★★★इथल्या धर्माला धम्माची गरज.....★★★
भाग-तीन
बुद्ध डोळशांत मुद्रेने त्या पहारेकऱ्यांकडे पाहत होते.त्यांचे बोलणे आता खंडन झाले होते.पहारेकरी आल्यामुळे सर्वच अनुयायी आणि विहारवातावरण नव्या वळणाने अनुभव घेत होते.ते बोल अनुयायी ऐकू लागले.पहिला पहारेकरी म्हणाला,
"आम्हां राज्यकर्त्यांकडून क्षमायाचना करितो.या नगरात तथागत बुद्ध तुम्हांसारख्या विद्वान नि अहिंसात्मक विचारशैलीच्या तत्वज्ञानींवर खुनाचा आळ अविचारानेच लाविला.याकरितो...राजा तथा सर्व गणप्रजा क्षमाशील संतोषयाचना मागितो आहोत.दयावृत्तीने ह्या अक्षम्यचुकीचे अपराध चरणी ठेवितो.तावदर माफी असो द्यावी...!"
दोन्ही पहारेकरी हात पसरत होते.आणि करुण भावकारीने ते लोलुप झाले होते.दुःखाची व अपराधाची कुमक ते चेहऱ्यावर लपेटून होते.
बुद्ध बोलले,
"हे आनंद....."
"दोघांनाही मनातला विखार गाळून विशुद्ध होऊ द्या...त्यांना जलपान करावयास लावा...."
त्या दोघांनी जलपान केले नि पुढची हकीकत ते वदू लागले.
"हे महामानवा....हे सत्य तुझे चरणी अर्पित करितो...."
दुसरा पहारेकरी बोलला.
"त्या दिवशी आम्हां दोघांची गस्त घालण्याची वेळ होती.आम्हीं निद्रानाश करून रात्रीच्या पहिल्या प्रहरी मद्यखान्याच्या जवळपासच होतो.मद्यशामियान्यात मद्याच्या धारा प्याल्यात उकळत होत्या.घडा भरल्याचा आवाज त्या शांत पण हुरळलेल्या रात्रीत चढत होता.आणि तसाच काही दोन मानवी आवाजाचाही.आम्हांला वाटले की,मद्य प्राशन करणारांनी इकडील तिकडील चर्चा सुरू केल्या असतील.आवाज वाढत होता.तसा तो मद्यखाना कैफात बुडत होता.रात्रीच्या प्रहरी लुटारू,गंजिफे,व्यसनी,गुत्तेखोर आणि दरोडेखोरांनी मद्यखाना तुडुंब भरलेला असतो.ते रोजचेच आहे.त्यातील कैकांना हमहाटात आम्हीं न्याहाळीत असतो.काहीं देशस्थ राज्यकर्मी असतात.तर काहीं व्यापारवाईशी... तर काहींचे राजकारभारांचे हिसोबकीतोंब चालतात.राजधर्मी नि काहीं धर्मशाशन कारभारी...."
बुद्ध एकाग्रचित्ते ऐकून घेत होते.सारी अनुयायी मंडळी कानात प्राण ओतू लागले.राज्याची अवस्था आज वेगळ्याच निवेदनाच्या अंगाने ते गुप्तहेरांकडून ऐकत होते.ते पहारेकरी नसून गुप्तहेर आहेत हेच मुळात आज त्यांना नवं कळत होतं.ते चकितभाव दृष्टीने त्या दोघांकडे पाहत होते.
दुसऱ्या पहारेकऱ्याने काय सांगितलं आहे का माहीत ...महाराज्यांनो...?"
आगळे सर बोलू लागले की,
"पहारेकरी तिथे मोठ्या गुप्तहेरी फिकीरीने म्हणतात,
"आम्हीं शीळभिंत ओलांडून मुख्य दरवाजाला न टोकरता पुढच्या सांदीत हळुवारपणे पाऊल टाकत गेलो.पाहतो तो काय.???"
"बुद्धांनी किंचितशी हासरी लकरे नजरेतून पहारेकऱ्यांच्या चेहऱ्यावर फेकली...."
किंचितशी हा शब्द म्हणतांना... आगळे सरांनी दोन बोटांची चिमटी धरून टेबलाच्या एका कोसावर टिचवत पुढचं वाक्य केलं.
-विश्वा
क्रमशः-
2/5

Comments
Post a Comment