची उत्कट इच्छा असते.चुलत्याचे नातें पाश्चात्यांपेक्षां हे लोक जास्त निकट समजतात, व पित्याच्या बाजूच्या चुलत बहिणीस इराणी पुरूष आपल्या स्वाभाविक बायका समजतात.
काळे गुलाम व पुरूष दाया अथवा लाला यांनां फार मान असतो,व दूध पाजणाऱ्या दाईला दुसऱ्या आईप्रमाणें मानतात आणि तिच्या खाण्यापिण्याची आयुष्यभर तरतूद केलेली असते.इराणी लोक आपल्या नोकरांस मुलांप्रमाणें वागवितात. धनी गुलामास बच्चा म्हणून हांक मारतो व गुलाम धन्यास पिता म्हणून संबोधितो.इराणांत गुलामांनां चांगले वस्त्रप्रावरण व खाणेंपिणें देऊन अत्यल्प सायासाची कामे करावयास लावतात.बहुतकरून स्त्री गुलामांची आवडत्या पुत्रांशी लग्ने लावण्यांत येतात अथवा स्वतः मालक आपल्या राखेप्रमाणें त्यांनां बाळगतो.हे फार विश्वासू नोकर असतात.व मालकांचा पैसाअडका यांच्या ताब्यांत असून फार महत्त्वाची कामें देखील हे करीत असतात. गुलामास बंधमुक्त करून आपला चरितार्थ चालवावयास लावणें ही गुलामांस द्यावयाची कडक शिक्षा होय अशी तेथे समजूत दिसते.हबशी अथवा अबिसिनियन गुलामास फार किंमत पडते,सोमाली अथवा सुहाली गुलाम कमी काळा असून कमी किंमतीचा असतो. कोळशाच्या वर्णाचा व सर्वांत कमी किंमतीचा गुलाम देशाच्या अंतर्भागांतील बोम्बासी हा होय.बोम्बासी गुलामाची किंमत त्याच्या शारीरिक शक्तीवर अवलंबून असते व याच्याकडून स्वयंपाकाचें काम करवितात.बाहेर देशांहून मागवितात तेव्हांच फक्त गुलामांची विक्री होते.आपल्या गुलामांशी अथवा घोडयाशी इराणी मनुष्य कधीहि क्रूरपणानें वर्तन करीत नाहीं.फारच विपन्नावस्था प्राप्त झाली तर इराणी मनुष्य स्वतःचे कपडे विकण्यास तयार होईल परंतु आपले गुलाम कधीही विकणार नाही.हबशी बारा ते चौदा वर्षाच्या चांगल्या मुलीस ४० पौंड किंमत शिराझच्या बाजारांत द्यावी लागते.याच प्रकारच्या सोमाली मुलीची २० पौंड व बोम्बासी मुलीची किंमत १४ पौंड असते.
इराणमध्ये जवळजवळ ४५ ते ५० हजार खेडी आहेत.त्यांतील दहा हजार खेड्यापैंकी ४ ते ५ खेडी एकेका जमीनदाराच्या मालकीची आहेत. यामुळेच इराणमध्ये अनुपस्थित जमीनमालकांचा मोठा वर्ग निर्माण झालेला होता.१९६२ च्या जमीन सुधारणा कायद्यामुळे मोठ्या जमीनदारांच्या ताब्यातील हजारो हेक्टर जमिनी शासनाने आपल्या ताब्यात घेतल्या व त्या भूमिहीन शेतकर्यांस वाटण्यास सुरुवात केली.१९६८ पर्यंत ३० लक्ष शेतकरी कुटुंबे (जवळजवळ १·४० कोटी शेतकरी) ती कसत असलेल्या जमिनीची मालक बनली. जमीसुधारणा,कृषियंत्रांचा वापर,रासायनिक खतांचा उपयोग आणि हवामानाची साथ या सर्व घटकांमुळे गेल्या काही वर्षांत कृषिउत्पादनप्रमाण पुष्कळच वाढले आहे.
आझरबैजानमधील रेझाईया मैदानी प्रदेश, क्यूशान-मेशेद मैदानी प्रदेश (खोरासान प्रांत) तसेच इस्फाहान,केरमानशाह,फार्स व केरमान जिल्हे येथे गव्हाचे पीक प्रामुख्याने होते.हेक्टरी ४५३ किग्रॅ. गहू उत्पादन होते.बार्लीही गव्हाच्याच प्रदेशात होते. कॅस्पियन प्रांतात भात होतो.हेक्टरी तांदूळ उत्पादन (सडलेला) ४५० किग्रॅ. हूनही थोडे अधिक आहे.कापूस,बीट,तंबाखू ही महत्त्वाची नगदी पिके होत.पाटबंधार्यांच्या साहाय्यानेच कापसाचे उत्पादन केले जाते.विशेषत: आझरबैजान,तेहरान,माझांदेरान,खोरासान,केरमानशाह, फार्स व खुझिस्तान या प्रांतांत कापूस पिकतो. फिलिस्तानी हा लांब धाग्याचा कापूस त्याचप्रमाणे अमेरिकन आणि स्थानिक आखूड धाग्याचा कापूस होतो. कॅस्पियन किनार्याच्या भागात रेशीम किडे पाळून रेशीम-उत्पादन करतात.बीटचे पीक खोरासान, मेशेदजवळ,तेहरानच्या सभोवतालच्या प्रदेशात व केरमानशाह आणि शीरझच्या भागांत होते.ताग माझांदेरान येथे होतो,पण त्याचे उत्पादन फार कमी आहे. चहाचे पीक पुष्कळच नवीन आहे.लाहीजान येथे चहाचे मळे लावण्यात आले आहेत.१९३२ मध्ये २८३ हेक्टरांवरून आता ९,७१० हेक्टरांवर चहाचे मळे पसरले आहेत.तंबाखूचे पीकदेखील महत्त्वाचे आहे.घेवडा, फरसबी,मसूर,कांदे,टोमॅटो,गाजर,वाटाणे,काकड्या व बराचसा भाजीपाला समशीतोष्ण व उष्ण कटिबंधास लागून असलेल्या प्रदेशात होतो.मनुका,बदाम,जर्दाळू, पीच,सफरचंद,चेरी,अंजीर,खजूर,ऑलिव्ह,संत्री,लिंबे, द्राक्षे,खरबुजे ही उत्कृष्ट फळफळावळ येथे होते.मनुका, बदाम व जर्दाळू ह्या फळांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.गम ट्रगाकंथ केरमान,केरमानशाह ह्या प्रदेशांत व बाभळीचा डिंक शीराझजवळील भागात गोळा करतात.
व्यापारी सचोटींत इराणी लोक यूरोपियनांच्या बरोबरीचे असतात.हे लोक गरिबाविषयीं दानशूर असतात.दिरंगाईपणा हें इराणी मनुष्याच्या स्वभावाचे लक्षण आहे.वारंवार स्नान करुन व कपडे धुवून इराणी लोक स्वच्छ राहतात.हे लोक आपल्या कपडयांच्या नीटनेटकेपणाविषयीं विशेष खबरदार असतात.इराणी लोक जनावरांचे फार शौकी असतात. क्रूरपणा हा दुर्गुंण इराणी लोकांत आढळत नाही. एकांतवास,बऱ्याच मुदतीची सक्तमजूरी वगैरे शिक्षा या देशांत नाहींत.नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुरंगातील बहुतेक कैद्यास मुक्त करीत असल्यामुळे कोणाहि इसमास एक वर्षाहून तुरंगवास कंठण्याची क्वचितच पाळी येते.
पुस्सन घराण्याचा लय झाल्यापासून तैमूरच्या मृत्यू (१४०५) पर्यंतच्या कालास संक्रमण काल म्हणतां येईल. सॅसेनिड घराण्याचा अखेरचा पराभव झाल्यापासून इराणचे राजकारणघटक या स्वरुपाचे महत्व नाहीसे झाले,व या देशावर परकी राजे एकामागून एक होऊन गेले.या राज्यकर्त्यांनी या देशाच्या प्राचीन संस्था अथवा धर्म यांची मुळीच निगा ठेविली नाही.सुमारे दीडशे वर्षेपर्यंत या देशावर मुसुलमान खलिफांचे अधिकारी प्रथम मदिनाहून व नंतर बगदादहून कारभार चालवीत असत.यांचा मुख्य हेतु या देशांतील धर्म नष्ट करुन इराणी लोकांचे राष्ट्रीय तेज नाहीसे करण्याचा होता.या धोरणाचा परिणाम असा झाला की, इराणांतील लोकांनी मुसुलमानी धर्म अगदी वरकरणी स्वीकारला.व इराणांतील लोकांनीच उमईद खलिफांच्या जागी अब्बासी खलिफांची स्थापना केली.ही गोष्ट घडून येण्याच्या अगोदर साहसी लोक व असंतुष्ट मुसुलमान अधिकारी खलिफावर स्वारी करण्याच्या कामी इराणी लोकांचा उपयोग करुन घेत असत.व पूर्वेकडील देश काबीज करण्याकरितां इराणांत अरबी सैन्य वारंवार येत असे. पहिल्या मेरवानच्या कारकीर्दीत मोखतार नांवाच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली इराणी लोकांनी कुफा शहरांत स्वातंत्र्य जाहीर केले परंतु त्यांचा लवकरच पराभव झाला.यानंतर बरीच बंडे झाली परंतु खलिफांनी ती सर्व मोडून टाकली.अबदल मलीक (मृत्यु ७०५) याने मुसुलमानी नाणी प्रचारांत आणून व अरबी भाषा सर्व राज्यांत दत्परी भाषा करुन मुसुलमानी सत्ता मजबूत केली.नंतर खोरासानचा अरबी सुभेदार कोटीबा बिन मोस्लिम याने इराण आणखी जेरीस आणला.दुसऱ्या उमरने झकात नांवाचा कर खेरीज बाकीच्या सर्व करांची अरबी नसलेल्या मुसुलमानांनां माफी दिली.यामुळे पुष्कळ इराणी लोक इस्लामी धर्माची दीक्षा घेऊन शहरांत जाऊन राहिले व शियापंथी धर्मोपदेशकांच्या आधिपत्याखाली त्यांनी राजद्रोही संघ स्थापन केले. दुसऱ्या यजिदच्या (७२०-७२४) कारकीर्दीत खोरासन प्रातांत भयंकर बंडे झाली व हिशमच्या (मृत्यु ७४३) वेळी ही अंदाधुंदी अब्बासी व शिया पंथी धर्मोपदेशकांच्या प्रोत्साहनानें वाढतच चालली.अखेरीस दुसऱ्या मेरवानच्या वेळी अरब नसलेल्या मुसुलमानानी अबु मोस्लिम नांवाच्या मौलानाच्या आधिपत्याखाली मोठे सैन्य जमा केले,खलिफाच्या सेनापतीस पळावयास लावले व अखेरीस मेरवानला हाकून लाविले.येणेप्रमाणे अब्बासी इराण व अरबी राज्य यांचे मालक बनले. इराणी लोकांच्या मदतीने अब्बासी खलिफांना राज्यप्राप्ति झाल्यामुळे यापुढे इराणी लोकांना त्यांचे नष्ट झालेले राष्ट्रीयत्व पुन्हां प्राप्त होऊं लागले अब्बासी हे एक इराणी घराणे होते व या लोकांनी अरबांची ज्ञातिपध्दति नष्ट करुन जुलुमाने राज्य केले.खोरासान प्रांताचे लोक जुन्या अलिद घराण्याच्या वतीने लढले होते व अबु मोस्लिमचा खून झाल्यावर शियापंथी लोकांमध्ये अस्वस्थता पुन्हां माजली.हरुन-अल-रशीद खलिफाच्या कारकीर्दीत खोरासानमध्ये बंड झाले व हे बंड खलिफाने स्वतः मोडले.लवकरच समरकंद येथे बंड झाले व ते बंड मोडण्यास हारुन निघाला असतां (८०९) तो तुस येथे मरण पावला.हरुनचे मुलगे अमिन व मामून यांमध्ये गादीबद्दल तंटा लागला.अमिन खलीफ झाला.परंतु ताहीरच्या मदतीने मामूनने अमिनला पदच्युत करुन ठार केले व स्वतः खलीफ बनला.ताहीरला खोरासानचा सुभेदार (८२० मध्ये) नेमण्यांत आले व याने या देशात एक स्वतंत्र घराणे स्थापिले.हें नांवाला बगदादचे अंकित असे.८७३ पर्यंत या घराण्याची सत्ता खोरासानवर चालत होती.मोतासिम खलिफाच्या कारकीर्दीत मझ्दपंथी इराणी लोकांचे व बिझांशिअमच्या लोकांचे बंड व ताबरिस्तानमधील बंडे कष्टाने मोडण्यांत आली.दहावा खलीफ मोतावाक्की यांच्या कारकीर्दीत याकूब बिन लैथ अल-सफर याने ताहिरि घराण्याचा मोड करुन सिस्तन प्रांतात सफारि घराणे स्थापिले.इराणमध्ये पर्शियन (फार्सी),कुर्दी,लूरी,बलुची व अरबी ह्या भाषा बोलल्या जातात. पर्शियन ही एक इंडो-यूरोपियन भाषा असून ती मध्य आशियाई स्टेप प्रदेशातून आलेल्या आक्रमकांनी सुरू केली.इराणने इस्लामचा स्वीकार केल्यावर या भाषेत बरेच अरबी शब्द समाविष्ट झाले आणि त्यानंतर अरबी लिपीचा स्वीकार करण्यात आला व आजही तीच प्रचलित आहे.तुर्कस्तानप्रमाणे इराणमध्येही पर्शियन भाषेतून अरबी शब्दांचे व रूपांचे उच्चाटन करण्याची प्रवृत्ती बळावली असली,तरी प्राचीन अरबी साहित्यावरील नि:सीम भक्तीमुळे त्या प्रवृत्तीस आळा बसत आहे.पर्शियन भाषेच्या बोलभाषा देशाच्या काही भागांत प्रचारात आहेत.कुर्दी भाषा ही पर्शियन भाषेपेक्षा भिन्न असली, तरी तीही इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील एक मानतात.गोरानी ही एक प्रमुख बोलभाषा असून ईशान्येकडील जिल्ह्यांतून मुक्री कुर्द ही दुसरी एक बोलभाषा वापरतात.लूरी ही लुरिस्तान प्रांताची भाषा असून प्रामुख्याने बाख्तियारी व इतर काही टोळ्यांमध्ये बोलली जाते. लूरीचे जुन्या पर्शियन भाषेशी बरेच साधर्म्य आहे. आझरबैजानमध्ये बोलली जाणारी अॅझेरी ही तुर्की भाषेची पोटभाषा असून तिचे अॅनातोलियन तुर्की भाषेशी फार सादृश्य आहे.बलुची ही एक आर्यभाषा असून ती आधुनिक पर्शियन भाषेत मिसळून गेली आहे.खुझिस्तान प्रांतातील अरबी टोळ्या,इराणी आखाताच्या किनार भागातील आणि मकरानमधील टोळ्या तसेच फार्स प्रांतातील खामेश टोळ्यांपैकी काहीजण अरबी भाषा वापरतात.
हिंदुस्थानात जाऊन राहिलेल्या काही लोकाची मागणी करण्याकरिता नादीरशहा याने मोगल बादशहाकडे एक वकील पाठविला.परंतु काही एक समाधानकारक उत्तर मिळाले नाही.उलट या वकीलास स्वदेशी परत येतांना अडथळे करण्यात आले.एवढे कारण नादीरशहास हिंदुस्थानवर स्वारी करण्यास पुरेसे झाले.व काही पळालेल्या लोकांचा पाठलाग करता करता तो गिझनीहून काबूलला गेला.हे शहर या वेळी दिल्लीच्या महंमदशहाच्या सुभेदाराच्या ताब्यात होते.हा सुभेदार नादीरशहाच्या भीतीने पेशावरास पळून गेला. नादीरशहाने तोफांचा मारा करून (१७३८) हे शहर घेतले.काबूलला त्या वेळीं हिंदुस्थानचे एक प्रवेशद्वार समजत असत.काबूलहून दिल्ली दरबारची कानउघाडणी करण्याकरितां नांदीरशहाने फिरून एक वकील पाठविला परंतु जलालाबादच्या सुभेदाराने त्याचा खून करून त्याच्या लोकास परत पाठविले.नंतर नादीशहानें जलालाबाद शहर घेतले.खैबर घाटाच्या मार्गाने तो पेशावरच्या मैदानांत गेला व या ठिकाणीच त्याने मोगल सैन्याचा प्रथम पराभव केला.या वेळेपासून हिंदुस्थानच्या स्वारीस आरंभ झाला.कर्नलच्या लढाईंत नादीरचा जय झाल्यामुळे मोगल बादशहा शरण आला.नादीरशहा दिल्लीत असतांना त्यानें कत्तल व लुटालूट केली ही गोष्ट इतिहासप्रसिध्द आहे. औरंगजेबाच्या नातीशी त्याने आपल्या एका मुलाचे लग्न लावले व पदच्युत केलेल्या बादशहाला फिरून विधिपूर्वक गादीवर बसविले.१७३९ मध्ये दिल्ली सोडून लाहोर-पेशावरच्या मार्गाने घाटांतून काबूलला तो गेला,व नंतर १७४० मध्यें कंदाहारहून हिरातला तो येऊन पोहोचला.महंमदाने सिंधु नदीच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेश नादीरशहास दिला.या भागात सिंध देशाचा समावेश होत असे.मोगल बादशहाचे प्रख्यात मयुरासन व इतर मौल्यवान वस्तु नादीरशहाने हिंदुस्थानातून इराणात नेल्या.
नोव्हेंबर १२ रोजी शहाने मजलिस मध्ये हजर राहून आपल्या वचनाची पुनरावृत्ति केली. परंतु दिसेंबरमध्ये तेहरानमध्ये एक बंड होऊन राजकीय आणीबाणीचा प्रसंग येऊन ठेपला.यावेळीं शहाचे सैन्य नि:शस्त्र प्रजाननांवर पाठविले हाते. यावरून मजलिसनें एक जाहीर पत्रक काढून शहाचा नवीन राज्यपध्दति मोडण्याचा विचार आहे असे यूरोपांतील बलाढय राष्ट्रास कळविले व त्यांना मध्यस्थी करण्याची मागणी केली. तेहरानमधील ब्रिटीश व रशियन वकीलांनी नवीन पध्दति कायम राखण्याचा महंमद अलीस आग्रह केला.तेव्हा लष्करी मंत्र्याच्या ताब्यात सर्व सैन्य ठेवण्याचे कबूल करून मजलिसच्या मागण्या मान्य करण्याचे वचन महंमद अलीने मजलिसला निरोपाने कळविले.यामुळे पसरलेली अस्वस्थता काही वेळ थांबली.परंतु राजपक्ष व राष्ट्रीयपक्ष एकमेकांविरुध्द गुप्त कारस्थाने करू लागले. १९०८ फेब्रुवारीमध्ये शहा तेहरानमधून मोटार मध्यें बसून चालला असतांना त्याच्या मोटारीखाली दोन बांबगोळयांचा स्फोट झाला.शहास मात्र इजा झाली नाही. जूनमध्ये संशयास्पद दरबारी मंडळीला घालवून देण्याचा आग्रह मजलिसने शहास केला.शहाने ही गोष्ट मान्य करून स्वत: तेहरान सोडून गेला.कोसॅक नावाच्या राजकीय शरीरसंरक्षक पलटणीची राष्ट्रीयपक्षाच्या लोकांशी एकदम झटापट होऊन मजलिस सभागृहावर सरबत्ती करण्यात आली.मजलिसनें या प्रश्नाची वाटाघाट करण्याकरिता कमिशनरची नेमणूक केली. तेव्हा शहाने एक जाहीरनामा काढून मजलिस बरखास्त केली व लष्करी लोकास तेहरानमध्ये बंदोबस्त राखण्याचा हुकूम केला.स्वत: निवडलेल्या चाळीस सभासदांचे एक सल्लागार मंडळ या मजलिसच्या ऐवजी नेमण्या वाहिबेत शहाने केला.परंतु ग्रेटब्रिटन या रशिया यांच्या आग्रहावरून हा विचार सोडून देऊन त्यानें जाहीर निवडणूक करण्याचा हुकूम सोडला.मध्यतंरी प्रांतामध्ये अंत:कलह सुरू झाले.कुर्द दरोडेखोरांनी ताब्रिझजवळची बरींच खेडी लुटली.ट्रान्सकाकेशियाच्या सरहद्दीवरील रशियन शिपायांवर इराणी बंडखोरांनी हल्ला केल्यामुळे रशियन सरकाराने नुकसानभरपाई मागितली. ही न दिल्यामुळे रशियन सैन्याने कित्येक इराणी खेडी जाळून टाकली.ही गोष्ट व कोसॅकांचा हल्ला यावरून रशिया राजपक्षास मदत करीत आहे अशी राष्ट्रीय पक्षांने ओरड केली होती.तेव्हा १९०९ मध्ये एक रशियन सैन्याची तुकडी ताब्रिझला राष्ट्रीय पक्षाच्या वतीने ढवळाढवळ करण्याकरिता रशियाने पाठविली.हे सैन्य येताच शहाच्या सैन्याने ताब्रिझचा वेढा उठविला.याच वर्षी जानेवारी महिन्यात राज्यक्रांतीचा वणवा इस्पहान शहरात पसरला. तेथे बखत्यारी लोक राष्ट्रीय पक्षास मिळाले व त्यांनी राजपक्षाच्या इस्पहानच्या सुभेदारास काढून टाकून तेहरानवर चाल केली.मे व जून महिन्यात राज्यपध्दती पाळण्याबद्दल जाहीरनामे शहाने काढले.सर्व राजकीय गुन्हेगारास माफी करण्याचे शहाने वचन दिले.परंतु त्याला राष्ट्रीय व बखत्यारी पक्षांच्या संयुक्त सैन्यास थांबविता आले नाही.या सैन्याने जुलै १३ रोजी तेहरानमध्ये प्रवेश केला.रस्त्यांत निकराचे युध्द करून कोसॅक बंडखोरांना सामील झाले.शहा जुलै १५ रोजी रशियन वकिलातीत जाऊन राहिला.या कृत्याचा राज्यत्याग असा अर्थ करण्यांत आला.याच दिवशीं राष्ट्रीय कौन्सिलची बैठक होऊन महंमद अलीचा तेरा वर्षाचा मुलगा सुलतान अहमद मिर्झा यास गादीचा वारस निवडण्यांत आले. कजर लोकांचा नायक आसाद-उल-मुल्क यास राज्यप्रतिनिधि नेमण्यांत आले.१९०९ सप्टेंबर ९ रोजी पदच्युत केलेल्या शहास रशियन कोसॅक व हिंदु स्वार यांच्या बंदोबस्तात क्रिमियामध्ये हद्दपारीत दिवस कंठण्यास पाठविण्यांत आलें. नोव्हेंबर १५ रोजी शहाने नवीन निवडलेली मजलिस विधिपूर्वक भरविली.
१९२१ सालापासून इराणी वर्तमानपत्रांनी सरकारी नोकरीत असलेल्या यूरोपियन अधिकाऱ्यांवर टीकेचा मारा सुरु केला.सरकारी खात्यांतून फक्त इराणी नोकर नेमावेत असा त्यांचा आग्रह असे.'इत्तेहाद (एकी) पत्र रशियनध्देष्टे होते.'हाघी हात (सत्य) पुष्कळ सरदारांची नालस्ती करी.'इराण अझद (स्वतंत्र इराण) आंग्लो इराणी तहाच्या विरुध्द असे. 'शाफक सोरख (रक्तउषा) युवराजाने केलेल्या पैशाच्या मागणीमुळे रागावलेलें होते.'इरामझद’ ब्रिटिशांचे वर्चस्व रशियाच्या वर्चस्वा इतकेच वाईट आहे असे प्रतिपादी. १९२२ च्या सप्टेंबर महिन्यांत इराण सरकाराने पुष्कळ पत्रे त्यांतील ब्रिटिशांविरुध्द लेखांमुळे बंद पाडली.युध्द मंत्र्यावर कडक टीका केल्यामुळे लष्करी तुकडीने जुलै १९२३ त 'वथन’ वर छापा घातला.इराणचा फार जुना व त्या त्या अंगी मौल्यवान इतिहास आहे.आपण फक्त तटस्थ भूमिकेने समीक्षा करत अभ्यासला पाहिजे.
संदर्भ-
"मुन"शी झालेली चर्चा अन खलील पुस्तकं खूप मोलाची होती.
१)बॅसेट-पर्शिया दि लँड ऑफ दि इमाम्स
२)ब्लॅनफर्ड-ईस्टर्न पर्शिया (लंडन १८७६) मोल्टन-अलीं रिलीजियस पोएट्री ऑफ पर्शिया ;
३)गाल्डिवन- पर्शियन क्लॉसिक्स (इंग्रजी भाषांतर २ भाग)
४)स्मिथ- आर्ट ऑफ पर्शिया:
५)Davar, F.C. Iran and It’s Culture, Bombay, 1953.
६) Frye, R. N. Iran, London, ७)1960.फ्रेझर-हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह अकाउंट ऑफ पर्शिया
८)स्टीव्हन्स-हिस्टरी ऑफ पर्शिया (२ भाग) ९)सायकीज-हिस्ट्री ऑफ पर्शिया
१० )(दुसरी आवुत्ति १९२१)प्रो. ब्रॉऊन- दि पर्शियन रेव्होल्यूशन (१९१०)
प्रत्येक देशाला एक इतिहास असतो.इराणचा इतिहास हा स्त्री जीवन व त्यादृष्टीने तितका मोकळा नाही.परंतु बदलत्या परिप्रेक्षात तेथील जनजीवणाच्या जाणिवाही बदलत आहेत.मुली शिकू लागल्या आहेत.इव्हन परदेशवारी करून शिकत आहेत.मुन त्यातली एक.ती मराठी बरीच शब्दशब्दाने शिकली आहे.इथला व्यवहार ती शिकली आहे.भारतीय पत्रकारिता शिकून ती मायदेशी इराणला- आपल्या देशासाठी पत्रकारितेचे प्रज्ञान नेणार आहे.
-विश्वनाथ साठे[9921056462]
संज्ञापन वृत्तपत्रविद्या पदविका-विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

Comments
Post a Comment