"गावाच्या खालून पांढरी असते तिकडे गेलेलो
पांढरीत आता पांढरी माती नाही राहिली ग
सगळं मिश्रित झालंय...
लोकं आता त्यावर काळी माती टाकून आहेत
नाही तर माझ्या लहानपणी माय आणि मी टोपल्याने इथून माती आणायचो
घर मातीचं असल्याने उभ्या आडव्या भिंती सारवायचो
पांढरी मातीचा वास घेऊन बघ पहिल्या पावसात
ओहोच...
मी तर कैकदिवस ही माती खायचो...
त्यात जीवनसत्त्वे असतात
विदर्भात पांढऱ्या सोन्याची शेत असं म्हणतात...!"

-विश्वा(9921056462)

Comments

Popular posts from this blog