भाग दोन-
नोव्हा
मला एक सांग रंगाच्या बाबतीत तुझं काय मत आहे?
म्हणजे "फोटोग्राफी आणि रंग" हे संदर्भ कसे असतात?
रंग म्हणजे प्रकाश. प्रकाशाच्या पुनरावृत्तीचा वेग आणि तरंगलांबी, एका लहरीच्या शिखेपासून दुसर्या लहरीच्या शिखेपर्यंतचे अंतर, विद्युत लोहचुंबकीय पंक्तीला उद्देशून ही संज्ञा वापरण्यात येते
ही जशी कमी जास्त होते तेव्हा आपल्याला रंगाची शलाका दिसते.
पुन्हा तेच येतं छायाचित्रे म्हणजे प्रकाशाची प्रत.
रंग म्हणजेच प्रकाशाच्या विविधांगी आणि भिन्न लांबीरुंदीतील आणि प्रत्ययातील प्रत. आणि ह्या प्रत सतत बदलत्या स्वरूपात असतात. किंवा त्या स्थिरत्वाच्या पलीकडे अस्थिरही असतात. काळ, स्थान, दृष्टिकोन, पारदर्शकीय आणि दर्शनीय माध्यम, यावर त्यांची वितरणे निर्मित होत राहतात.
तुझं कोणतं एज्युकेशन झालंय?
बीएस्सी बायोटेक.
ओह...लै स्पष्ट आणि विश्लेषित करून सांगितलं
मग असाच एक प्रश्न येतो की रंग सुंदर असतात का सुंदरतेचा कोणता एक रंग असतो?
रंग, फोटोग्राफी, आणि सुंदरता ह्या संज्ञा कशा आहेत? किंवा का वापरल्या जातात व्यावसायिक क्षेत्रामध्ये?
ते जसे हिरवे, लाल, नारंगी रंगामुळे छायाचित्रे आकर्षक दिसतात.
जितक्या विविध रंगानी बहरली जाणारी वस्तू ही आकर्षक असते असं माझं मत आहे.
माझा विचार असा आहे की, सगळीच रंग सुंदर असतात. फक्त ते मांडता यायला हवं. इव्हन कृष्णधवल छायाचित्रेही आकर्षक असतात. त्यात रंग अन सुंदरता असं समीकरण असतं तर ते सुंदर दिसायला नको न मग.
आणि काळापांढरा हा सुद्धा रंगच आहे. कृष्णधवल छायाचित्राला रंगीत छायाचित्रे म्हणत नाहीत. मात्र शेवटी ते काळा आणि पांढरा रंगच आहेत.
हं, सगळी रंग हे निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे.एक रंग जर सुंदर असेल तर सगळीच रंग सुंदरता निसर्गतः घेऊन येतात.कोणताही एक सुंदरतेचा रंग हमी म्हणून सांगता येणार नाही किंवा सुंदरतेचा कोणताही एक रंग नाही.
प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्व असते असं मला वाटतं. रंग सुंदर नसतात हे माझ्यासाठी तरी नाही या प्रकारातील वाक्य आहे. बाकी तुमची समज ही तुमच्याजवळ असते होणं?
कसं? आणि का?
का म्हणजे प्रत्येक रंग हा काही कारणासाठी आहे. एखादा पक्षी, प्राणी, जीव रंगीबेरंगी नाही म्हणजे तो काळा करडा आहे म्हणून तो सुंदर नाही तो कुरूप आहे असा अर्थ होत नाही. बऱ्याचदा ते शत्रूंपासून वाचण्यासाठी असे रंगाचे असतात. कारण भडक रंग लवकर उच्च प्रतीत प्रकाशित होतात. आणि म्हणून ते शत्रूस चटकन नजरेस दिसणार आणि मृत्यूला कारणीभूत ठरतात. जे सहजासहजी दिसणार नाहीत ते जगणार.
म्हणूनच प्रत्येक रंगाचे स्वतःचे सौंदर्य आणि महत्त्व असते. यार्थी नोव्हाच्या सौंदर्यसंकल्पना वेगळ्या ठरतात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचे रंग हे कधी काही काळी सक्रिय कृतिशील असतात. औष्णिक उष्मांक आणि उष्माघात, अतिनील किरणांपासून सरंक्षण मिळणारे, कधी तर ते रंग सुर्यप्रकाशी, चंद्रप्रकाशी असतात.
निसर्गात प्रत्येक गोष्ट ही खूप सुंदर प्रकारे बनलेली आहे आणि समरस झालेली आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे कारण असतात. आणि जगणं, स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहणं एव्हढ्यासाठी हे चालतं.
त्यांचा आकार, रंग, नखे, पंख, प्रत्येक रचना ज्याच्या त्याच्या गरजेनुसार असते.
हम्म समजू शकतो. परंतु संभाव्य धोक्यांपासून ही सुरक्षितता असू शकते. नैसर्गिक आणि अपर्यायी धोक्यांच्या बाबतीत संरक्षण कसं असतं प्राण्यापक्ष्यांजिवाचं ?
तंत्रज्ञानामुळे आम्ही आमच्या ज्ञानाची नैसर्गिक ज्ञानवस्तू गमावली आहे.
आपण तंत्रज्ञानावर इतके अवलंबून झालो आहोत की आपल्या नैसर्गिक क्षमता लोप पावल्यात.
इतकं सहजपणे हे विधान नोव्हा करते कशी? यावर थोडा विचार केल्यावर कळलं की, मारुती चितमपल्ली हेच सांगत आलेत त्यांच्या साहित्यातून. निसर्गाविषयी, ललित, तसेच माहितीपूर्ण लेखन हे त्यांचे अवशेष नोव्हाच्या या विधानात अंतर्भूत दिसतात. साहजिकच नोव्हाचं एक वेगळं तत्वज्ञान आहे. ती जे बोलते सहजपणे पण मार्मिक आणि वास्तवजगाला साक्ष ठेवून बोलते. म्हणून हे तिचं विधान खरं ठरतं आहे.
का हो आदिवासी जमातीमध्ये त्या आजही आहेत. परंतु ते सद्या जंगलात राहतात.
वातावरणातील बदल येणार हे संकेत जसे वादळ, वारा, पाऊस, वीज, भूकंप, पूर, ते प्राण्यांच्या प्रतिसादातून समजू शकतात. ह्या गोष्टींचा प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध असतो. प्राणी विविध प्रकारचे आवाज करून पुढच्या प्रजातीला सावध करतात. त्यांची ही वेगळी भाषा असते.
तुम्ही कधी ऐकलं का त्सुनामीमुळे समुद्रात पक्षी मेलेत?
नाही ब्वॉ!"
बाकी जिथे त्यांना पर्याय नसतो तिथे त्यांना मृत्यू घ्यावा लागतो. मानवनिर्मित धोकायुक्त मोठे मोठे प्रकल्प, निसर्गअनिर्मित केलेल्या रचना यामुळे ते मृत्यू पावतात. परंतु निसर्गातील नैसर्गिक आपत्ती समजण्यासाठी लागणारी क्षमता त्यांच्या अंगी असते.
उदा देऊ. आता ती एक टोळधाड आली होती. ते किडे. अचानक संख्या का वाढली?
जेव्हा निसर्गात अचानकपणे बदल जाणवायला लागतो तेव्हा त्यांना वाटते आता आपली प्रजाती संपणार तेव्हा आपल्या प्रजातीचे अस्तित्व टिकावं म्हणून ते जास्तीत जास्त अंडी देतात. आणि अचानक त्यांच्या पिल्लांची संख्या वाढत जाते. आणि निसर्गातील अचानक बदलांमुळे ते असे काही तर करू लागतात.
इतकं कधी वाचन केलंस तू?
किती अनुभूतीपुर्वक जाणीवपूर्वक तुला कळलं जगणं...
तुझ्या ज्ञानमय अनुभवाने मला कौतुक वाटतं आहे आणि क्युरॅसिटी वाढते आहे...
तुला कित्त्येक प्रश्न विचारावे आणि जाणून घ्यावं जे माहिती नसलेलं...
पण तू म्हणशील कित्ती हा प्रश्न करतो वेड्यासारखा.
सो...
हे छायाचित्रण करतांना आणि निरीक्षण करतांना येत जातं बाकी काही नाही.
तुझं निरीक्षण 'सूक्ष्म तितकंच प्रांजळ' आहे...जशी एक निष्णात कलाकाराची अदाकारी जी असते.
"नोव्हाच्या कलेतून एका शलाकेतून!"
भाग दोन- खंड
-विश्वनाथ साठे(9921056462)

Comments
Post a Comment