"इक कॉम्रेड की स्नेही"

                                           "पटलं नाही ते पटलं नाही"
म्हणून बिनदिक्कतपणे बोलणारी, हमसून रडणारी, बोल म्हणलं की नाना विषय काढून त्यातील खोलवर आणि अभ्यासपूर्ण खाचाखळग्यांची माहिती सांगणारी,
"आता सांगशील का" "हे लैयच एडपट हैं..."
"सांगून टाक न कित्ती मिन्नती करावी लागते तुला!"
असं रागात पण मिस्किलपणे म्हणणारी,
"हिम्मत हरले रे" किंवा "आता मला खूप काही करण्याची उमेद आहे" असं राजरोस सांगणारी,
"असू दे जाऊंदे मंग उद्या बोलू निवांतपणे"
अशी म्हणणारी, हसू आलं की खळखळून हसणारी आणि हसवणारी, इतकं की, "डोळ्यातून पाणी येतं की रे म्हणणारी"
"आता पुरे उद्या हसायला ठेव काही"
कधी बोललो नाही तर महिनोंमहिने संवाद न करणारी, अन अचानक बोलणारी,
"जणू काहीच घडलं नाही या मध्यंतरीच्या काळात"
असं अगदी निर्मळपणे म्हणणं मांडण्यात पटाईत असलेली,
"मग रे?" "आता कसं?" "तू सांग!" असं स्पष्टपणे व्यक्त होणारी, "तुझे ते लेबलं बाजूला काढून ठेव बरं आणि बिनदिक्कतपणे व्यक्त होत जा बरं!" असं निर्व्याजस्त म्हणणारी,
"तुझं लिखाण तू लिहीत रहा ते सोडू नकोस रे" असं सातत्यपूर्ण रीतीने न कंटाळता सांगणारी,आणि लेखकामूळे तू तूला नको विसरू. तूझ्या मूळे लेखक आहे त्याच्या मूळे तू नाही!" अस्तित्वाच्या इतक्या सोप्या कोट्या उलगडत जाणारी,
"आवडलेले आणि मूल्ययुक्त विचार डायरीत उतरून ठेवून नंतर कैक दिवसांनंतर संवाद झाला की सांगणारी" आणि त्यातील विधानं बोलण्यातून लावून धरून अडकविणारी आणि म्हणणं असतं की, "हे तुझंच विधान आहे नं? म आता?"
"मी नसते काळजी करत म्हणणारी" आणि काळजातून काळजी करणारी गुणी, विवेकी, रागातही तोल सांभाळत म्हणणं मांडत राहणारी, की , "इतका नको जाऊ देवू काळ!" म्हणता म्हणता, "हो पण आयुष्य हे एक नाणे आहे. एकच बाजू पाहून काही ठरवू नये. दूसरी पण पहावी बाजू. मग सत्य समजते" असं सत्याच्या शोधविषयीचे स्वतःचे मत असणारी. आणि "मग रे शेवटी काय सत्य आहे?" हेच विचारणारी.
"मला तूझे पापड पूरान ऐकवतो तू" असं मिस्किलपणे आणि "माझ्या मूळे तूला नेहमी त्रास होतो ना रे?"
"तू म्हणतोस की, तूला बाकी काही दुःख होत नाही. फक्त शब्दाचे वार लागतात, मी काही असे बोलले का रे?
असं विचारपूसत राहणारी,
"अरे त्यादिवशी खूप आठवण आली तुझी. भेटावं वाटलं म्हणून बोलले तुला भेटतोस का असं." हे मनातल्या मनात म्हणणारी पण न सांगणारी आणि "का" म्हणून विचारलं तर असंच रे. "भेटलो नाही ना आपण बरेच दिवसात...या काळात कुठे तरी मुक्त असायचं आहे...थोडं फिरायचं आहे तुझ्या फिरस्तीप्रमाणे. असं उत्तर देणारी,"
"आपण काल सुद्धा बोललो होतो याविषयावर. पण तू नाहीच म्हणालास. मी मुर्खासारख तुझ्याशी समजावून बोलत राहिले. का वागलास असा.
आता मी रुसले तुझ्यावर असा लटका रुसवा घेऊन महिनोन्महिने न बोलणारी,"
आणि अचानकपणे आभाळ भरून यावं असं
"आपण बघ ना काही ओळख नसताना बोललो काय, भेटलो काय आणि किती जवळचे झालो ना रे? "हा सगळा जीवनाचा भाग आहे रे" हे वास्तव सांगणारी,
"प्रश्नाचं वादळ उठतं रे माझ्या मनात, तुझ्याविषयी तू आयुष्यभर सुखी रहावस एवढंच वाटतं मनापासून
असं म्हणतांना गदगदून हसून घेऊन पुढचं विधान करणारी, "आपलं जुनं वाक्य आहे हे.आठवतं का रे तुला?" अशी आठवणींची आठवण जपणारी,
"मस्त गार हवा आहे, आकाशातील चंद्र पाहते" आणि नंतर स्वतःच्या निरीक्षणांच्या नोंदी सुरेल आवाजात सांगणारी, अंगाईगीत,गाणे,लिहिलेेेलं मंजुळ सुरावळीत ऐकविणारी, "सगळीकडे तटस्थ नको होवू रे. कूठे तरी तूझा मनाचे पण ऐक." असं मनाचं तत्व अधोरेखित करणारी,
"अन्यायाविरुद्ध झुंजारपणानं लढणारी,उच्चध्येयवादी, प्रज्ञेच्या शोधात असणारी,असा हरु नकोस लढ" असा खंबीरपणाचे तत्व व्यक्त होणारी...
"इक कॉम्रेड की स्नेही"

तुझा-स्नेही-विश्वा[9921056462]

Comments

Popular posts from this blog